Wednesday, November 29, 2023
Homeतंत्रज्ञानसायबर सुरक्षा म्हणजे काय | Cyber Security In Marathi

सायबर सुरक्षा म्हणजे काय | Cyber Security In Marathi

Cyber security (सायबर सुरक्षा) म्हणजे काय – या आधुनिक युगामध्ये संपूर्ण जग हे इंटरनेटच्या मदतीने एक-मेकांसोबत जुडलेलं आहे याच युगामध्ये तुम्ही सायबर गुन्ह्यांच्या खूप साऱ्या गोष्टी आणि सायबर सुरक्षेविषयी ऐकलं असले परंतु तुम्हाला माहिती आहे का कि सायबर सुरक्षा म्हणजे काय आणि आजच्या काळात सायबर सुरक्षा का महत्वाची आहे? जर तुम्हाला सायबर सुरक्षेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लेख संपूर्ण नक्की वाचा कारण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Cyber security विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत Marathi मध्ये.

आजच्या काळात Cyber security हि अत्यन्त महत्वाची आहे कारण आजच्या या काळात टेकनॉलॉजि चा आणि इंटरनेट चा उपयोग हा खूप जास्त वाढला आहे आणि इंटरनेट युजर आपला महत्वाचा डेटा हा विविध प्रकारच्या Devices , Softwares आणि Networks च्या माध्यमातून शेयर करत असतात जो कि पूर्ण पणे सुरक्षित आहे याची काहीच गॅरंटी नाही.

चला तर मग जाणून घेऊया Cyber security in marathi (सायबर सुरक्षा म्हणजे काय)

सायबर सुरक्षा म्हणजे काय (Cyber Security In Marathi)

Cyber Security चा अर्थ हा इंटरनेट च्या सुरक्षेशी जुडलेला आहे जेव्हा तुम्ही इंटरनेट चा वापर करता किंवा इंटरनेट सोबत जुडलेले असतात तेव्हा खूप सारे संकट हे तुमच्यावर असतात कारण हॅकर हे विविध प्रकारांनी सायबर सुरक्षेचं उल्लंघन करून तुमच्या सिस्टीम पर्यंत पोहचू शकतात आणि तुमच्या वयक्तिक माहितीचा दुरुपयोग करू शकता याच संकटाला टाळण्यासाठी सायबर सुरक्षा म्हणजेच Cyber Security चा वापर केला जातो.

Cyber Security चे कार्य हे इंटरनेट सोबत जुडलेले Devices , Softwares , Data आणि नेटवर्क ला सुरक्षा प्रदान करणे हे असते Cyber Security मध्ये तुमच्या Network , Devices , Softwares आणि तुमच्या डेटा ला सुरक्षित ठेवले जाते.

सायबर सुरक्षेची व्याख्या (Cyber Security Definition In Marathi)

Cyber Security kay aahe

Cyber Security हि इंटरनेट सोबत जुडलेल्या सिस्टीम ची सुरक्षा असते जी Devices , Hardwares , Softwares आणि Data ला सायबर गुन्ह्यापासून वाचवण्यास मदत करते सोप्या भाषेत साइबर सुरक्षा सिस्टम, नेटवर्क आणि प्रोग्राम्स ला डिजिटल हमल्यापासून वाचवणे आणि त्याची रक्षा करणे याचा अभ्यास आहे.

सायबर सुरक्षेचे प्रकार (Types Of Cyber Security In Marathi)

सायबर सुरक्षा डिजिटल हंल्यांपासून कंप्यूटर, सर्वर, मोबाइल डिवाइस, इलेक्ट्रॉनिक सिस्टम, नेटवर्क आणि डेटा ला वाचवणारा एक अभ्यास आहे सायबर सुरक्षेला Information Security /Information Technology Security किंवा इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन सिक्योरिटी सुद्धा म्हटले जाते.

सायबर सुरक्षेमध्ये डेटा ला सुरक्षित ठेवण्यासाठी वेग-वेगळ्या तत्वांचा (elements) चा वापर केला जातो, सायबर मध्ये सुरक्षा वेग-वेगळ्या तत्वांद्वारा नेटवर्क ला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान केली जाते Cyber Security हा एक महत्वपूर्ण विषय आहे ज्याचे वेग-वेगळे प्रकार असतात ते प्रकार तुम्हाला खाली सविस्तर समजावून सांगितले आहे.

1. सूचना सुरक्षा (Information Security)

Information Security या सायबर सुरक्षेच्या प्रकारामध्ये डेटा ला सुरक्षित ठेवणे, त्याला डिजिटल हल्ल्यापासून वाचवणे हा मुख्य उद्देश असतो तो स्टोर डेटा असो किंवा प्रवाहित डेटा असो दोन्ही डेटांना सुरक्षित ठेवण्याचे काम या प्रकारांमध्ये केले जाते.

2. ईमेल सुरक्षा (Email Security)

ईमेल ला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ईमेल वर होणाऱ्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी विविध प्रकारचे Email Security Devices किंवा Softwares चा वापर केला जातो.

3. नेटवर्क सुरक्षा (Network Security)

यांच्यामध्ये नेटवर्क ची Incoming किंवा Outgoing ट्रैफिक म्हणजेच नेटवर्क वरून येणाऱ्या-जाणाऱ्या ट्राफिक ला कंट्रोल किंवा त्याचे व्यवस्थापन केले जाते ज्यामध्ये नेटवोर्क मध्ये येणारे Attacks आणि Threats ला रोखले जाते आपण या सुरक्षिततेस नेटवर्कचा पहिला थर देखील म्हणू शकता.

4. एप्लीकेशन सुरक्षा (Application Security)

यामध्ये सॉफ्टवेयर आणि Devices ला Threats पासून वाचवण्याचा अभ्यास केला जातो जेवढे ऍप्लिकेशन नेटवर्क मध्ये वापरले जातात त्यांच्या development आणि installation Phase वर अधिक लक्ष दिले जाते. Application Security मध्ये Applicationns डेवलपमेंट च्या दरम्यान त्यांच्या सुरक्षे बद्दल अधिक लक्ष दिले जाते आणि इंस्टालेशन च्या दरम्यान देखील याच्यावर विशेष लक्ष दिले जाते.

5. डाटा लॉस प्रिवेंशन (Data Loss Prevention)

या प्रक्रियेमध्ये डेटा ला सुरक्षित ठेवले जाते आणि एनकोड देखील केले जाते ज्याच्या साहाय्याने कुठल्याही प्रकारचा डेटा चोरी होऊ नये किंवा लीक होऊ नये यावर लक्ष दिले जाते.

6. नेटवर्क एक्सेस कंट्रोल (Network Access Control)

हि कोणत्याही युजर ला नेटवर्क सोबत जुडण्याची सुरक्षित प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये Users च्या Roles अनुसार नेटवर्क सोबत जुडण्यासाठी पॉलिसी बनवून दिली जाते. ज्या कारणाने दुसरा कोणताही युजर त्या नेटवर्क सोबत जादू शकत नाही कारण येथे नेटवर्कशी कनेक्ट करण्याचे अधिकार मर्यादित आहेत.

Cyber Security का महत्वाची आहे (Why Cyber Security Is Important)

आजच्या या आधुनिक युगात खूप सारे लोकं हे इंटरनेटचा वापर करत आहेत आणि आपला वयक्तिक डेटा हा देखील इंटरनेट वर शेयर करत आहेत आणि जर आपण बघायला गेलं तर इंटरनेट हे पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही इंटरनेट युजर च्या एका छोट्याश्या निष्काळजीपणा मुले त्याची वयक्तिक माहिती हि धोक्यात पडू शकते.

आजच्या काळात सरकार, मिल्टरी, कॉर्पोरेट, फाइनेंशियल आणि मेडिकल यांसारख्या संस्था देखील इंटरनेट आणि टेकनॉलॉजि चा जास्त प्रमाणात वापर करत आहे आणि या सर्व संथांचा डेटा हा अधिक संवेदनशील असतो ज्या कारणाने या संस्थांना आपला डेटा साइबर सुरक्षा विशेषज्ञच्या मदतीने कायम सुरक्षित ठेवावा लागतो.

साइबर सिक्योरिटी च्या मदतीने इंटरनेट वर उपस्थित सर्व डेटा हा सुरक्षित ठेवला जाऊ शकतो आणि त्या सगळ्या डेटा ला चोरी होण्यापासून देखील वाचवले जाऊ शकते.

जशे-जशे दिवस हे पुढे चालले आहे तसा-तसा इंटरनेटचा उपयोग हा देखील वाढत चालला आहे आणि या वाढत्या इंटरनेट च्या उपयोगामुळे इंटरनेट वर डिजिटल डेटाच प्रमाण देखील वाढत चाललं आहे आणि जसा-जसा हा डेटा वाढत चालला आहे तस त्याच्या सुरक्षेचं काम देखील वाढत चाललं आहे म्हणून, डेटा संरक्षित करण्यासाठी, सायबर सुरक्षा उत्पादने आणि सेवा अत्यंत आवश्यक आहेत.

सायबर हल्ल्याचे प्रकार (Types Of Cyber Attacks In Marathi)

जगामध्ये जेवढे सायबर हल्ले होतात ते सगळे वेग-वेगळ्या प्रकारचे असतात बदलत्या टेकनॉलॉजि सोबतच साबार हल्ल्यांचे देखील नवं-नवीन प्रकार हे समोर येत आहेत.

1. मालवेयर (Malware)

मालवेयर (Malware) अटैक साइबर हल्यांच्या सामान्य प्रकारांमधील एक आहे Malicious (विद्वेषपूर्ण) सॉफ्टवेयर ला मालवेयर असे म्हटले जाते.

Malware हे हॅकर्स द्वारा बनवलेला अतिशय घातक असा कॉम्पुटर सॉफ्टवेर प्रोग्रॅम आहे जो कि इंटरनेट युजर ला त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या सिस्टीम ला खराब करण्या हेतू बनवला गेला आहे.

मालवेयर चे देखील विविध प्रकार असतात –

  • बॉटनेट्स
  • एडवेयर
  • रैनसमवेयर
  • स्पाई-वेयर
  • ट्रोजन्स
  • वायरस

2. जीरो डे (Zero-Day)

हा सायबर हमल्याचा एक असा प्रकार आहे कि ज्यामध्ये Loopholes शोधून त्याला निशाणा बनवलं जात या अटॅक मध्ये सॉफ्टवेयर ला ला निशाणा बनवून सायबर अपराध्यांकडून त्या सॉफ्टवेयर सोबत छेड-छाड केली जाते.

3. एस क्यू एल इंजेक्शन (SQL Injection)

SQL (structured language query) injection हा सायबर हल्य्याचा असा एक प्रकार आहे कि ज्यामध्ये साइबर अपराधी यूजरच्या डेटाबेस मधून डेटा चोरतात किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवतात.

युजर च्या डेटाबेस मध्ये काही कमीपणा सापडून अपराधी काही विद्वेषपूर्ण SQL queries आणि कोड च्या माध्यमाने युजरच्या डेटाबेस पर्यंत पोहोचतात आणि तो डेटा चोरतात किंवा त्या डेटा वर नियंत्रण मिळवतात.

4. डेनियल-ऑफ़-सर्विस अटैक (Denial-of-service attack)

या सायबर हल्ल्यात, सायबर गुन्हेगार वापरकर्त्याची किंवा संस्थेची प्रणाली आणि नेटवर्क यांना कार्य करण्यापासून थांबवतात Denial-of-service attack या सायबर हल्ल्यामध्ये साइबर क्रिमिनल एक कंप्यूटर सिस्टम ला ट्राफिक सोबत नेटवर्क आणि सर्वर क्रॅश करून वैध विनंत्या थांबवू शकतो या हमल्याने सायबर अपराधी सिस्टम ला निकामी बनवू शकतात आणि कोणत्याही संस्थेचे किंवा व्यक्तीचे महत्वपूर्ण काम थांबवू शकतात.

5. फिशिंग (Phishing)

फिशिंग (Phishing) हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये सायबर अपराधी युजर ला Fake Email किंवा Fake SMS च्या माध्यमाने लिंक पाठवतो ज्याच्याने सायबर अपराधी युजर च्या वैयक्तिक माहितीला चोरू शकतो उदाहरणार्थ Login ID , Password , Credit Card / Debit Card ची डिटेल इ.

6. मैन-इन-दी-मिडिल अटैक (Man-in-the-middle attack)

हा एक सायबर अटॅकचा प्रकार आहे ज्यात एखादी व्यक्ती सायबर गुन्हेगारी नेटवर्कशी छेडछाड करुन आणि त्याद्वारे संवाद साधून दोन लोकांमधील संप्रेषण घेते.आपण करतो, ज्याबद्दल वापरकर्त्याला जाणीव देखील नसते.

सायबर हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवावे ?

मित्रांनो जस कि आपण सगळ्यांना माहिती आहे कि इंटरनेट आणि टेकनॉलॉजि चा वापर हा वाढतच चालला आहे म्हणूनच सायबर हल्ल्याच्या केस या देखील वाढत चालल्या आहे इंटरनेट वर जेवढी संख्या चांगल्या लोंकाची आहे त्या पेक्षा जास्त संख्या हि वाईट लोकांची आहे हे लोकं कायम युजर चा डेटा चोरण्याचा आणि त्यांच्या सिस्टीम ला क्रॅश करण्याचा विचार करत असतात.

अटैकर्स (Attackers) जास्तीत-जास्त अशा लोकांना आपली शिकार बनवतात ज्यांच्याकडे टेक्निकल गोष्टींचं किंवा सायबर सुरक्षेचं नॉलेज नसतं.

जे लोकं इंटरनेटचा वापर करताना सावध नसतात किंवा कोणत्याही फेक मेसेज वर किंवा वेबसाईट वर भरोसा ठेवतात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आपली वैयक्तिक माहिती शेयर करतात असे लोकं हे कायम सायबर हल्ल्यांचे शिकार बनतात.

Cyber Attacks पासून वाचण्यासाठी आम्ही ज्या साइबर सुरक्षा टिप्स (Cyber Safety Tips) सांगणार आहे त्यांना नक्की फॉलो करा.

1. एंटी वायरस सॉफ्टवेयर चा वापर करा

कायम आपल्या सिस्टीम मध्ये एंटी वायरस सॉफ्टवेयर चा वापर नक्की करा एंटी वायरस सॉफ्टवेयर आपल्या सिस्टीम मध्ये व्हायरस ला येण्यापासून रोखतो आणि फेक वेबसाईट आणि प्रोग्रॅमला देखील ब्लॉक करून टाकतो एंटी वायरस सॉफ्टवेयर तुमच्या सिस्टीम मध्ये असलेल्या वायरसला देखील काढून टाकतो आणि तुमच्या सिस्टीम ची सुरक्षा हि वाढवतो.

2. सॉफ्टवेयर आणि ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करा

तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये जे कोणते सॉफ्टवेयर वापरत असाल त्या सॉफ्टवेयर ला नेहमी नवीन व्हर्जन मध्ये अपडेट करत राहा आणि तुमची सिस्टीम ज्या कोणत्या OS (Operating System) वर काम करते त्याला देखील अपडेट करा म्हणजेच नवीन व्हर्जन चा वापर करा.

जस कि तुम्हा सर्वाना माहिती असेल कि सॉफ्टवेयर आणि ऑपरेटिंग सिस्टमला कोडिंग च्या साहाय्याने बनवले जाते आणि जेव्हा हे सॉफ्टवेयर कंपनी द्वारा अपडेट केलं जात तेव्हा त्या मध्ये नवीन कोड चा समावेश केला जातो आणि जेव्हा कोणत्याही सॉफ्टवेयर मध्ये नवीन कोड टाकला जातो तर तो कोड जुन्या कोड पेक्षा चांगला असतो म्हणजेच त्याची सुरक्षा हि जुन्या कोड पेक्षा अधिक असते.

जेव्हा कोणत्याही सॉफ्टवेयरचे लेटेस्ट व्हर्जन येते तेव्हा त्याच्या जुन्या व्हर्जनला सायबर अपराध्यांकडून हॅक केले जाऊ शकते म्हणून तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल Softwares आणि ऑपरेटिंग सिस्टम्स नेहमी अपडेट करत राहा.

3. अनोळखी ई-मेल उघडू नका

जर तुम्हाला अनोळखी ई-मेल वरून ईमेल अटैचमेंट आली असेल तर त्याला कधीही उघडून बघू नये कारण त्यामध्ये वायरस देखील असू शकतो आणि तुमचा डेटा चोरण्याचा हा सायबर अपराध्यांचा सापळा देखील असू शकतो.

4. सशक्त (Strong) पासवर्ड चा वापर करा

लॉगिन सिस्टीम मध्ये कायम मजबूत पासवर्ड चा वापर करा तुम्हाला असा एखादा पासवर्ड बनवायचा आहे ज्याचा कोणीही अंदाज लावू शकणार नाही , आपण बनवलेला पासवर्ड हा नेहमी गुप्त ठेवावा आणि तो पासवर्ड कोणासोबतही शेयर करू नये.

पासवर्ड बनवताना आपलं नवं, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादी गोष्टींचा वापर करू नये कारण अशा पासवर्ड ला क्रॅक कारण हे अतिशय सोपं असत. एक मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी त्यामध्ये Special Characters , Symbols , Letters , Numbers चा वापर करावा आणि बनवलेला पासवर्ड हा थोड्या-थोड्या दिवसांनी बदलत राहावा.

5. असुरक्षित WIFI नेटवर्क चा वापर करू नये

आपण जेव्हा कुठे बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरायला जातो तेव्हा आपल्याला बरेच फ्री WIFI बघायला मिळतात आपण त्या WIFI networks ला कनेक्ट देखील होतो परंतु असे WIFI networks हे असुरक्षित असतात याच्याने तुम्ही man-in-the-middle attack चे शिकार बनू शकतात म्हणून असुरक्षित WIFI Networks ला आपल्या सिस्टीम सोबत जोडू नये.

6. अनोळखी ई-मेल वरून आलेल्या लिंक वर क्लिक करू नये

एका इंटरनेट युजरला असे मेल कायम येत असतात ज्यामध्ये लिहिलेलं असत कि तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागली आहे किंवा कोणत्याही बँकेशी संबंधित मेल येतात जे तुम्हाला पैशाची लालच देतात आणि खूप वेळा तर तुम्हाला नौकरी लागली असेही सांगतात अशा प्रकारच्या मेल मध्ये तुम्हाला खाली एक लिंक दिलेली असते ज्या लिंक मध्ये वायरस देखील असू शकतो म्हणूनच कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नये.

Cyber Security FAQ In Marathi

सायबर सुरक्षा का महत्वाची आहे ?

सायबर सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे कारण आपला संवेदनशील डेटा, वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती, संरक्षित आरोग्य माहिती, वैयक्तिक माहिती, बौद्धिक मालमत्ता आणि डेटा चोरीचे संरक्षण करणे आणि सायबर गुन्हेगारांपासून डेटाचे संरक्षण करणे हे एक सराव आणि तंत्र आहे.

सायबर अपराध चे उद्देश काय आहे ?

सायबर क्राइम हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्कचा समावेश आहे. संगणकीय गुन्हे, माहिती चोरी करणे, माहिती पुसून टाकणे, माहिती हाताळणे, दुसर्‍यास माहिती देणे किंवा संगणक भाग चोरी करणे किंवा नष्ट करणे यासारखे अनेक उद्दिष्ट सायबर अपराधाचे आहेत.

कोणते सॉफ्टवेयर आपल्याला साइबर थ्रेट पासून वाचवू शकते ?

फायरवॉल हे एक असे सॉफ्टवेयर आहे जे आपल्याला साइबर थ्रेट पासून वाचवू शकते.

साइबर डोम परियोजना काय आहे ?

सायबरडोम प्रोजेक्टला विविध गुप्तचर संस्थांचे एक विशाल समाकलित नेटवर्क मानले जाते. एजन्सी एकत्र येण्यामुळे आंतर-एजन्सी समन्वय आणि समर्थन अधिक चांगले होईल. यामुळे या प्रकल्पाच्या यशाची व्याप्ती वाढू शकते. विविध शैक्षणिक आणि शिक्षण संस्था देखील विस्तारित प्रकल्पाचा एक भाग आहेत.

राष्ट्रीय साइबर क्राइम हेल्पलाइन नंबर कोणता आहे ?

जलद कारवाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य व अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. कृपया आपत्कालीन परिस्थितीत किंवा सायबर गुन्ह्यांव्यतिरिक्त इतर गुन्ह्यांचा अहवाल देण्यासाठी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. राष्ट्रीय पोलिस हेल्पलाईन क्रमांक 100 आहे.

भारतातील सायबर सिक्युरिटीशी संबंधित कोणते मुद्दे आणि आव्हाने आहेत?

डिजिटल संरक्षण आणि गोपनीयता संरक्षणासाठी मजबूत कायद्यांचा अभाव आहे. सध्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक संस्था आहेत. परंतु मोठ्या सायबर सुरक्षेच्या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी समन्वित केंद्रीकृत यंत्रणेचा अभाव आहे.

हे देखील बघा
संगणकाच्या भागांची माहिती
संगणकाचा इतिहास

अंतिम शब्द

तर मित्रांनो हे होत सायबर सुरक्षा म्हणजे काय (Cyber Security In Marathi) मी आशा करतो कि तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि तुम्हाला सायबर सुरक्षेविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा कारण सायबर सुरक्षे बाबत जाणून घेणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. लेख शेयर करण्या सोताच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला सायबर सुरक्षा म्हणजे काय या लेखाविषयी अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे निवारण नक्की करू. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

4 Comments

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments