कू एप काय आहे | Koo App Review In Marathi
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत कू एप काय आहे? आणि Koo App Review In Marathi. जस कि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कि मागील काही दिवसांपासून भारत व चीन यांच्यामध्ये सीमा वाद सुरु आहे. म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी भारत सरकार ने ५९ चायनीज एप वर प्रतिबंध लावला आहे. आणि म्हणूनच भारतीय एप डेव्हलपर साठी भारतीय नवं-नवीन एप्लिकेशन बनवण्याच्या सुवर्ण संधी चालून आल्या आहेत. आणि भरपूर भारतीय एप डेव्हलपर याचा फायदा देखील घेत आहेत.
बरेच नवीन एप प्रेक्षकांच्या भेटी साठी येत आहेत. त्यातीलच एक एप म्हणजे कू एप. जर आपण कु एप वर एक नजर टाकली तर कु एप ला आपण भारताचं ट्विटर देखील म्हणू शकतो.तर आजच्या ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कु एप विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. जस कि कु एप काय आहे, कु एप कोणी बनवलं आणि कु एप कसं वापरायचं. चला तर मग जाणून घेऊया भारतीय ट्विटर कु एप विषयी माहिती.
कू एप काय आहे – What is Koo App In Marathi
मित्रांनो जस कि आम्ही तुम्हाला सांगितलं कि भारत आणि चीन सीमावाद नंतर भारताने ५९ चायनीज एप वर प्रतिबंध लावले. त्या नंतर भारतीय डेव्हलपरांद्वारे खूप साऱ्या चिनी एप्लिकेशन चे नक्कल एप बनवण्यात आले जसे कि फेसबुक + इंस्टाग्राम + व्हाट्सअप या तिन्ही एप्लिकेशन चे फीचर्स एकत्र करून भारताच्या डेव्हलपरांनी एलिमेंट्स एप तयार केले. हे झालं एक उदाहरण परंतु अजून खूप सारे अशे नक्कल एप भारतीय एप डेव्हलपरांनी बनवले.
त्याच एप मधील एक एप होत ट्विटर. आता त्याच सुद्धा नक्कल एप बनवण्यात आलं आहे आणि ते म्हणजे आपलं कु एप. जर तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही सांगू इच्छितो कि हे एप्लिकेशन भारतीय एप्लिकेशन आहे ज्याला भारतीय डेव्हलपरांद्वारा बनवण्यात आले आहे. आणि हल्ली च्या काळात कु एप ला भारताचं ट्विटर ह्या नावाने संबोधलं जात आहे. हे एप्लिकेशन हुबेहूब ट्विटर सारखं आहे. ह्या एप्लिकेशन मध्ये तुम्हाला स्वतःच अकाउंट बनवावं लागत त्या नंतर तुम्ही ह्या एप्लिकेशन चा उपयोग करू शकता.
अकाउंट बनवल्या नंतर तुम्ही तुमचे विचार टेक्स्ट च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकता. इतर लोकांना फॉलो करू शकता. कु एप ची काम करण्याची प्रक्रिया हि ट्विटर समानच आहे आणि या मध्ये ट्विटर एप सारखे फीचर्स तर आहेच परंतु त्या विपरीत अजून नवं-नवीन फीचर्स देखील तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत.
कु एप विषयी
एप च नाव | कू एप |
डाऊनलोड्स | १ मिलियन |
डाउनलोड साईज | १० MB |
कोणत्या कंपनीने बनवलं | कू इंडिया |
कधी लॉन्च केलं | १४ नोव्हेंबर २०१९ |
कू एप चे फाउंडर कोण आहेत?
मित्रांनो जस कि आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं कि कू एप हे एक भारतीय एप्लिकेशन आहे. म्हणून कू एप ला भारतीय डेव्हलपरांद्वारा बनवण्यात आलं आहे. या एप्लिकेशन चे फाऊंडर आहेत मयंक बिदावतका आणि प्रमेय राधाकृष्ण. या दोघांनी मिळून कू एप बनवलं आहे आणि १४ नोव्हेंबर २०१९ रोजी लॉन्च केलं आहे. कू एप ला १८ विविध भाषांमध्ये लॉन्च करण्यात आलं होत त्या सर्व भाषा तुम्हाला खाली दिल्या आहेत.
कु ऐप हिंदी , कन्नड़ ,तमिल ,तेलगु , मराठी , बंगाली ,गुजराती , मल्यालम , पंजाबी , ओरिया , आसामी , उर्दू , संस्कृत , नेपाली , मणिपुरी , कोकणी , कश्मीरी आणि इंग्रजी या सारख्या १८ विविध भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या एप १८ विविध भाषांमध्ये लॉन्च करण्याचं मुख्य उद्धिष्ट असं होत कि भारतातील प्रत्येक राज्यातला व्यक्ती या एप चा वापर करू शकेल. चला तर मग आता आपण बघूया कि कू एप ला डाउनलोड कसं करायचं आणि कू एप मध्ये अकाउंट कसं बनवायचं.
कू एप डाउनलोड कसं करायचं
1. मित्रांनो कू एप ला डाउनलोड करणं अतिशय सोपं आहे. या साठी तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या मोबाईलच इंटरनेट चालू करून गूगल प्ले-स्टोर ओपन करायचं आहे.
2. गूगल प्ले-स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये लिहायचं आहे “koo App” हे लिहून तुम्हाला सर्च बटनावर क्लिक करायचं आहे.
3. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर कू एप येईल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या “Install” बटनावर क्लिक करायचं आहे.
4. इन्स्टॉल बटनावर क्लिक केल्यावर तुमचं एप डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तुम्ही खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून देखील कू एप ला डाउनलोड करू शकता.
कू एप मध्ये अकाउंट कसं बनवायचं
Step 1 – कू एप डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर सगळ्यात आधी तुमच्या पुढे भाषा निवडण्याचा पर्याय येईल. तुम्हाला सगळ्यात आधी तुमची भाषा निवडायची आहे आणि नेक्स्ट च्या बटनावर क्लिक करायचं आहे.
Step 2 – भाषा निवडून झाल्यावर तुम्हाला मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला तिथे आपला १० अंकी मोबाईल क्रमांक समाविष्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या नेट च्या बटनावर क्लिक करायचं आहे.
Step 3 – नेक्स्ट केल्यानांत तुम्ही समाविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक OTP (one time password) पाठवला जाईल तो OTP तुम्हाला समाविष्ट करायचं आहे आणि पुन्हा नेक्स्ट च्या बटनावर क्लिक करायचं आहे.
Step 4 – त्या नंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल ओपन होईल. तिथे तुम्हाला आपला प्रोफाइल फोटो लावायचा आहे आणि पुन्हा नेक्स्ट च्या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट च्या बटनावर क्लिक केल्यानांत तुमचं कू एप अकाउंट तयार होईल.
कू एप कसं वापरायचं
मित्रांनो कू एप मध्ये तुम्हाला जेवढे पर्याय दिले आहे त्या प्रत्येक पर्यायाची सविस्तर माहिती तुम्हाला समजवून सांगतली आहे. जर तुम्ही कू एप वापरत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ज्याने तुम्हाला एप वापरताना कुठल्याच समस्यांचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग बघूया कि कू एप कसं वापरायचं.
होम – कुठल्याही एप्लिकेशन ला ओपन केल्यावर सगळ्यात आधी ओपन होत ते म्हणजे होम पेज. कू एप ला ओपन केल्यावर देखील सगळ्यात आधी तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. होम पेज ओपन झाल्यानंतर लोकांद्वारा केल्या गेलेल्या पोस्ट तुम्हाला होम पेज वर दिसतील. एप्लिकेशन मध्ये या पोस्ट ला कू म्हणून संबोधले गेले आहे. प्रत्येक पोस्ट खाली तुम्हाला लाइक , कमेंट , रिकू , शेयर फेसबुक आणि शेयर व्हाट्सअप असे काही पर्याय बघायला मिळतील. जर तुम्हाला रिकू बद्दल सांगायचं झालं तर ज्या प्रमाणे ट्विटर मध्ये रिट्विट असायचं त्याच प्रमाणे कू एप मध्ये रिकू चा पर्याय दिला आहे.
फीड – फीड या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी ४ विविध प्रकारचे पर्याय बघायला मिळतील चला तर मग त्या चारही पर्यायांना नीट समजून घेऊ.
१) ट्रेंडिंग टॅग्स
२) लेटेस्ट
३) राजनीती
४) खेळ
१) ट्रेंडिंग टॅग्स – टॅग्स या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहीतच असेल.ट्रेंडिंग टॅग्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही टॅग्स येतील. अशे टॅग्स जे वर्तमान काळात ट्रेंडिंग वर चालू आहेत. ट्रेंडिंग टॅग्स याचा अर्थ असा कि लोक सर्वात जास्त त्या टॅग्स चा उपयोग आपल्या पोस्ट मध्ये करत असतात. ते सर्व ट्रेंडिंग टॅग्स तुम्हाला या पर्यायांमध्ये बघायला मिळतील.
२) नावनीतम – नावनीतम म्हणजे जे लोक नवीन पोस्ट करतात त्या सर्व पोस्ट तुम्हाला या पर्यायामध्ये बघायला मिळतील. याचा अर्थ जेवढे लोक वर्तमानकाळात कू एप वर पोस्ट करतात त्या सर्व पोस्ट तुम्हाला नावनीतम या पर्यायामध्ये बघायला मिळतील.
३) राजनीती – या पर्यायामध्ये तुम्हाला राजनीती समंधित न्यूज किंवा कू बघायला मिळतील. आपल्याला या सर्व न्यूज व्हिडीओ च्या माध्यमातून बघायला मिळतील. या न्यूज बघण्यासाठी तुम्हाला एखाद्या न्यूज वर क्लिक करायचं आहे न्यूज वर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईट वर पोहचाल जिथे तुम्ही ती न्यूज व्हिडीओ च्या माध्यमातून पाहू शकता.
४) खेळ – या पर्यायामध्ये तुम्हाला खेळ संबंधित सर्व न्यूज बघायला मिळतील. जस क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि अजून इतर खेळ. तुम्ही एखाद्या न्यूज वर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईट वर पोहचाल ज्या वेबसाईट ने ती न्यूज पोस्ट केली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती न्यूज वाचू शकता.
सर्च – या ऑप्शन च्या साहाय्याने आपण एखादी व्यक्ती, हॅशटॅग किंवा एखाद्या व्यक्ती द्वारा केली गेलेली पोस्ट सापडू शकतो. आपल्याला फक्त त्या व्यक्तीच नाव किंवा कू सर्च करायचं आहे. अगदी सहजरित्या आपण त्या व्यक्तीला सापडू शकतो.
मेसेज – या पर्यायाच्या साह्याने आपण इतर व्यक्तींशी बोलू शकता. आपल्याला सगळ्यात आधी मेसेज च्या पर्यायामध्ये जायचं आहे. आपण ज्या व्यक्तीशी बोलू इच्छिता त्या व्यक्तीच नाव आपल्याला इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीच अकाउंट तुमच्या समोर येईल. तुम्हाला त्या अकाउंट वर क्लिक करायचं आहे आणि मेसेज रिक्वेस्ट करायची आहे. ती मेसेज रिक्वेस्ट समोरच्या व्यक्ती कडे जाईल आणि त्या व्यक्ती ने रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीशी मेसेज द्वारे बोलू शकता.
नोटिफिकेशन – या ऑप्शन मध्ये तुम्हाला कू एप चे सर्व नोटिफिकेशन बघायला मिळतील. उदाहरणात तुम्हाला कोणी फॉलो केलं, तुमच्या पोस्ट ला लाईक किंवा कमेंट केलं, तुमच्या कू ला रिकू केलं. असे सर्व प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला या पर्यायामध्ये बघायला मिळतात.
प्रोफइल – या पर्यायामध्ये तुम्हाला तुमच्याशी संबंधित सर्व माहिती बघायला मिळेल. उदाहरणात तुम्ही या पर्यायातून तुमचे फॉलोवर किंवा फॉलोविंग बघू शकता, प्रोफाइल फोटो बदलू शकता, भाषा बदलू शकता, आपल्या विषयी माहिती लिहू शकता.
कू कसं करायचं – मत्रांनो जर तुम्ही कू एप चा वापर करत आहेत आणि तुम्हाला अजून देखील माहित नाही की ट्विट कस करायचं म्हणजेच कू कसं करायचं तर पुढील माहिती वाचा. कू करणं असतीशय सोपं आहे त्या साठी तुम्हाला होम पेज वर जायचं आहे. होम पेज वर तुम्हाला पिवळ्या रंगाचं मोठं बटन दिसेल. तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचं किबोर्ड ओपन होईल त्यानंतर तुम्ही कू करू शकता.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हे होत कू एप काय आहे आणि Koo App Review In Marathi आम्ही आशा करतो कि तुम्हाला कू एप विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा. ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल. जर तुम्हाला एप काय आहे या लेखाविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. जय महाराष्ट्र.