मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध | marathi bhashechi kaifiyat marathi nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध. आपल्याला सर्वांना मराठी भाषेचा अभिमान आहे कारण मराठी हि आपल्या राज्याची राज्य भाषा आहे म्हणून महाराष्ट्रा मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा हि आलीच पाहिजे. मराठी भाषा हि ऐकायलाहि खूप छान वाटते. म्हणून महाराष्ट्रा मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना मराठी भाषे विषयी खूप प्रेम आहे. परंतु आज-कालची लोक हि मराठी भाषा हळू-हळू विसरत चालले आहेत. पण आम्ही असे होऊ देणार नाही म्हणून समाजात मराठी भाषे विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध. शालेय मुलांना देखील या विषयावर निबंध विचारले जातात म्हणून शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सर्व करू शकता. चला तर मग बघूया मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध.

मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध

धन्य मराठी माय माऊली, धन्य मराठा देश । जय बोला शिवछत्रपतींचा, जय जय श्री ज्ञानेश ।।

कवीच्या ओळी मराठी भाषेची धन्यता सांगताना आठवल्या खेरीज राहत नाही. ‘माझ्या मराठीचे बोल कवतीके, परि अमृताते पैजा जिंके ‘असे संत ज्ञानेश्वर स्वाभिमानाने सांगतात. ‘महाराष्ट्री (मराठी) असावे असे सर्वज्ञ’ असे श्री चक्रधरांनी बाराव्या शतकात सांगितले आहे. मराठी आमची नुसतीच बोलीभाषा नाही तर मायबोली आहे. आईची भाषा म्हणून महाराष्ट्राची मराठी ही ‘राजभाषा’ मानल्या गेली आहे. आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला मराठी बद्दल आत्मियता नव्हे, तर स्वाभिमान वाटायला पाहिजे. मी मराठी, माझी भाषा मराठी, माझे राष्ट्र मराठी ही भावना प्रत्येकांनी जपली पाहिजे. आपला सर्व व्यवहार मराठीतूनच केला पाहिजे.

कवी नरेंद्र मराठी भाषेची थोरवी सांगताना म्हणतात की,सहा भाषांचे रस एका बाटलीत भरून तयार केलेले अत्तर म्हणजे मराठी भाषा आहे, मराठी भाषेत अनेक साहित्य प्रकाराची निर्मिती केल्या गेली आहे. अनेकविध साहित्य प्रकाराची जोपासना केल्या गेली आहे. सर्व सामान्यांना समजेल अशी सुलभ, सुबोध भाषा म्हणून मराठीचे स्थान सर्वश्रेष्ठ ठरते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठीतच व्यवहार व्हायला लागले. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की, मराठीला राजभाषेचा सन्मान प्राप्त झाला. मराठी भाषेचे चरित्र, काव्य, नाटक, ललित निबंध, भजन, अभंग, भारूड, ओव्या असे विविध वाङ्मय प्रकार आहेत. तसेच मराठीची विविध रूपेही आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, पुणेरी, डांगी झाडी अशी गोंडस रूपं मराठीला प्राप्त झालेली आहे. या बोलीभाषा हृदयाचा ठाव घेणाऱ्या वाटतात.

उच्च शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवे – यशवंतराव चव्हाण.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *