मित्रांनो आज आपण बघणार आहोत संगणकाच्या भागांची माहिती मराठी मध्ये. जस कि तुम्हाला माहिती असेल कि संगणक हे विविध भागांनी मिळून बनलेले आहे. ज्याच्यात मुख्य भाग असतात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर. संगणकाच्या ज्या भागांना आपण हाताने स्पर्स करू शकतो त्यांना हार्डवेयर असे म्हटले जाते. संगणकाच्या ज्या भागाला आपण हाताने स्पर्श करू शकत नाही त्यांना सॉफ्टवेयर असे म्हटले जाते.
कार्य करण्याच्या आधारावर संगणकाला १५ विविध भागांमध्ये विभागले गेले आहे. संगणकाचे सगळे पार्ट हे ऑपरेटिंग सिस्टीम सोबत जुडलेले असतात. बिना ऑपरेटिंग सिस्टीम संगणक हे कार्य करू शकत नाही म्हणून तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Computer Parts Information In Marathi सविस्तर सांगणार आहोत.
संगणकाच्या भागांची माहिती
मित्रांनो जर तुम्हाला संगणकाच्या भागांविषयी माहिती नसेल तर तुम्हाला खाली सगळी माहिती हि सविस्तर देण्यात आलेली आहे.
(A) Input Devices
संगणक हे उपयोगकर्त्या ने दिलेल्या इनपुट च्या आधारावरच कार्य करते. संगणकाला इनपुट देण्यासाठी वेग-वेगळ्या प्रकारचे Devices असतात. कीबोर्ड च्या साहाय्याने आपण संगणकाच्या स्क्रीन वर टायपिंग करू शकतो. एका कीबोर्ड मध्ये ८० हुन अधिक बटन्स असू शकतात. कोणत्याही संगणकामध्ये इनपुट Devices तेव्हाच कार्य करते जेव्हा त्यामध्ये सॉफ्टवेयर इन्स्टॉल असते. प्रत्येक इनपुट Devices साठी संगणकामध्ये वेगळे सॉफ्टवेयर असते.
1. Mouse

माउस एका Cursor ला कंट्रोल करतो ज्याच्याद्वारे आपण संगणकाला इनपुट देतो.
याच्या साहाय्याने आपण कोणत्याही फोल्डर ला कॉपी, पेस्ट, मूव्ह किंवा डिलीट करू शकतो.
2. Keyboard

बघायला गेलं तर संगणकाचे खूप सारे इनपुट डिवाइस आहेत परंतु विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कीबोर्ड हे सर्वाधिक वापरले जाणारे इनपुट डिवाइस आहे.
संगणकासोबत कम्यूनिकेट करण्यासाठी कीबोर्ड हे मुख्य साधन आहे. कीबोर्ड हे विविध प्रकारचे असतात. उदाहरणार्थ Standard, Multimedia, Portable आणि Foldable.
3. Scanner

स्कॅनर चे कार्य तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल स्कॅनर हे कागद-पात्रांना स्कॅन करण्याचे कार्य करते. स्कॅनर द्वारे स्कॅन केलेल्या कागद-पात्रांची इमेज किंवा PDF फाईल देखील बनवली जाऊ शकते.
जेव्हा आपण कोणत्याही प्रकार चा ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला आपला फोटो किंवा इत्तर कागदपत्रे हि स्कॅनर द्वारे स्कॅन करावी लागतात. स्कॅन केलेल्या डॉक्युमेंट्स ला तुम्ही ए-मेल द्वारे किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे कुठेही पतहू शकता.
4. Touch Screen

वर्तमान काळामध्ये मोबाईल आणि संगणक हे टच स्क्रीन आले आहेत ज्यांच्यावर आपण आपल्या बोटांच्या साहाय्याने त्यांना कंट्रोल करू शकतो. टच स्क्रीन च्या साहाय्याने आपण कुठलेही कार्य अगदी सहज रित्या व कमी वेळात करू शकतो. जुन्या काळात टच स्क्रीन मोबाईल सोबत एक जॉय स्टिक दिली जात होती जी आपल्या हातच्या बोटांच्या साहाय्याने काम करत होती.
5. Web Cam

वेब कॅमेरा हा संगणकावर लावलेला असतो ज्याचा उपयोग आपण व्हिडीओ कॉल करण्यासाठी किंवा व्हिडीओ बनवण्यासाठी करतो.
आजच्या काळातल्या लॅपटॉप मध्ये वेब कॅमेरा हा इनबिल्ट असतो.
संगणकासाठी वेब कॅमेरा हा वेगळा विकत घ्यावा लागतो.
वेब कॅमेरे हे देखील विविध प्रकारचे असतात.
6. Microphone

गाणे रिकॉर्ड करण्यासाठी आणि आपला आवाज रिकॉर्ड करण्यासाठी मिक्रोफोन ची आवश्यकता असते.
Microphone हे देखील विविध प्रकारचे असतात जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे Microphone घ्यायचे असतील तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात.
आजच्या काळात स्वस्त मायक्रोफोन देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा युट्युब व्हिडीओ बनवण्यासाठी केला जातो.
(B) Output Devices
1. Monitor

आपण ज्या स्क्रीन वर सगळी कार्ये बघतो त्यालाच Monitor असे म्हणतात. हे दिसायला एखाद्या टीव्ही प्रमाणे असते.
संगणकावर केली जाणारी सगळी कामे हि मॉनिटर च्या मदतीनेच पूर्ण होतात.
जर मॉनिटर नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचं इनपुट देऊ शकत नाही किंवा आउटपुट घेऊ शकत नाही.
2. Printer

प्रिंटर च्या साहाय्याने आपण कोणताही फोटो किंवा कोणतेही कागदपत्र एका कागदावर प्रिंट करू शकतो.
प्रिंटर हे वेग-वेगळ्या प्रकारचे असतात आपण छोट्या कागदापासून ते मोठ्या बॅनर पर्यंत सगळं काही प्रिंटर च्या साहाय्याने प्रिंट करतो.
काही प्रिंटर मध्ये शाई चा वापर केला जातो तर काही प्रिंटर मध्ये लेजर वापरले जाते.
3. Speaker

स्पीकर च्या साहाय्याने आपल्याला ऑडिओ ऐकता येतो. संगणकाचे स्पीकर हे वेगळे दिले जातात तर काही संगणकांना स्पीकर हे इनबिल्ट असतात.
पिच्चर चे गाणे, सिरीयल चे ऑडिओ हे आपल्याला स्पीकर च्या माध्यमातूनच ऐकायला मिळतात.
स्पीकर हे देखील वेग-वेगळ्या आकाराचे व विविध क्वालिटीचे असतात.
4. Projector

प्रोजेक्टरच काम हे व्हिडीओ ला मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं असतं.
सिनेमागृहात सिनेमा हा देखील प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवला जातो.
प्रोजेक्टर चा उपयोग हा ऑफिस मध्ये प्रेझेन्टेशन देण्यासाठी सुद्धा केला जातो.
प्रोजेक्टर चे स्पष्ट चित्र दिसण्यासाठी एक सफेद कपड्याचा वापर केला जातो जो एखाद्या स्क्रीन प्रमाणे कार्य करतो.
(C) Storage Devices
Storage Devices च्या साहाय्याने संगणकामधील डेटा हा साचवला जातो.
साधारण भाषेमध्ये याला मेमरी असे देखील म्हटले जाते.
Storage Devices हे देखील वेग-वेगळ्या प्रकारचे असतात. चला तर मग आता जाणून घेऊया स्टोरेज डिवाईज चे प्रकार.
1. Hard Disk

Hard Disk हि संगणकाच्या मध्ये लावलेली असते.
प्रत्येक Hard Disk ची स्टोर करण्याची आपली एक मर्यादा असते उदाहरणार्थ ५०० GB, १ TB इ.
जर तुमचं संगणक हे काही तांत्रिक अडचणीमुळे खराब झालं तरी तुमची हार्ड डिस्क हि खराब होत नाही.
हार्ड डिस्क तेव्हाच खराब होते जेव्हा ती क्रॅक होते. बऱ्याचदा हार्ड डिस्क खराब झाल्यावर सुद्धा त्या मधील डेटा हा पुन्हा मिळवता येतो.
2. Floppy Disk

फ्लॉपी डिस्क चा वापर हा जुन्या काळातील संगणकांमध्ये केला जात होता.
याला संगणकामध्ये टाकता येऊ शकत किंवा काढताही येऊ शकत.
याचा उपयोग देखील डेटा स्टोर करण्यासाठी केला जातो.
3. CD आणि DVD

CD आणि DVD बाजारामध्ये रिकाम्या किंवा भरलेल्या या स्वरूपात मिळतात.
जुन्या काळात या CD आणि DVD चा वापर सिनेमा पाहण्यासाठी, गाणे ऐकण्यासाठी किंवा लग्नाचे व्हिडीओ स्टोर करण्यासाठी केला जात होता.
CD आणि DVD मध्ये डेटा टाकल्यानंत तो डेटा लॉक होता त्याला पार्ट डिलीट किंवा एडिट करता येत नाही.
4. Pen Drive

Pen Drive हि एक सेकंडरी मेमरी आहे ज्याला संगणकाला जोडता येत आणि पुन्हा काढता येत.
पेन ड्राइव्ह ची डेटा साठवण्याची क्षमता हि विभिन्न असते उदाहरणार्थ 8GB, 16GB, 32GB इ.
(D) Processing Devices
1. Mother Board

Mother Board
Mother Board हा संगणकाचा मुख्य भाग असतो ज्यामध्ये खूप सारे सर्किट जोडलेले असतात वरील फोटो मध्ये तुम्ही बघू शकता.
कोणत्याही संगणकाचा मुख्य भाग म्हणजे Mother Board असतो.
संगणकाचे मुख्य हार्डवेयर पार्ट हे Mother Board सोबतच जोडलेले असतात. उदाहरणार्थ ट्रांजिस्टर, डायोड, मेमरी इ.
2. Micro Processor / CPU

कोणत्याही संगणकाची कार्य करण्याची क्षमता हि त्याच्या Micro Processor वर निर्भर असते.
सुपर कंप्युटर मध्ये लाखोंच्या संख्येमध्ये मायक्रो प्रोसेसर असतात.
3. Graphic Card

चांगल्या स्क्रीन रेजोल्यूशन साठी ग्राफिक कार्ड चा वापर केला जातो.
संगणकावर चांगल्या प्रतीचे गेम खेळण्यासाठी चांगले ग्राफिक कार्ड आवश्यक आहे.
4. RAM

RAM चा अर्थ “रँडम ऍक्सेस मेमरी” असा होतो.
हि संगणकाची प्रायमरी मेमरी असते.
RAM जेवढी अधिक असते त्या संगणकाची काम करण्याची क्षमता देखील तेवढीच अधिक असते.
5. ROM

ROM चा अर्थ “रीड ओन्ली मेमरी” असा होतो.
सगळ्या प्रकारचा देता या मेमरीमध्ये स्टोर केला जातो. उदाहरणार्थ सिनेमा, गाणी, PDF इ.
6. Modem

Modem च्या साहाय्याने संगणकाला इंटरनेट सोबत जोडता येते.
संगणकाच्या भागांची माहिती FAQ
लहान ते मोठी प्रक्रिया सीपीयूमध्येच केली जाते, त्याचे कार्य संगणकास योग्यरित्या ऑपरेट करणे आहे. संगणक हा इनपुट युनिट, आउटपुट युनिट आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू) एकत्र करून बनविला जातो. संगणकाद्वारे प्रक्रिया करण्यासाठी सीपीयू प्रामुख्याने तीन युनिट्समध्ये विभागलेले आहे.
मायक्रो कॉम्पुटर तीन प्रकारचे असतात
1) डेस्कटॉप कंप्यूटर (Desktop Computer)
2) लैपटॉप कंप्यूटर (Laptop Computer)
3) पामटॉप कंप्यूटर (Pom top Computer)
सीपीयूला संगणकाचा मेंदू मानला जातो. सीपीयू सर्व प्रकारच्या डेटा प्रोसेसिंग ऑपरेशन्स करतो. हे डेटा, दरम्यानचे निकाल आणि सूचना संचयित करते. यासह, संगणकाच्या सर्व भागांच्या सर्व ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवते.
सीपीयू चा फुल फॉर्म “Central Processing Unit” आहे.
कीबोर्ड हे इनपुट डिवाइस (Input Devices) आहे.
एक कंट्रोल युनिट सीयू सर्किटरी आहे जी संगणकाच्या प्रोसेसरमध्ये ऑपरेशन्स निर्देशित करते. हे संगणकाचे लॉजिक युनिट, मेमरी तसेच इनपुट आणि आउटपुट दोन्ही उपकरणे, प्रोग्रामकडून प्राप्त केलेल्या सूचनांना कसा प्रतिसाद द्यायचा ते सांगते.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती संगणकाच्या भागांची माहिती. मी आशा करतो कि तुम्हाला हि माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखजील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी असेच नवं-नवीन लेख घेऊन येत असतो. जर तुम्हाला संगणकाच्या भागांची माहिती हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते.