एकीची ताकद मराठी गोष्ट | Stories For Kids In Marathi
मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकीची ताकद मराठी गोष्ट जर आपण कोणताहि काम एकत्र मिळून केलं तर ते काम कमी वेळात आणि लवकर पूर्ण होत पण तेच काम जर आपण एकट्या ने करायला गेलं तर त्याला खूप वेळ लागतो तर आज आपण याच विषयावर गोष्ट बघणार आहोत गोष्ट आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया एकीची ताकद मराठी गोष्ट.
एकीची ताकद
आपल्या देशात अशी अनेक शहरे आणि गावे आहेत की ज्या ठिकाणी थोडीशी झाडे आहेत. जर अशा ठिकाणी गाई-बैल थोडेसे असतील आणि शेणही थोडेच असेल तर स्वयंपाक करायला लाकडे फार कष्टाने मिळतात.
एक लहानसा बाजार होता. त्याच्या अवतीभोवती थोडीशी झाडे होती. बाजारात शेतकऱ्यांची घरे नसल्यामुळे गायी-बैल थोड्याच प्रमाणात होती. जाळायला लागणारी लाकडे तिथल्या लोकांना विकत घ्यावी लागायची. दोन-तीन दिवस पाऊस पडल्यामुळे गावांतील कोणी मजूर बाजारात लाकडे विकण्यासाठी आले नव्हते, त्यामुळे घरांत स्वयंपाक करण्यासाठी इंधन नव्हते.
त्या गावांतील दोन मुले जी सख्खी भावंडे होती ती आपल्या घरासाठी सुके लाकूड घेण्यासाठी बाहेर पडली. त्यांचे वडील घरी नव्हते. त्यांची आई सुक्या लाकडांशिवाय स्वयंपाक कसा तयार करील आणि पोरांना काय खायला घालील. दोन्ही मुले वडीलांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाजवळ गेली. त्याठिकाणी आंब्याच्या झाडाची मोठी सुकलेली फांदी तुटून लटकत खाली पडली होती.
मोठा मुलगा म्हणाला, लाकूड तर मिळाले परंतु ते आपण कसे घेऊन जाणार?” परंतु ते तरी काय करणार. मोठा मुलगा दहा वर्षाचा होता आणि धाकटा मुलगा आठ वर्षाचा होता. येवढे मोठे लाकूड त्यांना उचलत नव्हते.
येवढ्यात लहान मुलाने पाहिले की सुक्या लाकडाच्या खाली एक पांढरा किडा मेलेला होता. पुष्कळशा मुंग्या त्याला घेऊन जात होत्या. लहान मुलगा ओरडला, अरे भाऊ, हे काय आहे?
मोठ्या भावाने सांगितले की मुंग्या किड्याला घेऊन जात आहे. छोटा भाऊ म्हणाला, येवढ्या लहान मुंग्या किड्याला कश्या घेऊन जातील.
” मोठ्या भावाने सांगितले की पहा, केवढ्याशा मुंग्या, त्या सर्व मिळून किड्याला घेऊन जातात. पुष्कळशा मंग्या मेलेल्या सापाला पण सरपटत घेऊन जातात. मुंग्या किड्याला हळूहळू सरकवत होत्या. किडा मोठा होता. काही वेळा दहा-पाच मुंग्या त्याच्याखाली चिरडत होत्या. लगेच दुसऱ्या मुंग्या किड्याला हलवून खाली दबलेल्या मुंग्यांना बाहेर पाडत होत्या. काळ्या लहान मुंग्या थकत नव्हत्या. मुलांनी पाहिले की किड्याला मुंग्यांनी सरकवत नेले.
लहान मुलाला आनंद झाला. तो टाळी वाजवत उड्या मारु लागला. नंतर तो आंब्याच्या सुक्या फांदीवर जाऊन बसला आणि बोलला, आपण सुद्धा मुंग्याप्रमाणे प्रयत्न करु. तू जाऊन मित्रांना बोलावून आण. मी या ठिकाणी बसतो आपण सर्व मुले मिळून फांदी घेऊन जाऊ.”
मोठा मुलगा बाजारात गेला आणि मित्रांना बोलावून घेऊन आला. सर्व मुलांनी त्या झाडाच्या फांदीला हलविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मग सर्वांनी मिळून त्या फांदीचे ओंडके केले आणि ते घरापर्यंत पोहचविले.
त्याच्या आईने मुलांना बसविले. तिने सर्वांना मिठाई दिली आणि म्हणाली, “मुलांनो, एकीमध्ये शक्ती असते. तुम्ही सर्वजण मिळून कठिणांत कठिण काम करा आणि तुम्ही सर्वजण जर एकत्र राहिलात तर कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. एकत्र राहून तुम्ही लोकांची मने आनंदीत कराल आणि तुमचे काम पण सरळ होईल.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती एकीची ताकद मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते यावर मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो जर आपण एक बारीक काडी घेतली तर तिला आपण लगेच मोडू शकतो परंतु आपण जर बऱ्याच काड्या घेतल्या तर त्यांना आपण मोडू शकत नाही यालाच म्हणतात एकीचे बळ.आम्ही आशा करतो कि तुम्हाला एकीची ताकद मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.