मित्रांनो आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत होळी का साजरी करतात म्हणजेच Holi Information In Marathi. होळी हा एक आनंदाचा सण आहे आपल्या सर्वाना तर माहीतच आहे कि होळी केव्हा असते परंतु आपल्याला हे माहिती आहे का कि होळी का साजरी केली जाते? नसेल माहिती तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला होळी विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. जर आपण होळीचा नाव देखील ऐकलं तर आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्या मनात आनंदाची भावना निर्माण होते. होळी हा एक रंगांचा सण आहे ज्या मध्ये लहान मुलांपासून तर वृद्धा पर्यंत सगळेच सहभागी होतात व या सणाचा आनंद लुटतात.
प्रत्येक व्यक्ती या सणाच्या दिवशी आनंदात असतो आणि हा सण अगदी आनंदात साजरा करतो. म्हणून या सणाला आनंदाचा सण म्हणून देखील ओळखले जाते. कदाचित आपल्या भारतासारखा असा एकही देश नसेल जो प्रत्येक सणाचा आनंद सगळ्यांसोबत मिळून बंधू भावाने घेत असेल. हा सण हिंदू धर्माचा अतिशय पवित्र आणि मुख्य सण आहे. परंतु सगळ्या धर्माचे लोकं या सणाला अतिशय आनंदाने साजरा करतात. म्हणून भारताला एकोप्याचा देश म्हणून देखील ओळखले जाते कारण येथील सगळ्या धर्माचे लोकं प्रत्येक सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये साजरा केला जाणारा प्रत्येक सण या मागे काही न काही पौराणिक कारण आणि सत्य कथा लपलेली असते. अशाच प्रकारे होळी साजरी करण्यामागे देखील बऱ्याच कथा आहेत. त्याच आपण आज बघणार आहोत.
होळी का साजरी करतात – Holi In Marathi
मित्रांनो जसे कि आम्ही तुम्हाला सांगितले कि भारतीय संस्कृतीत जेवढे सण साजरे केले जातात त्या प्रत्येक सणामागे काही न काही पौराणिक कथा असते. होळी मागे देखील अश्याच पौराणिक कथा आहेत. त्यापैकी सर्वात पहिली कथा म्हणजे प्रल्हादा आणि त्याची भक्ती आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक शक्तिशाली अशूर असायचा त्याला ब्रह्मदेवांनी असे वरदान दिले होते कि त्याला कोणताच मनुष्य किंवा प्राणी मारू शकत नाही. न कुठल्या अस्त्र ने न कुठल्या शस्त्राने, ना घरामध्ये न घराच्या बाहेर, न पृथ्वी वर न ब्रह्मांडात. असे त्याला वरदान ब्रम्हदेवाकडून मिळाले होते.
त्याला इतकी शक्ती मिळाली होती कि या अफाट शक्तीमुळे आशूर अहंकारी बनला होता आणि स्वतःला खूप महान समजत होता सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तो स्वतःला देवाच्या जागेवर मानत होता. तो त्या राज्यामध्ये सर्व लोकांना त्रास देत असायचा त्यांचा छळ करायचा. जर कोणता व्यक्ती भगवान विष्णू ची उपासना करत असायचा तर हा असुर त्याला मारून टाकायचा. त्याच्या राज्यात त्याने भगवान विष्णूची उपासना करण्यास मनाई केली होती. तो लोकांना स्वतःची पूजा करायला सांगायचं त्याचे कारण असे कि भगवान विष्णूनी त्या असुराच्या छोट्या भावाचा वध केला होता.
हिरण्यकश्यपला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता. प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता तो आपल्या वडिलाच्या बोलण्याविरुद्ध वागून भगवान विष्णूंची पूजा करायचा. हिरण्यकश्यप एवढा क्रूर होता कि त्याला घाबरून सगळे लोकं त्याला देव म्हणायला लागले. त्या राज्यात फक्त एक व्यक्ती असा होता जो हिरण्यकश्यप ला देव मानत नव्हता तो म्हणजे त्याचा पुत्र प्रल्हाद. हिरण्यकश्यप आपल्या मुलाला खूप बोलायचा त्याने आपल्या मुलाने भगवान विष्णूची भक्ती करू नये या साठी खूप प्रयत्न केले पण तो प्रत्येक वेळी अपयशी ठरला. याच कारणामुळे त्यांनी आपल्या मुलाचा वध करण्याचा निश्चय केला. या कामाला करण्यासाठी त्याने आपल्या बहिणीची सहायता मागितली. त्याच्या बहिणीचे नाव होते होलिका.
होलिकाला सुद्धा भगवान शिव कडून एक वरदान प्राप्त झाले होते त्या वर्दनामध्ये तिला एक वस्त्र मिळालं होत. जेव्हा पर्यंत होलिकाच्या अंगावर ते वस्त्र राहील तो पर्यंत तिला कोणीही जाळू शकत नाही. असे वरदान तिला भगवान शिव कडून मिळाले होते. हिरण्यकश्यप ने एक सापळा रचला आणि होलिकेला असा आदेश दिला कि ती हिरण्यकश्यप चा पुत्र प्रल्हाद याला मांडीवर घेऊन आगीत बसावं. जेव्हा होलिका प्रल्हाद ला मांडीवर घेऊन आगीत बसली तेव्हा प्रल्हाद भगवान विष्णूचा जप करत होता. असं म्हणतात ना कि आपल्या भक्तांची रक्षा करणं हे देवाचं खूप मोठं कर्तव्य असत.
म्हणून भगवान विष्णू ने देखील एक सापळा रचला. त्याच्यात एक प्रचंड मोठं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये होलिकाच्या अंगावरचा कपडा उडून गेला. आणि आगीत न जाळण्याचा वरदान देखील त्या कपड्यासोबत उडून गेलं. आणि होलिका त्या आगीत जळून भस्म झाली. आणि दुसरीकडे तिच्या मांडीवर बसलेला प्रल्हाद त्याला अग्निदेवाने स्पर्श देखील केला नाही. होळीच्या दिवशी होळीचा दहन केलं जात ज्याच्यात लाकडं, गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या ह्या टाकल्या जातात. आणि होळी भोवती चकरा मारून आपल्या मध्ये असणारे वाईट विचार या होळीत जाळून टाकतात. आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन दिवसाची सुरुवात करतात.
होळी उत्सवाचा इतिहास
होळी चा सण हा आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक मान्यतेमुळे प्राचीन काळा पासून साजरा करण्यात येतो. याचा उल्लेख पौराणिक पुस्तकं जस पुराण, दसकुमार चरित, संस्कृत नाटक, रत्नावली यांच्यात देखील करण्यात आलेला आहे. होळी विषयी लोकांच्या मनात खूप श्रद्धा आणि भावना आहे. म्हणून होळीच्या दिवशी लोक वेग-वेगळ्या ठिकाणी होळी दहनाची तयारी करत असता. ते लाकडं, गौऱ्या अशे ज्वलनशील पदार्थ एकत्र करतात आणि होळीचं दहन करतात. बरेचशे लोकं आपल्या घराची साफ-सफाई देखील करतात आणि स्वादिष्ट पंच पकवान देखील बनवतात.
होळी संपूर्ण भारतातील हिंदू धर्माच्या लोकांसाठी एक खूप मोठा उत्सव आहे. जर आपण या आधीच्या होळी सना बद्दल जर बोलायला गेलं तर आधीच्या काळात होळी विवाहित महिला पौर्णिमेची पूजा आणि सोबतच आपल्या परिवाराच्या सुखा साठी साजरा केला जात होता. होळी हिंदू धर्मासाठी एक सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सव आहे. जशी आम्ही तुम्हाला होळी का साजरी केली जाते याची एक पौराणिक कथा सांगितली. त्या होलिका शब्दावरूनच होळी या नावाची सुरुवात झाली. होळीचा सण मुख्य स्वरूपात भारतात (आर्याव्रत) लोकांकडून साजरा केला जातो. परंतु त्याच्यामागे देखील एक मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे होळी हा उत्सव फक्त रंगांचा नव्हे तर प्रेमाचा आणि आपुलकीचा देखील आहे. जस आपण होळीत रंग खेळताना विविध रंगांचा वापर करतो, तसाच आपण समाजात राहून सगळ्यांशी प्रेमाने व आपुलके ने राहील पाहिजे.
होळीच्या दिवशी काय करायचं
- होळीचा दिवस सेंद्रिय आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा. ‘‘ फूड डाई.
- होळीच्या दिवशी अशे कपडे घाला, ज्याने तुमचं पूर्ण शरीर झाकलं जाईल. म्हणजेच रासायनिक रंगा पासून तुमच्या शरीराचा बचाव होईल.
- आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि केसांवर तेल लावा जेणेकरून आंघोळ करताना आपण रंगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ते सहजतेने मुक्त होतील.
- आपल्या केसांना रुमालाने किंवा टोपीने झाक जेणे करून केसांचा बचाव होईल.
- रंग खेळल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास झाला तर लगेच जवळील रुग्णालयात जा..
होळीच्या दिवशी काय नाही करायचं
- इतर कोणावरही रंग लादू नका किंवा ते प्राण्यांवर लावू नका, ज्याप्रमाणे हे रंग आपल्यासाठी घातक आहेत, त्याच प्रकारे ते देखील प्राण्यांसाठी तितकेच धोकादायक आहेत.
- रसायनांनी बनविलेले रंग किंवा कृत्रिम रंग अजिबात वापरू नका.
- स्वस्त चिनी रंगांपासून दूर रहा कारण ते त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहेत.
- आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह होळीचा दिवस साजरा करा आणि अनोळखी लोकांपासून दूर रहा.
आपल्या शरीरावरुन रंग कसे काढावेत
जर तुम्हाला वाटत असेल कि होळी खेळताना कोणी तुम्हाला रासायनिक रित्या बनवलेला रंग लावेल तर त्यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे होळी खेळण्या आधी आपल्या संपूर्ण शरीरावर तेल लावा. तेल लावल्याने कोणताहि रंग तुमच्या शरीरावर जास्त काळ टिकून राहणार नाही. आणि होळी खेळून झाल्यावर आपण त्या रंगला सहजपणे धून काढू शकतो.
जस कि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण कितीही बचाव केला तरी आपल्याला रासायनिक रंग हा लावलाच जातो. तो रंग त्वचे सोबतच आपल्या केसांना देखील नुकसान पोहचवू शकतो. म्हणून आपल्या केसांना देखील तेल लावा किंवा डोक्यात टोपी घाला. ज्याने रासायनिक रंगांपासून आपल्या केसांचा बचाव होईल. आपल्या सोबतच इतरांना देखील सेंद्रिय रंग वापरण्याचा सल्ला द्या. कारण रासायनिक रंग हे आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकता. आणि सेंद्रिय रंग वापरल्याने त्यांना मिटवणं देखील तितकच सोपं आहे.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हे होत होळी का साजरी करतात म्हणजेच Holi Information In Marathi आम्ही आशा करतो कि तुम्हाला होळी विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच website च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा. ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल. कारण आम्ही अशेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला होळी का साजरी करतात या लेखाविषयी काही समस्या किंवा प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता.