मित्रांनो आज आपण बघणार आहोत लोकसंख्यावाढ एक समस्या मराठी निबंध. जस कि आपणा सर्वांना माहिती आहे कि लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याच्यामुळे आपल्या देशाला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत आहे. भारताची हि लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत चालली आहे जर भारत सरकारने लोकसंख्या वाढ नियंत्रणा बद्दल लवकरच काही कायदा आणला नाही तर लोकसंख्या वाढ हि भविष्यात येणारी सगळ्यात मोठी समस्या असेल.
लोकसंख्या वाढीचे काय परिणाम होऊ शकता हे जनतेला समजण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत loksankhya vadh marathi nibandh. शाळेत होणाऱ्या परीक्षेत देखील मुलांना या विषयावर निबंध विचारला जातो तर शालेय मुलं देखील या निबंधाचा सराव करू शकता. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग बघूया लोकसंख्यावाढ एक समस्या मराठी निबंध.
लोकसंख्यावाढ एक समस्या मराठी निबंध
लेकुरे उदंड जाहली। लोकसंख्या वाढली। प्रपंचकळा नांसली। जिकडेतिकडे समस्या।।
लोकसंख्यावाढ ! सगळ्या समस्यांचे मूळ कारण. आज लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक चीन या देशाचा लागतो. आज भारताची लोकसंख्या १०० कोटीच्या वर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या दहा कोटी आहे.
लोकसंख्यावाढ फार झपाट्याने झालेली आहे आणि ही समस्या फार जटील होत चाललेली आहे. जेथे जावे तेथे गर्दीचा प्रचंड महासागर दिसतो. मुंबई सारख्या शहरात लोकांचे थवेच्या थवे पहावयास मिळतात. एकट्या मुंबईत एक कोटी लोकसंख्या आहे. तेथे जसा समुद्र आहे आणि पाणीच पाणी पहायला मिळते, तसाच तेथे लोकांचा महासागर पहावयास मिळतो. किड्यामुग्यासारखे तेथे लोक वावरतांना दिसतात. रोज किती जन्मतात आणि मरतात याचा काही अंदाज नाही अशी परिस्थिती मोठमोठ्या शहरात सगळीकडे पहावयास मिळते. आज खेड्यात रोजगार मिळत नसल्याने लोकांची धाव शहरांकडे आहे. त्यामुळे खेडे ओस पडत चालले आहे आणि शहरांची लोकसंख्या वाढत आहे.
आज नवनवीन साधनांची, उपकरणांची रेलचेल झालेली आहे. रोगांवर अनेक प्रकारची औषधी निर्माण झालेली आहे. माणसाचे आयुर्मान वाढलेले आहे. अर्थातच मृत्यूसंख्येत घट झालेली आहे. ही मृत्यूसंख्येत झालेली घट कालांतराने लोकसंख्या वाढीला कारण बनलेली आहे.
लोकसंख्या वाढीमुळे सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे तो म्हणजे बेकारीचा प्रश्न ! स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली तरी सुद्धा आपल्या देशातील सामान्य माणूस हा सामान्यच राहिलेला आहे. जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य त्या प्राथमिक गरजा सुद्धा भागत नाही आणि त्यातून दारिद्र्याला आमंत्रण मिळते.
लोकसंख्या वाढीवर कायदयाने सुद्धा आळा घातला. निरक्षरता दूर केला. छोट्या कुटुंबाकरिता काही सवलती दिल्या. नुसत्या या गोष्टी कायद्यात करून चालणार नाही तर समाजातील लोकांना त्याचे महत्त्व कळायला पाहिजे. समाज प्रबोधन झाले पाहिजे.
लोकसंख्या वाढीच्या समस्येकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधावे यासाठी ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. वेगवेगळ्या घोषणा सुद्धा दिल्या जातात. जसे ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब, कुटुंब लहान सुख महान’ अशा प्रकारे लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अर्थातच लोकसंख्या कमी करण्यात यश आले तर सहजतेने बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला काम मिळेल, लोकांचे उत्पन्न वाढेल. जीवनमान उंचावेल. एकूण समाज सुधारेल आणि समाज सुधारला तर राष्ट्राची प्रगती होईल. म्हणून लोकसंख्या वाढीचा हा भस्मासुर कमी करण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता लोकसंख्यावाढ एक समस्या मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला लोकसंख्यावाढ एक समस्या मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.