मित्रांनो आज आपण बघणार आहोत खऱ्या सुपुत्राची ओळख मराठी गोष्ट प्रत्येक आईला आणि वडिलांना आपला मुलगा हा चांगला वाटतो कारण मुलावरील प्रेम त्यांना असं करण्यास भाग पाडत आजच्या या गोष्टीत देखील आपण अशीच एक कथा बघणार आहोत जी तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला हि मराठी गोष्ट आवडली तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजेच आम्ही अश्याच गमतीदार गोष्टी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत राहू चला तर मग बघूया खऱ्या सुपुत्राची ओळख मराठी गोष्ट.
खऱ्या सुपुत्राची ओळख
एका गावात तीन बायका पाणी भरण्यासाठी एकाच वेळी तलावाकडे जात होत्या. त्या ठिकाणी एक म्हातारा प्रवासी बसला होता आणि तो सत्तूचे पीठ खात होता. तिघीजणी जमिनीवर हंडे ठेवून बसल्या होत्या आणि त्यांच्या गप्पा गोष्टी म्हाताऱ्याला ऐकू जाईल अशा आवाजात करत होत्या.
एक बाई दुसरीला म्हणाली, “ताई, पंडित तोतारामचा शिष्य माझा मुलगा शास्त्री होऊन घरी आला त्यावेळी त्याने गावामध्ये गोंधळ माजविला. सारे जण त्याची स्तुती करू लागले. तो असा काही शकून सांगतो की त्यामुळे लवकरच लाभ होत असे आणि ऐका, तो आकाशांतील तारे मोजून त्याची नावे सांगतो. स्वर्गातील सर्व गोष्टी त्याला माहित आहे. यमराज त्याच्या यमलोकांत असून न्याय कसा देत असतो हे त्याला माहित आहे. भैरवांच्या सर्व गणांची नावे, यमदुतांची नावे, नरकाच्या स्थानाचीही नावे त्याच्या चांगली लक्षात आहे. माहित नाही तो देवाची लिला कशी काय जाणतो? पंडित लोक लग्नाचे शास्त्र जाणतात. म्हणून त्यांना कोणी विरोध करत नाही. मी अशा पंडिताला जन्म देऊन धन्य झाले. मी कुठे बाहेर निघाले तर माझ्याकडे बोट दाखवून म्हणतात की पहा, ती शास्त्रीची आई आहे. ती पाणी भरण्यास जात आहे.
तिची गोष्ट ऐकून दुसरी बाई बोलली,“अग सखी, माझ्या मुलाची ऐकण्यासारखी गोष्ट आहे. माझा मुलगा पहिलवान आहे. त्याचा सारखा पहिलवान दहा पाच गावांत बघायला मिळणार नाही. तो पाचशे बैठका सकाळ संध्याकाळ काढतो. आखाडयात इतर पहिलवानां बरोबर बाहू ठोकून कुस्ती करतो. ताई, खरे पाहिले तर त्याच्यायेवढे कोणाही पहिलवानाने नावलौकीक कमावले नसेल.
मी त्याला हलवा आणि मालपोहे तयार करून रोज खायला देते. खाऊन पिऊन तो हत्तीसारखा डोलत फेरफटका मारायला जातो. एक शेतकरी माझ्याकडे पाहून आपल्या मुलाला म्हणाला की ही त्या पहिलवानाची आई आहे ज्याने कल्लू नटाला चारी बाजूनी घेराव घालून जिंकले होते. खरे तर, मुलाचे मोठेपण ऐकून माझा आनंद उचंबळून आला.
दोघींची गोष्ट ऐकून तिसरी बाई गप्प बसली. त्यावर एक बाई म्हणाली,”तू गप्प का आहे? असे वाटते की तुझा मुलगा चांगला निघाला नसेल. तिसरी बाई बोलली, बायांनो असे नाही. माझ्या दृष्टीने तो चांगला आहे. त्याला नाव लौकीक व्हावे याची लालसा नाही. तो साधा सरळ स्वभावाचा आहे. तो दिवसभर शेतात काम करत असतो संध्याकाळी आल्यावर तो घरासाठी पाणी भरत असतो. घरकाम करता करता त्याला बाहेर नाव कमाविण्यासाठी वेळ मिळत नसतो. आज मी त्याला फारच आग्रह केला म्हणून तो मेळ्यात गेला आणि मला पाणी भरायला यावे लागले. मला इथे येताना पाहून सर्वांना आश्चर्य वाटून बोलू लागले की मला पाणी भरण्यासाठी बाहेर का पडावे लागले.
तिघींच्या गप्पा संपल्या आणि लवकरच त्या हंडयात पाणी भरून निघून गेल्या. म्हातारा प्रवासी पण त्यांच्या मागे चालू लागला. थोडया अंतरावर तीन तरूण मुले येताना दिसत होती. ती बहुतेक करून या बायकांची मुले असावीत. एका मुलगा पहिल्या बाईजवळ जाऊन म्हणाला,”आई, मी चांगल्या बाजूने घरी जातो. रस्त्यात पाण्याने भरलेला हंडा मिळणे शुभ आहे. ” अस सांगून तो भराभर आपल्या घराकडे गेला. दुसरा मुलगा म्हणाला,”आई, मी मेळयात दंगल जिंकून आलो. लवकर पाणी घेऊन घरी ये मला फार भूक लागली आहे. असे सांगून तो पुढे चालू लागला. त्याच्यानंतर तिस-या बाईचा मुलगा जवळ आला आणि तिच्या हातातील पाण्याचा हंडा घेऊन म्हणाला,”आई, तू पाणी भरायला का आली ? मी तर येतच होतो.”
हंडा घेऊन तो घराकडे गेला तेव्हा सर्वजणी आपआपल्या मुलांकडे पाहून त्यांच्याबरोबर चालणाऱ्या म्हाताऱ्या प्रवाशाला विचारतात, “बाबा, आमच्या मुलांकडे पाहून तू काय सांगतोस.”
म्हातार्याने दाढीवर हात फिरवून सांगितले,”तुम्ही मुलांबद्दल काहीही सांगा परंतु माझ्या दृष्टीने तिघांमध्ये असा मुलगा आहे की तो स्वतःचा मुलगा म्हणून ओळखला जातो. पहिले दोघेजण आपल्या आईच्या पोटी जन्म घेऊन दूर गेले. तिसरा शरीराने निराळा झाला तरी त्याचे मन आईच्या मनाबरोबर मिळते. त्याच्यात आत्मीयता असल्यामुळे मी त्याला सुपुत्र मानतो.”
दोन्ही बायकांची तोंडे गळयाला लटकत होती जणू काय ती वटवाघुळासारखी वाटत होती. ज्याप्रमाणे वटवाघुळ झाडाला उलटे लटकते त्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती खऱ्या सुपुत्राची ओळख मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आयुष्यात आपण आपल्या आई वडिलांचे उपकार हे कायम लक्षात ठेवले पाहिजे आपण कितीही यशस्वी झालो आणि जर आपल्या आई-वडिलांनाच विसरलो तर त्या यशाची काही किंमत नसते. आम्ही आशा करतो कि तुम्हाला खऱ्या सुपुत्राची ओळख मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.