मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत मला पंख असते तर मराठी निबंध. आपल्या सर्वाना माहिती आहे कि देवाने प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला व पक्षाला ज्याच्या-त्याच्या सोइ नुसार बनवलं आहे. प्रत्येकाची शारीरिक रचना हि वेग-वेगळ्या पद्धतीने केली आहे. म्हणून माणसाला दोन हात व दोन पाय आहेत, प्राण्यांना चार पाय आहेत व पक्षांना पायांसोबत पंख देखील आहेत म्हणून फक्त पक्षी हे हवेत उडू शकतात. परंतु तुम्ही कधी कल्पना केली आहे का कि माणसाला पंख असते तर? आजच्या Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh या निबंधाद्वारे आपण अशीच एक कल्पना करणार आहोत आपण बघणार आहोत कि माणसाला पंख असते तर माणसाने काय-काय केले असते.

मला पंख असते तर हा निबंध बऱ्याच वेळा शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत विचारला जातो तर शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सराव करून जाऊ शकता. तुम्हाला जर असेच आणखी निबंध हवे असतील तर तुम्ही आमच्या या वेबसाईट वर पाहू शकता या वेबसाईट वर शालेय विद्यार्थ्यांना लागणारे निबंध व इत्तर साहित्य उपलब्ध करून दिले जाते ज्याचा सराव तुम्ही आपल्या शालेय कामासाठी करू शकता. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमच्या एक छानश्या कमेंट ने आम्हाला अजून नवं-नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा मिळते. चला तर मग बघूया मला पंख असते तर मराठी निबंध.


मला पंख असते तर मराठी निबंध


आपण आपल्या सोभोवतालच्या परिसरात अनेक पक्षी उडताना बघतो त्यांना बघून प्रत्येकाच्या मनात विचार येतो कि मला पंख असते तर? आपल्या सर्वांना जेव्हा पण आपल्या मित्राची किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीची किंवा नातेवाईकांची आठवण येते तर आपण त्यांच्याशी फोन वर बोलतो ज्याने आपले मनोरंजन होते परंतु मला जर पक्ष्यांप्रमाणे पंख असते तर मला फोन वर बोलण्याची गरज नसती. मी पक्षांप्रमाणे उडत जाऊन माझ्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या घरा पर्यंत पोहचलो असतो आणि त्यांच्याशी सामोरा-समोर बोललो असतो ज्याने मला अजून जास्त आनंद मिळाला असता. जर मला पंख असते तर मी एखाद्या पतंगा प्रमाणे हवेत उडालो असतो आणि वरून जमीन कशी दिसते हे अगदी डोळेभरून पाहिलं असत.

मला उडायचं आहे, ढगांमध्ये फिरायचं आहे पृथ्वी वरच वातावरण अगदी डोळे भरून बघायचं आहे. लोक विमानाने हवेत उडतात त्यांना देखील मजा येत असेल परंतु स्वतःच्या पंखाने आकाशात उडण्याची मजाच वेगळी आली असती. पाहिजे तेव्हा मला आकाशाकडे भरारी घेता आली असती मी भरारी घेऊन आकाशच्या टोकाला पोहचलो असतो, ढगांमध्ये उडालो असतो याची कल्पना करूनच माझे मन अगदी आनंदी झाले आहे. म्हणूनच मला नेहमी वाटत कि मला पंख असते तर?

मी पक्षांप्रमाणे झाड्याच्या फांद्यांवर उडालो असतो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर गेलो असतो, थंड-थंड हवा घेतली असती आणि सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे मी झाडाची गोड फळे आनंदाने खाल्ली असती, ज्या फळांपर्यंत एक माणूस पोहचू शकत नाही त्या फळांपर्यंत मी एक भरारी घेतली असती आणि त्यांना खाण्याचा आनंद लुटला असता. मला ते फळ अगदी मोफत खायला भेटली असती मला ते फळ खाण्यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली नसती. जर मला खऱ्या आयुष्यात पंख असते तर किती छान झाले असते मी कुठेही अगदी आरामात जाऊ-येऊ शकलो असतो मला कुणीही अडवणार नसत. जर मला पंख असते तर पक्ष्यांना मला आपला भाऊ समजले असत आणि माझ्याशी खेळले असते त्यांच्या ची ची आवाजाने माझे मन अगदी प्रसन्न झाले असते. जर माझे पंख असते तर किती छान झाले असते मला वर्तमान काळात हे जग आणखी सुंदर वाटले असते.

जर हे पंख मिळाले असते तर विमानाने विनामूल्य प्रवास केला असता. ज्या देशाचा फोटो एखाद्या कागदावर किंवा टीव्ही बघितला होता तो देश अगदी प्रत्यक्षात पाहिला असता. वारा माझा ठिकाण राहिला असता, माझे पाय कधीच जमिनीवर राहिले नसते. माझे पंख आणि मी दररोज कुठेतरी फिरत असतो. माझ्या मित्राच्या वाढदिवसाला त्याला मी हे पंख गिफ्ट दिले असते, जे गिफ्ट पाहून त्याला देखील आनंद झाला असता आणि तो देखील एक दिवसासाठी अगदी आनंदाने पक्षाप्रमाणे हवेत उडाला असता.

मला असं वाटायचं की मला कुठेही फिरायचं आहे. माझ्या उडण्या दरम्यान प्रत्येक सुंदर देखावा माझ्या डोळ्यांमधून गेला असता. पकडा-पकडी च्या खेळात मला कुणीही पकडू शकले नसते. लपाछपी खेळताना देखील झाड्याच्या अगदी टोकावर जाऊन बसलो असतो म्हणजे मला कुणीही शोधू शकलं नसत. जर पाऊस पडला असता, तर मी भरारी घेतली असती आणि भरारी केल्यानंतर, पाऊस कसा पडतो हे पहिले असते. पुस्तकांमधून माहित असणे आवश्यक नाही. प्रत्येकजण केवळ अपेक्षेने त्यांच्या समोर पाहण्यास सक्षम असतो आणि मला देखील ते प्रत्यक्षात पाहायला आवडले असते.

असे दिसते की आज माझ्याकडे माझे पंख आहेत. माझे ज्ञान, माझे विचार. मी फक्त एक शरीर नाही तर एक आत्मा आहे. माझे पंख माझे ज्ञान आणि माझे विचार आहेत, जे मला सर्वत्र नेतात. जर ज्ञान असेल तर समजूतदारपणा आहे, आपले चरण फक्त चालू ठेवतात. डोळ्यांच्या स्वरूपात सर्व वेळ, ज्याला कोणीही कापू शकत नाही, वेगळे करू शकत नाही. दोघांनाही मोडता येणार नाही, किंवा मुरगळता येणार नाही कारण ते कधीच कुणाच्या हातात येऊ शकत नाही. माझ्याकडे पंख आहेत. ते दिसत तर नाहीत परंतु माझ्या सोबतच आहेत. फक्त ते अजून मोठे व्हावे आणि मला सर्वत्र घेऊन जावेत.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता मला पंख असते तर मराठी निबंध. मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. कारण मला पंख असणे हा विचार आपल्याला खूप मनोरंजन देऊन जातो. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *