मित्रांनो आज आपण बघणार आहोत लालची राजा मराठी गोष्ट म्हणजेच Lobhi Raja Marathi Gosht आपण लहान असतो तेव्हा पासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते कि लोभ हा अतिशय वाईट असतो माणसाने आहे तेवढ्यात समाधान मानावं नाहीतर आहे ते पण तो गमावून बसतो. आज आपण या गोष्टीच्या माध्यमातून तेच बघणार आहोत गोष्ट अतिशय गंमतशीर आहे आणि शिकवण देऊन जाणारी सुद्धा आहे. गोष्ट वाचून झाल्यावर गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्या गोड कमेंट मुळेच आम्हाला अजून गोष्टी लिहिण्याची ताकद मिळते चला तर मग बघूया लालची राजा मराठी गोष्ट.
लालची राजा मराठी गोष्ट
युरोपमध्ये यूनान नावाचा एक देश आहे. यूनानमध्ये पूर्वी मीडास नावाचा राजा राज्य करत होता. राजा मोठा लोभी होता. आपल्या मुलीला सोडून दुसरी कोणती गोष्ट संसारात त्याला प्रिय असेल ती म्हणजे सोने ते त्याला फारच प्रिय होते. तो रात्रभर सोने मिळण्याचा विचार करत असे.
एक दिवस राजा मीडास आपल्या खजिन्यात सोन्याच्या विटा आणि नाणी मोजत होता. अचानक त्या ठिकाणी एक देवदूत आला तो राजाला म्हणाला,” मीडास तु फार धनवान आहेस.
मीडासने तोंड फिरवून उत्तर दिले, मी धनवान नाही, माझ्याजवळ थोडेसे सोने आहे. देवदूत म्हणाला,”तुला एवढया सोन्यातही समाधान नाही. तुला किती सोने पाहिजे?”
राजा म्हणाला,”मला असे वाटते की ज्या वस्तुला मी हात लावीन ती सोन्याची व्हावी.’
देवदूत हसून म्हणाला,”ठिक आहे, उदयापासून तू ज्या वस्तूला हात लावशील ती सोन्याची होईल. त्या दिवशी रात्री मीडासला झोप लागली नाही. तो सकाळी उठला. त्याने खुर्चीवर हात ठेवला तर ती सोन्याची झाली.मीडासला फारच आनंद झाला. तो नाचू बागडू लागला. वेड्यासारखा धावत राहिला आणि बागेत गेला. त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूला हात लावू लागला. त्याने फुले, पाने, फांदयांना हात लावला. त्या सर्व सोन्याच्या झाल्या. सर्व चमकायला लागल्या. मीडासच्या जवळील सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या.
धावत धापा टाकीत मीडास थकून गेला. त्याला माहित नव्हते की त्याचे कपडेपण सोन्याचे झाले म्हणून ते जड झाले. बागेतून राजमहालात आल्यावर तो एका सोन्याच्या खुर्चीवर बसला. एका नोकराने त्याचे जेवण आणि पाणी भरून ग्लास समोर आणून ठेवला. परंतु मीडासने अन्नाला स्पर्श करताच ते सर्व अन्न सोन्याचे झाले, त्याने पाणी पिण्यासाठी ग्लास घेतला तर ग्लास आणि पाणी सोन्याचे झाले. मीडासच्या समोर सोन्याच्या पोळया, सोन्याचा भात, सोन्याचे बटाटे होते. तो भुकलेला, तहानलेला झाला होता. सोने खाऊन त्याची भूक थांबू शकत नव्हती.
मीडासला रडू आले. त्यावेळी त्याची मुलगी खेळून आली आणि वडिल रडताना पाहून ती त्याच्या कुशीत जाऊन अश्रु पुसू लागली. मीडासने तिला छातीजवळ घरले. परंतु त्याची मुलगी होती कुठे? मीडासच्या कुशीत ती सोन्याची झाली होती. ती येवढी जड होती की तिला उचलून घेवू शकत नव्हता. बिचारा मीडास डोके पकडून रडू लागला. देवदूताला त्याची दया आली. त्याला पाहून मीडास त्याच्या पाया पडला आणि स्फुंदून स्फुंदून प्रार्थना करू लागला, “तुम्ही दिलेले वरदान परत घ्या.
देवदूताने विचारले,”मीडास आता तुला सोने नको, सांग की ग्लासभर पाणी मौल्यवान आहे की सोने ? एक तुकडा पोळीचा चांगला की सोन्याचा?-
मीडास हात जोडून म्हणाला,”मला सोने नको. मला समजून चुकले की माणसाला गरजेपेक्षा जास्त सोने नको. त्याच्याशिवाय माणसाचे काम अडत नाही. परंतु एक ग्लासभर पाणी आणि एक घास अन्नाचा घेतल्याशिवाय माणसे काम करू शकणार नाही. आता मी सोन्याचा लोभ करणार नाही.”
देवदूताने एका भांड्यात पाणी घेऊन संगितले, हे सर्व ठिकाणी शिंपड, मीडासने ते पाणी आपल्या मुलीवर, टेबलावर , खुर्चीवर, अन्नावर, पाण्यावर आणि बागेतील सर्व वस्तूवर शिंपडून सर्व पदार्थ पहिल्यासारखे केले.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती लालची राजा मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण कधीही लोभ करू नये आहे त्यात समाधान मानावे नाहीतर आपली दशा हि गोष्टीतल्या राजा प्रमाणे होईल. आम्ही आशा करतो कि तुम्हाला लालची राजा मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.