मित्रांनो आज आपण बघणार आहोत आदर्श नागरिक मराठी निबंध. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल कि आदर्श नागरिक म्हणजे काय? तर मित्रांनो आदर्श नागरिक जो असतो जो कुणालाही त्रास न देता समाजासाठी व आपल्या देशासाठी काम करत असतो. एक आदर्श नागरिक होण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आदर्श नागरिक हा कुठेही कचरा टाकत नाही तो आपल्या देशाला किंवा आपल्या गावाला नेहमी स्वछ ठेवतो व कचरा हा कचरा कुंडीतच टाकतो. हे फक्त आदर्श नागरिकाचं एक उदाहरण झालं अशी बरीचशी उदाहरण आदर्श नागरिकांची आहेत.
म्हणून या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत Adarsh Nagrik Marathi Nibandh. या निबंधा पासून तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. म्हणून या निबंधाला पूर्ण नक्की वाचा या मध्ये तुम्हाला आदर्श नागरिक बनण्यासाठी काही माहिती दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील हा निबंध खूप वेळा परीक्षेत विचारला जातो म्हणून शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सराव करू शकता. चला तर मग बघूया आदर्श नागरिक मराठी निबंध.
आदर्श नागरिक मराठी निबंध
मी जे काही करतो ते समाजासाठी आणि राष्ट्रासाठी करतो अशी ज्याची भावना असते आणि त्याप्रमाणे जो कृती करतो, तो आदर्श नागरिक होय. आपल्या सवयीचा इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता आदर्श नागरिक घेत असतो.
म्हणून तो रस्त्यावर कुठेही थुकत नाही. टीव्ही, रेडिओचा आवाज खूप मोठा करत नाही. बसमध्ये जोरजोराने बोलत नाही. धूम्रपान करत नाही. प्रत्येकाच्या घरी कचरा होतच असतो. पुष्कळ लोक तो कचरा रस्त्यावर किंवा कुणाच्या घराशेजारी टाकतात.
आदर्श नागरिक असे कधीच करत नाही. तो कचरा कुंडीत किंवा पोत्यात जमा करून कचरापेटीत टाकत असतो. अनेकांना कुठेही व काहीही लिहायची सवय असते. बसच्या सीटच्या मागील भागावर काही लोक ब्लेडने आपले नाव कोरतात. काही विद्यार्थी शाळेच्या भिंतीवरही काहीतरी लिहून ठेवतात. स्वच्छ भिंती किंवा चांगल्या बसेस खराब करून ठेवतात.
आदर्श नागरिक असे कधीच करत नाही. बागेतील हिरवळीवर बसल्यावर उगीचच हिरवळ खुडण्याची त्याला सवय नसते. आदर्श नागरिक राष्ट्रीय हानी होणार नाही असेच वागतो. तो मोर्च्यात जातो पण दगडफेक करून काचा फोडत नाही किंवा वाहनांची जाळपोळ करत नाही.
पाणी अतिशय मौल्यवान वस्तू आहे हे तो जाणतो; म्हणून तो पाणी जपून वापरतो.
पाण्याची उधळपट्टी करत नाही आणि ते प्रदूषितही करत नाही. तसेच वीज देखील तो काटकसरीने वापरतो.
आदर्श नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावायलाही चुकत नाही.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता आदर्श नागरिक मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असतो जर तुम्हाला आदर्श नागरिक मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.