आज आपन बघणार आहोत मराठी गोष्ट ,ज्या मध्ये आपण बघणार आहोत जादूचा कुकर मराठी गोष्ट .जी एक जादूच्या कुकर ची गोष्ट आहे ज्या मध्ये कुकर कश्या प्रकारे जादू वर सोन देत असतो ते आपण बघू ,तर ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण गोष्ट मनपूर्वक वाचा .चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया .
जादूचा कुकर मराठी गोष्ट
जळगाव नावाचं एक गाव होत त्या गावाचे सरपंच अतिशय कडक स्वभावाचे होते त्यांना लबाडी बिलकुल पण पटत नाही होती .जर कोणी गावात लबाडी करेल तर ते त्यांना अतिशय कठीण असा दंड देत असत. गावात राहुल नावाचा एक भांडे विक्रेता राहायचा .राहुल चे दोन मुलं होते एकाच नाव राम आणि एकाच नाव होत शाम ,दोघेही खूप मस्तीखोर होते .त्यात राहुल च भांड्यांचं दुकान अगदी घराजवळ होत, त्या मुळे राम आणि शाम दोघेही कधीहि राहुल च्या दुकानात मस्ती करत-करत जायचे आणि राहुल ला खूप जास्त त्रास पण द्यायचे .राहुल च दुकान पंचकृषीत प्रसिद्ध होत ,त्यामुळे त्याच दुकान खूप जास्त चालायचं .प्रत्येक जण त्याच्या दुकानातून भांडे विकत घेत असे .
पण अचानक गावात एक राज नावाचा मनुष्य राहायला आला .त्याच्या सोबत त्याचा परिवार देखील होता .तो विचार करत होता कि गावात काहीतरी नवीन व्यवसाय सुरु करावा .ज्या मुळे तो विचार करू लागला कि गावात कसला व्यवसाय जास्त चालेल .त्याने विचार केला कि किराणा दुकान टाकावं पण लगेच त्याची बायको बोलली कि गावात आधीच ४ ते ५ किराणा दुकाने आहेत .मग त्याने विचार केला कि पिठाची गिरणी टाकावी पण ते देखील गावात २ ते ३ होते .मग ते आजून विचार करू लागले .मग त्यांच्या लक्षात आलं कि गावात सगळे व्यवसाय खूप आहेत पण भांड्यांचं दुकान तर केवळ एकाच आहे ते देखील राहुल च .मग त्याने विचार केला कि आपण भांड्यांचं दुकानच उघडायला पाहिजे .
राज ने दुकान सुरु केलं ,पण त्याचा दुकानात कोणीच गिऱ्हाईक जात नसे ,कारण गावात आधीच राहुल चे भांड्यांचे दुकान खूप प्रसिद्ध होत ,सगळे लोक तिकडेच जात असत .मग राज च मन वाईट विचार करू लागलं कि आपल्या दुकानात कोणीच येत नाही सगळे राहुल कडेच जातात .त्याने शेवटी कंटाळून ठरवलं कि आता आपण राहुल ला चांगला धडा शिकवला पाहिजे .आपण आस काही तरी केलं पाहिजे जेणेकरून लोक त्याच्या दुकानात न जात आपल्या कडे येतील .
एक दिवस राज ने राहुल ला मागे टाकण्यासाठी एक उपाय काढला तो अचानक एके रात्रि राहुल च्या दुकानात आपला अवतार बदलून गेला आणि राहुल ला बोलू लागला कि ‘माझ्या मुलीचं लग्न आहे, त्या साठी मला जास्त भांडे विकत घ्यायचे आहेत ” हे ऐकून राहुल खुश झाला आणि बोलला “हो महाशय चालेल ! तुम्हाला स्वस्त दरात भांडे मिळून जातील” ठरल्याप्रमाणे राजने भांडे विकत घेऊन राहुल ला पैसे दिले आणि घरी निघाला .राज ते भांडे घेऊन घरी आला आणि ते पीतळाचे भांडे बाजूला ठेऊन दिले आणि त्या बदल्यात लोहाचे भांडे घेऊन आला जे दिसायला राज ने दिलेल्या भांड्यांप्रमाणे होते .त्याने त्या लोहाच्या भांड्यांना पितळेचा रंग लावला आणि वाळायला ठेऊन दिले .
२ दिवसा नंतर राज पुन्हा ते लोहाचे रंग दिलेले भांडे घेऊन राहुल जवळ गेला आणि म्हणाला कि तुम्ही दिलेले भांडे खराब आहेत ते घरच्यांना आवडले नाही .त्याने भांडणं करून राहुल कडे पैसे परत मागितले व नकली चे भांडे देऊन गेला .राहुल ला वाटलं कि हे त्याने विकलेले खरे भांडे असेल त्याने ते ठेऊन घेतले .
थोड्या दिवसानी धनत्रयोदशी आली ज्या सणाला लोक वस्तू विकत घेत असतात .मग गावातले खूप लोक राहुल च्या दुकानात भांडे घेण्यासाठी गेले .मग राहुल ने दुकानात सगळे भांडे आणून ठेवले ज्या मध्ये राज ने दिलेले नकली भांडे देखील होते ,पण बिचाऱ्या राहुल ला ते माहीतच नाही होत .त्याने भोळ्या मनाने ते लोकांना विकले ,लोकहि त्याच्यावर विश्वास ठेऊन ते घेऊन गेले .कारण राहुल वर लोकांचा खूप जास्त विश्वास होता .दिवाळी देखील झाली त्या काळात पण राहुल ने खूप भांडे विकले त्याला खूप जास्त नफा देखील झाला ,हे बघून सगळा परिवार देखील खुश होता .
१ ते २ महिन्यानंतर गावातील लोकांना असं आढळू लागलं कि राहुल ने विकलेले भांडे हे खरे पितळाचे भांडे नसून ते केवळ लोहाच्या भांड्यांना पितळाचा रंग दिलेले नकली भांडे होते .हे बघून लोकांना खूप राग येऊ लागला त्यांनी ठरवलं कि आपण याची तक्रार गावच्या सरपंच्यांकडे करायला हवी .लोकांचा एक विचार झाला सगळे लोक एकत्र जमून सरपंचाकडे गेले .सरपंच देखील इतकी गर्दी बघून घाबरले ,व विचारू लागले कि काय झालं ? त्यावर लोक राहुल चे गार्हाणे सरपंचाला सांगू लागले ,हे ऐकून तर सगळ्यात आधी सरपंचाला विश्वास बसला नाही ,पण जेव्हा लोकांनी ते भांडे प्रत्यक्ष दाखवले तेव्हा सरपंचाला देखील खूप राग आला .
दुसऱ्याच दिवशी सरपंचाने राहुल ला बोलावून घेतलं आणि त्याला हे सगळं सांगितलं .त्याच बरोबर सरपंच बोलले कि गावाच्या नियमाप्रमाणे तुला १ लाख रुपये देखील भरावे लागेल आणि गाव देखील सोडावं लागेल .हे ऐकून राहुल ने आपलं घर ,दुकान ,बायकोचे दागिने देखील विकले व गाव सोडून निघून गेला .पण त्यांचे नातेवाईक देखील त्यांना साथ देत नव्हते ,हे बघून तो खूप दुखी झाला .दुसऱ्या गावात पण त्याला व त्याच्या परिवाराला कोणी घर दिले नाही .राहुल चा परिवार असाच रस्त्यावर फिरू लागला ,कुठेतरी आडोसा घेऊन राहू लागला व परत दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच नव्या जागेचा शोध घेऊ लागला .
४ ते ५ दिवस ते असेच फिरत होते फिरता-फिरता एक दिवस खूप रात्र झाली मग त्यांनी एका झाडाखाली आसरा घेतला .राहुल च्या बायकोने सोबत काही तांदूळ घेतले होते ते देखील संपणार होते .त्यांनी स्वयंपाक सुरु केला आणि हे तांदूळ देखील शेवटचे होते ,त्यांना चिंता होऊ लागली कि आता हे तांदूळ संपले कि पुढे कास जगायचं .अचानक तेथे एक म्हातारे बाबा आले आणि म्हणून लागले “बेटा मला तुम्ही बनवलेली खिचडी द्या मी ४ दिवसा पासून उपाशी आहे” हे ऐकून राहुल चीं बायको बोलली कि “बाबा आम्ही जर तुम्हाला हि खिचडी दिली तर माझा परिवास उपाशी राहील” हे बोलून ती रडू लागली .पण राहुल मधेच बोलला कि आपण बाबांना हि खिचडी देऊन टाकू ,कारण ते आपल्या पेक्षा जास्त उपाशी आहेत .ते बाबा ला सगळी खिचडी देऊन टाकतात आणि राहुल व राहुलचा परिवार उपाशीच झोपून जातात .
दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुल चे मुलं झोपेतून उठतात ,तर ते दोघे पण जोराने रडू लागतात .हे बघून राहुल चिंता करू लागतो व मुलांचं उपाशी पोट भरण्यासाठी जंगलात काहीतरी खाण्याच्या शोधात फिरू लागतो .अचानक राहुल ला जंगलात पुन्हा ते बाबा दिसले. तेव्हा राहुल त्या बाबा जवळ गेला आणि विचारू लागला कि “बाबा आपण या जंगलात काय करताय ?” हे ऐकून बाबा बोलले कि “बेटा काल तू जी मदत केली त्याच्या बद्दल मी तुला एक कुकर देत आहे” बाबा कुकर देऊन अचानक गायब होऊन गेले .राहुल ने कुकर घेतला व बाबा ला शोधू लागला पण बाबा कुठेच दिसले नाही .राहुल हे बघून पळत आपल्या परिवाराकडे जाऊ लागला पण रस्त्यात त्याला झेंडू चे फुल दिसले त्याने ते घेतले व परिवाराकडे गेला. त्याने जंगलातील घडलेलं सगळं घडलेलं बायको व मुलांना सांगितलं हे ऐकून ते देखील आश्च्यर्यचकित झाले .
त्यांना भूक इतकी जास्त लागलेली होती कि ,त्यांने कुकर मध्ये झेंडू चे टाकले व उकळले ,नंतर थोड्या वेळाने कुकर उघडला तर काय ते झेंडू चे फुल सोन्याचे झालेले होते .हे बघून राहुल व त्याचा परिवार खूप जास्त खुश झाला .राहुल ने मग आजून काही गोष्टी कुकर मध्ये टाकून उकळून बघितल्या तर त्या देखील सोन्याच्या झाल्या .हे बघून तर ते सगळे खूप खुश झाले .
काहीच दिवसात राहुल ने शेजारच्या एका गावात घर घेतले .बघता-बघता त्याने सोन्याच्या मदतीने एक सोन्याच्या दागिन्यांचं दुकान देखील टाकलं .त्याच हे दुकान देखील खूप जास्त चालू लागलं .आता काही दिवसातच त्याच्या या सोन्याच्या कुकर चीं माहिती संपूर्ण गावात व आसपास कळाली.बघता-बघता त्याच्या जुन्या गावात देखील हे माहित झालं ,हे ऐकून राज च्या मनात पुन्हा लालसा आली तो पुन्हा रूप बदलून राहुल कडे गेला ,व बोलू लागला कि “माझी मुलगी खूप आजारी आहे तिला दवाखान्यात खूप जास्त खर्च येत आहे ,तुम्ही मला एक दिवसासाठी तुमचा कुकर द्याल का” हे ऐकून राहुल ला त्याची दया आली ,त्याने तो कुकर राज ला दिला .
राज तो कुकर घेऊन घरी आला व लगेच तो गॅस वर ठेऊन त्यात बटाटे उकडू लागला .त्याने कुकर उघडून बघायचा प्रयत्न केला तर कुकर मधून खूप प्रेशर आला व राज ला पूर्ण काळा करून गेला .राज ला वाटलं हे काहीतरी चुकीने झालं असेल त्याने पुन्हा बटाटे उकडून बघितले परत तसाच झालं .त्याने खूप वेळेस प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस त्याच तोंड प्रेशर ने काळ होऊ लागलं .शेवटी त्याने घाबरून तो कुकर पुन्हा राहुल ला नेऊन दिला .आशय प्रकारे राहुल चा परिवार पुढे सुखात राहू लागला आणि जादूचा कुकर मराठी गोष्ट हि देखील या ठिकाणी समाप्त होत आहे.
तात्पर्य-
तर मित्रांनो हि होती जादूचा कुकर मराठी गोष्ट ज्या मधून आपल्याला शिकायला मिळालं कि , मन शुद्ध असेल आणि मनात कसलीही लालसा नसेल तर यश नक्की मिळत . म्हणून लालसा हा माणसाचा शत्रू आहे ,म्हणून त्याला कायम लांब ठेवावा .