कामगार मुलाचा प्रामणिकपणा मराठी गोष्ट | Marathi Gosht

मित्रांनो आज आपण बघणार आहोत कामगार मुलाचा प्रामणिकपणा आपण बाहेर खूप वेळा मजदूर मुलं किंवा गरीब मुलं बघत असतो आपल्याला प्रत्येक गरीब मुलाकडे पाहून असा संशय येतो कि हा मुलगा चोर असेल परंतु जस दिसत तस नसत हाताची पाचही बोट हि सारखी नसतात. त्यांच्यात देखील काही प्रामाणिक मुलं असतात जे आपल्या परिस्थितीमुळे गरीब असतात. आज आपण अश्याच एक प्रामाणिक मुलाची गोष्ट बघणार आहोत जी तुम्हाला नक्की आवडेल गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमचं मत हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे चला तर मग बघूया कामगार मुलाचा प्रामणिकपणा.

कामगार मुलाचा प्रामणिकपणा

कोण्यातरी श्रीमंताच्या घरी एक दिवस धुराडे साफ करण्यासाठी एका मजुर मुलाला बोलाविले. मुलगा साफ-सफाई करू लागला. त्याने खोलीतील निरनिराळ्या त-हेच्या सुंदर वस्तु पाहिल्या आणि त्या सजवुन ठेवल्या. खोलीत तो एकटाच होता म्हणून तो प्रत्येक वस्तु उचलुन पाहू लागला. येवढयात त्याचे लक्ष एका मोठ्या हिरे आणि मोत्यांनी बनविलेल्या घडयाळयाकडे गेले. ते सोन्याचे होते.

त्याने घडयाळ हातात उचलुन पाहिले. ते फारच सुंदर होते म्हणून त्याला लोभ सुटला. तो म्हणाला की असे घडयाळ माझ्याजवळ असते तर, त्याच्या मनात पाप आले. त्याने घडयाळ चोरण्याचा निश्चय केला. परंतु दुसऱ्याच क्षणी तो घाबरून ओरडला,”अरे बापरे माझ्या मनात केवढे मोठे पाप आले. जर मी चोरी करताना पकडलो तर माझी किती वाईट परिस्थिती होईल. सरकार शिक्षा करेल. तुरुंगात जाऊन दगडे फोडायला लागतील आणि तेलाचा घाणा चालवावा लागेल.

प्रामाणिकपणा गेला तर माझ्यावर कोण विश्वास ठेवून घरात येऊ देईल. जर मनुष्याच्या हातून पकडलो गेलो नाही तरी काय झाले देवाच्या हातातून काही सुटत नाही. आई नेहमी बोलत असते की आपण देवाला पाहत नाही परंतु देव नेहमी आपल्याला पाहतो. त्याच्यापासून लपवून आम्ही कोणतेही काम करू शकत नाही. तो अंधारात पण पाहत असतो येवढेच नव्हे तर तो मनातील गोष्ट जाणत असतो.

असे बोलता बोलता मुलाचा चेहरा उतरला, त्याचे शरीर घामाघूम झाले. तो थरथर कापू लागला. घड्याळाला योग्य त्या जागी ठेवून तो जोराने म्हणाला, “लोभ फार वाईट आहे. माणसे या लोभात फसून चोरी करतात. मला श्रीमंतांच्या घड्याळाचा काय उपयोग ? लोभानेच मला विघडवले पण दयाळू देवाने मला वाचविले.

आता मी कधीही लोभात पडणार नाही. खरोखर चोरी करून श्रीमंत होण्यापेक्षा धर्माला आचरुन गरीबीत राहणे फार चांगले असते. चोरी करणारा जरी, कितीही श्रीमंत झाला तरी त्याला कधीही सुखाने झोप लागत नाही. अरे, चोरीच्या मनाचे हेच फळ असते तर मला माहित नाही मला किती भयानक कष्ट आणि दुःख सहन करावे लागले असते. येवढे बोलून मुलगा शांतचित्ताने आपले काम करू लागला.

घराची मालकीण शेजारच्या खोलीतून सर्व पाहत होती. आणि ऐकत होती. ती लगेच मुलाजवळ आली आणि म्हणाली, “अरे मुला, तू घडयाळ का घेतले नाही? मुलगा येवढे ऐकून सुन्न झाला. कापले तर रक्त नाही अशी त्याची अवस्था झाली. तो डोके धरून जमिनीवर बसला आणि थरथर कापू लागला. त्याची बोलती बंद झाली. डोळयातून अश्रु वाहू लागले.

मुलाची गरीब दशा पाहून मालकिणीला दया आली. ती प्रेमळ आवाजात बोलली,”मुला, घाबरू नकोस तुझे बोलणे मी ऐकले आहे. तू गरीब असूनही येवढा चांगला आहेस की तू प्रामाणिकपणाला धर्म आणि देवाला घाबरतो हे पाहून मला प्रसन्नता वाटली. तुझी आई फार धन्य आहे की जीने तुला लोभात फसू न देण्याची शक्ती दिली. मुला सावध रहा. कधीही लोभात फसु नकोस. मी तुझ्या खाण्यापिण्याची आणि पुस्तकांची सोय करीन. तु उदयापासून शाळेत जाऊन अभ्यासाला सुरुवात कर. देव तुझे भले करो. येवढे बोलून तिने त्याचे हात उचलून त्याला हृदयाशी कवटाळले आणि आपल्या पदरातून त्याच्या हातात काही पैसे देऊन बोलली,”हे तुझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस आहे.”

मालकिणीच्या प्रेमळ शब्दांनी मुलाचे मन आनंदीत होऊन उंचवळून आले. त्याच्या तोंडावर कृतज्ञता दिसू लागली. तो दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊ लागला. पुढे तो मोठा विद्वान आणि प्रतिष्ठित नागारिक झाला.परिश्रम आणि सत्याचे फळ त्याला असे मिळाले.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती कामगार मुलाचा प्रामणिकपणा मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जर आपण चोरी करून पैसे मिळवले तर ते आपल्याला काही काळ टिकतील परंतु मेहनतीचे पैसे हे आपल्याला कायम टिकतात म्हणून चोरी करणे हे खूप मोठे पाप आहे. आम्ही आशा करतो कि तुम्हाला कामगार मुलाचा प्रामणिकपणा मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *