Friday, December 1, 2023
Homeगोष्टीकर्णाची उदारता मराठी गोष्ट | Marathi Gosht

कर्णाची उदारता मराठी गोष्ट | Marathi Gosht

मित्रांनो आज आपण बघणार आहोत कर्णाची उदारता मराठी गोष्ट मित्रांनो या वेबसाईट वर तुम्हाला अश्याच गोष्टी दररोज वाचायला दिल्या जातात ज्याने तुम्हाला चांगले संस्कार लागतात त्यामुळे वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला ऑन करून तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता. नोटिफिकेशन बेल ऑन केल्याने भविष्यात येणारी गोष्ट तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया जिचं नाव आहे कर्णाची उदारता मराठी गोष्ट.

कर्णाची उदारता

एकदा भगवान श्रीकृष्ण पांडवांबरोबर बोलत होते. भगवान त्यावेळी कर्णाची सारखी त्याच्या उदारतेबद्दल आठवण काढत होते. ही गोष्ट अर्जुनाला आवडली नाही. अर्जुन म्हणाला, “श्यामसुंदर, आमचे मोठे भाऊ धर्मराजापेक्षा उदार तर कोणी नाही. तरी तुम्ही त्याच्यासमोर कर्णाची स्तुती का करत आहात?

भगवान म्हणाले, ही गोष्ट तुला परत कधीतरी समजावून सांगेन.

काही दिवसानंतर अर्जुनाला बरोबर घेऊन श्रीकृष्ण धर्मराजा युधिष्ठिराच्या राजमहालावर ब्राम्हणांचा वेश घेऊन पोहचते. त्याने धर्मराजाला सांगितले की एक मण चंदनाची सुकी लाकडे पाहिजेत. आपण कृपा करून मागून क्या. त्यादिवशी जोराचा पाऊस पडत होता. कुठूनही लाकडे आणली तरी ती ओलीच होणार. राजा युधिष्ठिराने राज्यात नोकर पाठविले. परंतु योगायोग असा होता की चंदनाची सुकी लाकडे शेर अर्ध्या शेराहून जास्त मिळाली नाही. युधिष्ठिर हात जोडून म्हणाला, आज सुके चंदनाचे लाकूड मिळत नाही. आपण दुसरी कोणतीही वस्तू मागाल ती गोष्ट मी घेऊन येईन. भगवान म्हणाले, सुके चंदनाचे लाकूड मिळाले नाही तर नाही आम्हांला दुसरे काही नको.”

तिथून अर्जुनाबरोबर ब्राहणाचा वेश घेऊन भगवान कर्णाच्या घरी गेले. कर्णाने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. भगवान म्हणाले, आम्हांला यावेळी एक मण सुकी चंदनाची लाकडे पाहिजेत. कर्णाने दोघा ब्राम्हणांना आसनावर बसवून त्याची मुजा केली. नंतर धनुष्य घेऊन त्याच्यावर बाण लावला. बाण मारून कर्णाने आपल्या सुंदर महालातील मौल्यवान खिडक्या, दारे, पलंग इत्यादी वस्तू तोडून लाकडाचा ढीग रचला, सर्व लाकूड चंदनाचे होते. हे पाहून भगवान म्हणाले,”तु सुक्या लाकडांसाठी या वस्तू का नाहीसा करतोस?

कर्ण हात जोडून म्हणाला, “यावेळी पाऊस पडत आहे. बाहेरून लाकडे आणायला उशीर होईल. तुम्हाला थांबवे लागेल. या वस्तू तर परत तयार करता येतील परंतु माझ्याकडे आलेला अतिथी जर निराश झाला किंवा त्याला त्यामूळे काही कष्ट पडले तर ते दुःख माझ्या मनातून जाणार नाही.

भगवानांनी कर्णाला यशस्वी होण्याचा आशिर्वाद दिला आणि ते अर्जुनाबरोबर चालु लागले. ते अर्जुनाला म्हणाले “अर्जुना पाहिलेस धर्मराज युधिष्ठिराच्या राजमहालाची दारे, खिडक्यासुद्धा चंदनाच्या लाकडाच्या होत्या. चंदनाच्या दुसऱ्या वस्तुपण राजमहालात होत्या. परंतु चंदनाचे लाकुड मागितल्यावर या वस्तुंकडे धर्मराजाचे लक्ष गेले नाही किंवा त्याला आठवले नाही. परंतु कर्णाने आपल्या मौल्यवान वस्तु तोडून लाकडे दिली. कर्ण स्वभावतःच उदार आहे आणि धर्मराज युधिष्ठिर विचारपूर्वक आपल्या धर्माचे आचरण करतात. मी या कारणामुळेच कर्णाची स्तुती करतो.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती कर्णाची उदारता मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते. या गोष्टीद्वारे आम्हांला शिकवण मिळते की परोपकार, उदारता, त्याग किंवा चांगले कार्य करण्याचा स्वभाव बनविला पाहिजे. जे लोक नेहमी चांगले कार्य करत नाही आणि विचार करत राहतात की मोठी संधी आल्यावर ते महान त्याग किंवा उपकार करतील. ती वेळ आल्यावर त्यांना ही गोष्ट सुचत नाही की मोठा त्याग कसा करावा. जे लहान त्याग आणि उपकार करण्याचा स्वभाव बनवितात तेच मोठे कार्य करण्यात यशस्वी होतात. जर तुम्हाला कर्णाची उदारता मराठी गोष्ट हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments