Thursday, September 28, 2023
Homeगोष्टीलालची माकड मराठी गोष्ट | माकडाची गोष्ट मराठी मध्ये

लालची माकड मराठी गोष्ट | माकडाची गोष्ट मराठी मध्ये

मित्रांनो आज आपण बघणार आहोत लालची माकड मराठी गोष्ट म्हणजेच माकडाची गोष्ट मराठी मध्ये लहान मुलांना माकडाच्या गोष्टी खूप आवडतात म्हणून आज आम्ही लहान मुलांसाठी घेऊन आलेलो आहोत छोटीशी माकडाची गोष्ट मराठी मध्ये. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात कि “लालच बुरि बला है” म्हणजेच अति लालच केल्यावर आपण संकटात देखील अडकू शकतो आजच्या या गोष्टीत देखील आपण तेच बघणार आहोत चला तर मग बघूया लालची माकड मराठी गोष्ट तुम्हाला गोष्ट आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा.

लालची माकड

एक माकड एका मनुष्याच्या घरी दररोज येऊन थैमान घालायचा. तो कधी कधी कपडे फाडायचा, कधी भांडी घेऊन जायचा, कधी मुलांना ओरबाडायचा. तो खाण्यापिण्याचा वस्तूदेखिल घेऊन जायचा पण त्याचे दुःख घरवाल्यांना नव्हते. परंतु माकडाच्या उपदवाने ते त्रासले होते.

एक दिवस घरातील कर्ता माणूस म्हणाला,”मी या माकडाला पकडून बाहेर घालवून देईन.’ त्याने एक लहान तोंडाची घागर मागविली आणि त्याच्यात भिजवलेले चणे टाकून घागर जमिनित पुरली. फक्त घागरीचे तोंड उघडे ठेवले होते. सर्वजण दूर गेले. तो माकड घरात आला. थोडया वेळ इकडे तिकडे उडया मारून बाहेर आला. त्याने पुरलेल्या घागरीत चणे पहिले तेव्हा तो तेथेच बसला. चणे काढण्यासाठी घागरीत हात घालून मूठभर चणे धरले. पण घागरीचे तोंड लहान असल्यामुळे हाताची मूठ बाहेर निघत नव्हती. त्यासाठी त्याने जोर लावला, उडया मारू लागला. परंतु त्या लोभी माकडाने हातातील चणे सोडले नाही.

नंतर माकडाला घराध्या कर्ता माणसाने दोरीने बांधले आणि बाहेर नेले. चण्याच्या लोभापायी माकड पकडला गेला. म्हणून अशी म्हण झाली की लोभ फार वाईट असतो.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती लालची माकड मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण कधीही लोभ करू नये आहे त्यात समाधान मानावे नाहीतर आपली दशा हि गोष्टीतल्या माकड प्रमाणे होईल. आम्ही आशा करतो कि तुम्हाला लालची माकड मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments