आज आपण बघणार आहोत बदलते पर्यावरण मराठी निबंध. पर्यायवरणाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण जर आपण पर्यायवर्णाची काळजी घेतली तरच पर्यावरण आपली काळजी घेईल आणि जर आपण पर्यावरण खराब केलं तर पर्यावरण देखील आपल्याला कडे दुर्लक्ष करेल म्हणून पर्यावरणाची काळजी घेणं हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. परंतु आजच्या या काळात तस काहीही बघायला मिळत नाही लोकं हे पर्यावरणाला हानी पोहचवताना दिसतात.
बाहेर फिरायला गेल्यावर कचरा करतात, झाडे तोडतात, वायू प्रदूषण जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण करतात जर माणसाने या सर्व गोष्टी वेळीच थांबवल्या नाही तर येणार काळ हा अति भयंकर असेल म्हणून पर्यावरणा विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत Badalte Paryavaran Marathi Nibandh. हा निबंध बऱ्याच वेळा शालेय विद्यार्थ्यांना देखील परीक्षेत विचारला जातो तर शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सर्व करू शकता. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग सुरु करूया बदलते पर्यावरण मराठी निबंध.
बदलते पर्यावरण मराठी निबंध
कोणत्याही प्रगतीचा पहिला बळी हा पर्यावरण असतो.” पर्यावरणाचा ऱ्हास केल्याशिवाय भौतिक प्रगती शक्य नसते. रस्ते ही प्रगतीकरिता आवश्यक गरज आहे. पण जंगल साफ केल्याशिवाय रस्ते कसे बांधता येणार ? शेतांना पाणी देण्यासाठी धरणे बांधावी लागणार. पण तेथेही वृक्षतोड अपरिहार्य आहे. मनुष्यवस्तीसाठी वृक्षतोड केल्याशिवाय जागा मिळत नाही.
पर्यावरणाचाच विचार केला तर प्रगती थांबते. जगात तर प्रगतीसाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. सर्वच देशांना प्रगती करून क्रमांक एकचे प्रगत राष्ट्र बनायचे आहे, भारतालाही. केवळ पर्यावरणाचा विचार केल्याने वेगाने धावणाऱ्या जगात आपण मागे राहू. जगातली महाशक्ती तर सोडाच पण आपण साधी शक्तीही राहणार नाही. बरे, पर्यावरणाचा विचार केला नाही तर आणखीच भीषण जीवन जगण्याची नौबत नशिबी येते. भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे येथे पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसासाठी जंगले आवश्यक आहेत. पण प्रगतीसाठी आम्ही जंगले तोडली. आणि आता जंगले नाहीत म्हणून पाऊस नाही आणि पाऊस नाही म्हणून जंगले नाहीत असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे.
प्रगतीसाठी पर्यावरणाचा -हास केला आणि त्यामुळे आज पर्यावरणच बदलून गेले आहे. ऋतुचक्र बदलले आहे. पावसाळ्यात पाऊस येत नाही. झडीचा पाऊस तर गायबच झालेला. जंगल हेच ज्यांचे निवासस्थान अशा वाघसिंहादी प्राण्यांना संरक्षण देऊनही जगवता येणे कठीण झाले आहे. त्यांचे तर सोडाच पण चिमण्यांसारखी पाखरेही नाहीशी होत चालली आहेत कारण घरटे बांधायला त्यांच्यासाठी झाडेच उरलेली नाहीत. आम्ही प्रगती करायला निघालेले लोक वाळवंटाच्या निर्मितीत गुंतलोय,
पर्यावरण आणि प्रगती यातील समतोल कसा साधायचा, हा सर्वांत गंभीर प्रश्न सर्वच गरीब व प्रगतिशील राष्ट्रापुढे आहे. प्रगतीकडे जातो म्हटले की पर्यावरण बदलते. याचाच अर्थ बदलते वातावरण सर्व जगासाठीच अटळ आहे. पण तरीही पर्यावरण आणि प्रगती यांचा सुवर्णमध्य काढूनच पुढे वाटचाल करावी लागणार आहे. हाच मानवी विकासाचा आजचा मूलमंत्र होय.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता बदलते पर्यावरण मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला बदलते पर्यावरण मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.