मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती मराठी निबंध. जस कि आपण सगळ्यांना माहिती आहे इथून मागच्या काळात स्त्रियांवर किती अत्याचार होत होते. स्त्रियांना फक्त घरकाम करणारी बाई मानलं जायचं. पूर्वीच्या काळी एक प्रसिद्ध डायलॉग होता जो स्त्रियांसाठी वापरला जायचा तो म्हणजे “मुलीने फक्त चूल आणि मुलं एवढंच बघावं” परंतु आजच्या काळात या डायलॉग ला काही अर्थच उरला नाही स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पूर्वीच्या काळी मोजकी अशी क्षेत्र होती जिथे स्त्रिया काम करायच्या परंतु आजच्या या काळात असं एक हि क्षेत्र आता उरलं नाही जिथे स्त्रिया काम करत नाही.
सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया या कार्यरत आहे. आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती कशी आहे हे समजावून सांगण्यासाठी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत Aajchya Kalatil Striyanchi Sthiti Marathi Nibandh. या निबंधाच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता कि आपल्या देशात आजच्या काळात स्त्रियांची स्थिती कशी आहे. शालेय विद्यार्थ्यांना या विषयावर परीक्षेत निबंध विचारले जातात तर शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा उपयोग करू शकतात. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग बघूया आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती मराठी निबंध.
आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती मराठी निबंध
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे पाहा, म्हणजे आधुनिक स्त्रीची वाटचाल आपोआप तुमच्या लक्षात येईल.
स्त्रीच्या परवशतेचे पूर्वीचे दिवस आता इतिहासजमा होत आहेत. हळूहळू स्त्री 7 जातीत उत्क्रांती घडून आली. काही समाजसुधारकांनी स्त्रीला सुद्धा माणसाएवढा अधिकार आहे आणि तो तिला मिळावा म्हणून जागृतीचे कार्य केले. काही काही स्त्रियांनी देशाच्या संरक्षणाकरिता स्वतःला वीरगती प्राप्त करून घेतली.
धर्ममार्तंडाच्या आदेशानुसार कोणत्याही धर्माप्रती कार्य करण्याची स्त्रियांना बंदीच होती. हाही अधिकार स्त्रियांना मिळवून देण्यात पंडिता रमाबाई, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचा उद्धार करण्याचे व्रतच घेतले होते. जेव्हा स्त्री शिक्षणावर पुरुषप्रधान संस्कृतीने बंदी आणली होती त्या काळात स्त्रियांना साक्षर करण्याचा विडा सावित्रीबाई फुल्यांनी उचलला आणि मुलींची पहिली शाळा सुरू केली.
त्याही वेळेस उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजाकडून त्यांना प्रोत्साहन तर मिळालेच नाही परंतु त्याच्यावर चिखलफेक करण्यात आली. त्याला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले स्त्रियांना शिक्षित करण्याचे कार्य धाडसी वृत्तीने सुरूच ठेवले. त्यांना समाजातील इतर स्त्रियांचे चांगले सहकार्य लाभले.
स्त्रियांना पशू समान लेखणाऱ्या समाजाच्या तोंडावर या सुधारक स्त्रीने जणू थापडच मारली. त्याकाळी स्त्रिया या अत्याचार सहन करण्यासाठीच जन्माला येतात अशीच भावना पुरुषप्रधान संस्कृतीत दिसून येते. ‘पायातील वाहन पायातच ठेवावी’ अशी भावना पुरुषांमध्ये रुजलेली होती.
काळ बदलत गेला. स्त्रियांना स्वतःचे अस्तित्व जाणवायला लागले. समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाची बरोबरी करायला लागली. ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना स्त्रीने पिटाळून लावली. निरपेक्ष लोकशाही राज्यात स्त्रियांचा दर्जा हा पुरुषा एवढाच आहे हा ठाम विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण झाला. या शिक्षणाची, धर्मशास्त्राची दालने स्त्रियांसाठी मोकळी झाली. शिक्षणाच्या क्षेत्रातही अ स्त्रियांनी मजल गाठली.
आज विसाव्या शतकात स्त्री ही पुरुषांपेक्षा अर्थार्जनाच्या क्षेत्रातही समोर आहे. महिलांच्या संघटना तयार झाल्या, आर्थिक विकासाच्या अनुषंगाने विविध व्यवसायात स्त्रिया अग्रणी झाल्या. समाजकारण, राजकारण, खेळ, क्रीडा, शिक्षण, कला, साहित्य, वैद्यकशास्त्र, विधी व न्याय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, देशाच्या शासनकर्त्या म्हणून आजची स्त्री प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे.
राष्ट्राची धुरा सांभाळण्यापासून तर संशोधनापर्यंत, समाजकार्यापासून तर कुटुंब प्रमुखापर्यंत स्त्रीच्या क्षेत्राची कक्षा रुंदावली आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक संशोधक स्त्रिया आहेत. भारताचे पंतप्रधानपदी इंदिरा गांधी सारख्या स्त्री ने सलग अकरा वर्ष देशाचे नेतृत्व सांभाळले. ग्रहावर जाण्यापासून तर एवरेस्ट सर करण्यापर्यंत स्त्री गेली आहे. आता स्त्री ही चार भिंतीच्या आत राहन केवळ पती व कुटुबाप्यत मर्यादित राहिलेली नाही तर जीवनाच्या विविधांगी क्षेत्रात प्रवेशित झालेली आहे.
शासनानेसुद्धा स्त्रियांना आज आरक्षण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्त्रीकडे सन्मानाच्या व आदराच्या भावनेने पहावे असे कार्य आजच्या स्त्रीचे आहे. तुरुंगाधिकारीपासून तर टॅक्सी चालकापर्यंत स्त्रिया पुरुषांच्या पाठीशी पाठ लावून विकासास सहाय्य करत आहे
कालची स्त्री समाजाच्या अत्याचाराला बळी पडणारी होती. परंतु अशा समाजाला वठणीवर आणण्याची समर्थता आजच्या स्त्रीमध्ये आहे. परंतु ममता व वात्सल्य मात्र आजही कालच्या स्त्रियांप्रमाणेच आजच्या स्त्रिया सांभाळत आहेत. चूल आणि मूल या जबाबदारी सोबतच इतरही क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. पण अजूनही महिलांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.