Monday, November 27, 2023
Homeगोष्टीकोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट | marathi story

कोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट | marathi story

मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट. आपण ज्या नजरेने या जगाला बघतो तसेच आपल्याला हे जग दिसते जर आपण चांगल्या नजरेने बघितले तर जग आपल्याला चांगले दिसते आणि जर आपण वाईट नजरेने बघितले तर जग आपल्याला वाईट दिसते. कायम दुसऱ्यांना दोष देणे हा आपला मूर्खपणा असतो त्यापेक्षा आपण जर स्वतः मध्ये सुधार केला व आपले विचार बदलले तर आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून देखील आदर व सन्मान मिळेल आजच्या या गोष्टी मध्ये देखील आपण हेच बघणार आहोत तुम्हाला गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया कोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट.

कोणाचा दोष दाखवू नका

भगवान बुद्धांचा एक शिष्य त्यांना वंदन करून आणि हात जोडून उभा होता. भगवानांनी विचारले, तुला काय पाहिजे?

शिष्य-: जर भगवानांनी आज्ञा दिली तर मला देशभर भ्रमण करण्याची इच्छा आहे.

भगवान-:लोकांत चांगली-वाईट माणसे असतात.

वाईट माणसे तुझी निंदा करतील अणि शिव्या देतील. त्यावेळी तुला कसे वाटेल?

शिष्य-: मी समजेन की ते चांगले आहेत. कारण त्यांनी माझ्यावर धूळ फेकली नाही आणि मला थप्पड मारली नाही.

भगवान-: त्यांच्यातील काही लोक धूळ फेकू शकतात आणि थप्पड पण मारू शकतात.

शिष्य-: मी त्यांना येवढयासाठी चांगले समजेन की ते मला काठ्या मारत नाही.”

भगवान -: काठ्या मारणारे दहा पाच माणसे असू शकतात.

शिष्य-: ते मला हत्याराने मारत नाही म्हणून चांगले वाटतील.

भगवान-: देश मोठा आहे. जंगलात ठक आणि दरोडेखोर राहतात. दरोडेखोर तुला हत्याराने मारतील.

शिष्य-: ते दरोडेखोर दयाळू असतील की जे मला जिवंत सोडतील.

भगवान-: हे तुला कसे माहित आहे की दरोडेखोर तुला सोडून देतील.. ते मारू शकतील.

शिष्य-: हा संसार दुःखदायक आहे. याच्यात जीवंतपणी दुःख सहन करावे लागते. आत्महत्या करणे पण पाप आहे. जर दुसऱ्याने मारले तर त्याची दया होईल. शिष्याचे बोलणे ऐकून भगवान प्रसन्न झाले. ते म्हणाले,”आता तू पर्यटन करण्यास योग्य झाला आहे. खरा साधु तोच आहे की जो कोणालाही आणि कोणत्याही परिस्थितीत वाईट मानत नाही. जो दुसऱ्याच्या वाईट गोष्टी पाहत नाही तो सर्वात चांगला समजला जातो, तोच निस्वार्थी होण्यास योग्य आहे.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती कोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत. गोष्ट लहान आहे परंतु लाभदायक आहे हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण कधीच कुणाचा दोष नाही दाखवायचा त्या आधी स्वतः मध्ये सुधार करायचा. आम्ही आशा करतो कि तुम्हाला कोणाचा दोष दाखवू नका मराठी गोष्ट हि गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments