मित्रांनो आज आपण बघणार आहोत दृष्टतेचा परिणाम वाईट असतो मराठी गोष्ट आपण जर या समाजासोबत चांगलं वागलं तर समाज देखील आपल्याला चांगली वागणूक देईल म्हणून आपण या जगात वावरताना नेहमी खऱ्याची साथ दिली पाहिजे या गोष्टी मध्ये देखील आपल्याला हेच समजवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया दृष्टतेचा परिणाम वाईट असतो मराठी गोष्ट.
दृष्टतेचा परिणाम वाईट असतो
दोन पंडित दक्षिणेच्या लालसेने एका शेटजीच्या घरी गेले. विद्वान समजुन शेटजीने त्यांचा चांगला पाहुणचार केला. त्यातील एक पंडित आंघोळीला गेला. त्यावेळी शेटजी दुसऱ्या पंडिताला म्हणाले, महाराज, तुमचा साथीदार मोठा विद्वान वाटतो. पंडितजीच्या मनात येवढी उदारता कुठे होती की दुसऱ्याची प्रशंसा ऐकावी. तो तोंड वाकडे करून म्हणाला,”विद्वान तर त्याच्या जवळ उभे राहत नाही, तो तर बैलोबा आहे. शेटजी गप बसले. ज्यावेळी पंडित आंघोळ करून संध्या करायला बसले त्यावेळी शेटजी पहिल्या पंडिताला म्हणाले, महाराज, तुमचा साथीदार फारच विद्वान वाटतो.” दृष्ट पंडित मनातील वाईट विचार दाखवित म्हणाला ,”अरे, विद्वान – बिद्वान काही नाही तो तर कोरा गाढव आहे.”
भोजनाच्या वेळी एका समोर गवत आणि दुसऱ्याच्या समोर भुसा ठेवला. पंडितजींनी ते पाहिल्यावर क्रोधीष्ट झाले आणि म्हणाले, शेटजी, आमचा असा अपमान, येवटी निष्ठुरता.
शेटजी हात जोडून म्हणाले, “तुम्हींच तर एकमेकांना बैल आणि गाढव मानतात म्हणून मी बैलाला आणि गाढवाला योग्य ते खाणे तुमच्या समोर ठेवले. तुम्हीच सांगा त्याच्यात माझी काय चूक आहे. मी तर तुम्हाला विद्वान समजत होतो. परंतु वास्तविक गोष्ट तुम्ही स्वःतच सांगितली.
शेटजीचे म्हणणे ऐकून पंडितजी शरमिंदा झाले आणि त्यांना फारच पश्चाताप झाला. वास्तविक जो आपल्या साथीदाराला मोठे झालेले पाहू शकत नाही तो कसा मोठा होऊ शकतो. स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी आपल्या साथीदाराचा मोठेपणा वाढवून सांगणे अतिशय जरूरीचे असते. दृष्ट मनुष्याची त्यांच्यासारखी स्थिती होते.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती दृष्टतेचा परिणाम वाईट असतो मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण दुसऱ्याविषयी कधी वाईट बोलू नये नाहीतर आपलं देखील वाईटच होत.आम्ही आशा करतो कि तुम्हाला दृष्टतेचा परिणाम वाईट असतो मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.