Friday, December 1, 2023
Homeमराठी निबंधस्पर्धेचे युग मराठी निबंध | Marathi Nibandh

स्पर्धेचे युग मराठी निबंध | Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्पर्धेचे युग मराठी निबंध. जस कि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि आजच युग हे डिजिटल युग आहे. आजच्या काळात नौकरी मिळणं हे फार कठीण झालं आहे त्याच कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. जर आपल्या अंगात काही तरी कलागुण तरच आपण आजच्या या काळात पैसे कमाऊ शकतो व आरामाने आयुष्य जगू शकतो.जर तुमच्या अंगात काही करण्याची जिद्द व कला नसेल तर आजच्या या डिजिटल युगात तुमचं पोट भरणं देखील कठीण आहे.

म्हणून आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला स्पर्धा हि मिळणारच आणि त्या क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत हि घ्यावीच लागेल म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत spardheche yug marathi nibandh. शाळेत देखील मुलांना या विषयावर निबंध विचारले जातात तर शालेय मुलं देखील या निबंधाचा उपयोग आपल्या शालेय साहित्यासाठी करू शकता. चला तर मग बघूया स्पर्धेचे युग मराठी निबंध.

स्पर्धेचे युग मराठी निबंध

जीवनाच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धेचे युग आले आहे. कोणत्या क्षेत्रात स्पर्धा नाहीत? असे एकही क्षेत्र शिल्लक उरलेले नाही की जेथे स्पर्धा नाही.

जागतिकीकरण म्हणजे जगाची आर्थिक स्पर्धा होय. जागतिकीकरणाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर उमटलेला आहे. नवे नवे उद्योग करून आपला माल दुसऱ्या देशांत पाठवायचा आणि त्या देशांतील संपत्ती आपल्या देशात खेचून आणायची म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरण म्हणजे नवा वसाहतवादच होय. यातून नव्या मालाची स्पर्धा जगात सुरू झाली. ही स्पर्धा औदयोगिक व आर्थिक क्षेत्रातील आहे.

वैज्ञानिक क्षेत्रात तर प्रचंड स्पर्धा आहे. रोज नवनवे शोध लागत आहेत. मोबाईल हा मुळात दूरध्वनी होता. आता तो छायाचित्र काय घेतो, विजेरीने प्रकाश काय देतो, चलचित्रपटाचे काम काय करतो आणखी काय काय करत असतो. अंतरिक्षात जाण्याचीही नागतिक स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक देश अंतराळात आपले यान पाठवण्याच्या स्पर्धेत गुंतला आहे. जगातील महाशक्ती बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.

राजकीय क्षेत्रातही स्पर्धा आहे. जगातील बहुतेक सर्वच देशात लोकशाही नांदत आहे. लोकशाही म्हटली की राजकीय स्पर्धा आलीच. आपलाच पक्ष निवडून यावा यासाठी खोटे मतदान आणि मतपेट्या पळवून नेणे अशाही स्पर्धा चालतात. क्रीडा स्पर्धेत प्रत्येक आलिम्पिकमध्ये नवे नवे उच्चांक प्रस्थापित होत असतात.

सुवर्णपदक, रौप्यपदक किंवा निदान कांस्यपदक तरी मिळावे म्हणून प्रत्येक राष्ट्र या स्पर्धेत झुंज देत असते.

अभ्यासक्षेत्रातही भयानक स्पर्धा आहे. पूर्वी परीक्षा उत्तीर्ण झाली की पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळायचा. पण आता प्राविण्याएवढे गुण मिळाले तरी प्रवेश नाकारला जातो.

एकच वाटते, स्पर्धेतून जीवन उजळावे. स्पर्धा जीवघेण्या नकोत.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता स्पर्धेचे युग मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला स्पर्धेचे युग मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments