Saturday, September 30, 2023
Homeमराठी निबंधमराठी सुविचार संग्रह | ५००+ सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह

मराठी सुविचार संग्रह | ५००+ सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह

मित्रांनो आज आपण बघणार आहोत सर्वोत्तम असे मराठी सुविचार. ज्याचे विचार सुंदर आहेत त्याचा कधीही पराभव होत नाही, त्याच्यासाठी यशाची हमी असते. कठोर परिश्रम, कर्मे आणि योग्य ज्ञान घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. यश मिळवण्यासाठी आपले मन आणि विचार शुद्ध करणे देखील आवश्यक आहे. सुविचार मानवांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून जीवनात एक माध्यम बनतात. हा विश्वास आहे आणि गीता देखील उपदेश देते की कर्म सर्वोत्तम आहे, एखाद्या व्यक्तीने कर्म केल्यावर त्याचे भाग्य, नशीब, अपयश हे सर्व एखाद्याच्या मनाचे उत्पादन असते म्हणून आपल्या जीवनात चांगले विचार अत्यन्त आवश्यक असतात.

ज्याला यश मिळवायचे आहे त्याला लहान घटना आणि अपयशाची भीती कधीच नसते. ज्याप्रमाणे एखादा वादळात देखील एक नाव बुडत नाही त्याचे कारण म्हणजे तिला समुद्रासमोर झुकणे आवडत नाही, त्याच कायकांना धार मिळते, म्हणजे त्यांना यश मिळते. आशा आहे की आपण वरील गोष्टींशी सहमत आहात आणि आपल्या जीवनात खालील कल्पनांचा अवलंब कराल, यशाचा मार्ग निवडून त्यास साध्य कराल. हे सुविचार तुमच्या जीवनात एक बदल घडवून आणू शकतात. म्हणून हे सर्व सुविचार वाचून त्यांच्यावर जीवनात अमल करणे फार आवश्यक आहे. हे सुविचार आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि आम्हाला कमेंट करून देखील नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून असेच लेख लिहिण्यास ऊर्जा देते चला तर मग बघूया मराठी सुविचार संग्रह.

मराठी सुविचार – Marathi Suvichar

Marathi Suvichar

शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करा
रस्ता मिळो किंवा अनुभव
दोघेही अद्वितीय आहेत.


चांगले दिवस पाहण्यासाठी
वाईट दिवसांचा सामना करावा लागतो.


आयुष्यामध्ये वडिलांचं असणं
हे कुठल्या खजिन्यापेक्षा कमी नाही.


पक्षी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरटे बनवून ठेवत नाही
ते फक्त आपल्या पिलांना “उडण्याची” कला शिकवतात.


जेव्हा तुम्हाला असे वाटेल कि मी काहीच नाही करू शकत
तेव्हा एक गोष्ट नक्की करा ती म्हणजे “प्रयत्न”


जीवनात फक्त दोनच
लोक अपयशी ठरतात.
पहिले ते जे विचार करतात,
पण काहीच करत नाही.
दुसरे ते जे काहीतरी करतात,
पण विचार कर करत नाही.


चोरी, अपशब्द आणि खोटेपणा,
या तीन गोष्टी चरित्र नष्ट करतात.


जर कठोर परिश्रम तुमचं हत्यार असेल तर,
यश हे तुमचं गुलाम बनेल.

marathi suvichar on education / मराठी सुविचार ऑन एजुकेशन

marathi suvichar on education

ज्ञानामधील गुंतवणूक
सर्वोत्तम व्याज देते.


शिक्षण हि जीवनाची तयारी नसते,
खरं म्हणजे शिक्षण हेच जीवन असते.


शिक्षण आणि कठोर परिश्रम,
ही एक सुवर्ण की आहे जी
बंद भाग्याचे दरवाजे,
अगदी सहजपणे उघडते.


शिक्षण हे एक असे शस्त्र आहे,
ज्याच्याने आपण संपूर्ण जग जिंकू शकतो.


शिक्षण घेतल्याशिवाय कुठलाही व्यक्ती
यशस्वी होऊ शकत नाही.


आज जे लोक शिक्षणाची तयारी करत आहेत,
त्या लोकांसाठी शिक्षण हे भविष्याचा पासपोर्ट आहे


जर तुम्हाला शिक्षण महागडे वाटत असेल तर,
अज्ञानी राहून बघा.


स्वातंत्र्याचा सुवर्ण दरवाजा उघडण्याची
गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण.

chanakya marathi suvichar / चाणक्य मराठी सुविचार

chanakya marathi suvichar

“जसे एक वासरू हजारो गायींच्या कळपामध्ये त्याच्या आईचा पाठलाग करतो. त्याचप्रमाणे माणसाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी त्याच्या मागे लागतात.” – आचार्य चाणक्य


“ज्ञानाची चोरी चोर देखील करू शकत नाही” – आचार्य चाणक्य


माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्मामुळे महान असतो.” – आचार्य चाणक्य


“देव मूर्तींमध्ये नाही. तुमच्या भावना तुमचा देव आहेत. आत्मा तुमच मंदिर आहे.” – आचार्य चाणक्य


“संकटात बुद्धीही चालत नाही.” – आचार्य चाणक्य


“एखाद्या कामाला करायला थोडा सुद्धा उशीर करू नका” – आचार्य चाणक्य


“शत्रूपासून आपले राज्य पूर्णपणे संरक्षित करा.” – आचार्य चाणक्य


“चांगले कर्मही जेव्हा नशिबाच्या विरुद्ध असतात तेव्हा ते दु: खी होतात .” – आचार्य चाणक्य

marathi suvichar by swami vivekananda / मराठी सुविचार बाय स्वामी विवेकानंद

marathi suvichar by swami vivekananda

जर स्वत: वर विश्वास ठेवणे अधिक शिकवले गेले असेल आणि अभ्यास केला असता तर मला खात्री आहे की बर्‍याच वाईट गोष्टी आणि दु: खांचा नाश झाला असता.


एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.


हे जग आहे; आपण एखाद्यास उपकार दर्शविल्यास, लोक त्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबविल्यास, ते त्वरित आपल्याला कुटिल सिद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे.


जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले.


अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते


दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.


दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.


पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.

Marathi Suvichar For Students / मराठी सुविचार फॉर स्टूडेंट

Marathi Suvichar For Students

ज्याप्रमाणे सूर्य स्वतः प्रकाशाचा प्रसार करतो त्याच प्रकारे अथक प्रयत्नानेच यश मिळते.


ध्येय साध्य करण्यासाठी आपला स्वतःचा मार्ग तयार करा, इतरांच्या मार्गाचा वापर करू नका.


आपण एखाद्यास दर्शविण्यासाठी अभ्यास करत असल्यास आपण स्वत: ला फसवित आहात.


आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यास, कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.


वाचनाला कधीही थांबवू नका, कारण ज्ञानाला मर्यादा नसते.


आपल्याकडून पैसे हिसकावून घेतले जाऊ शकतात, परंतु ज्ञान नेहमी आपल्याजवळ राहील.


यशाचा मार्ग नेहमीच खुला असतो, आपण त्यावर मात करू शकता की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे.


स्वप्न पाहणे ही वाईट गोष्ट नाही परंतु ती स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न न करणे ही वाईट गोष्ट आहे.


आपण काल ​​केलेल्या गोष्टीपेक्षा जर आपण अधिक करत असाल तर आज आपण यशाकडे वाटचाल करीत आहात.


मुंग्या त्याच्या दुप्पट वजन उचलून आपल्या ध्येयापर्यंत पोहचतात आपण तरी माणूस आहात.

Suvichar In Marathi Text / सुविचार इन मराठी टेक्स्ट

Suvichar In Marathi Text

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”


नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.


स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.


या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.


अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.


आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.


छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.


व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.


कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.


कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

Marathi Suvichar On Life / मराठी सुविचार ऑन लाईफ

Marathi Suvichar On Life

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान
एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.


कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं
“करणं” सांगत नाही.


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं
तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.


तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब
म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.


“जीवनात वेळ कशी हि असो.
वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”


जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.


प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

Lahan Marathi Suvichar / लहान मराठी सुविचार

Lahan Marathi Suvichar

“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”


“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”


“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”


“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”


“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”


“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”


“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”


“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”


“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”


“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”

Navin Marathi Suvichar / नवीन मराठी सुविचार

Navin Marathi Suvichar

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.


कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.


अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.


टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.


प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.


समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.


अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप.


पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो..


विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.


थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

Marathi Suvichar Sangrah For Whatsapp / मराठी सुविचार संग्रह फॉर व्हाट्सएप

Marathi Suvichar Sangrah For Whatsapp

आपल्याला पटतं तेच करायचं…
उगाच मन मारुन नाही जगायचं…


“तुला मनवण्यासाठी मन
युद्धपातळीवर विचार करतंय,
शब्दांची उलथा – पालथ करून
हे मन भाव त्यात नीट टीपतय…”


हम जियेंगे अपनी मर्जीसे और
तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे …


काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात..


काही लोक स्वत:च्या luck विषयी
एवढ्या बनवून गोष्टी सांगत असतात ना..
की जसे lucky_draw मधेच जन्माला आले आहेत हे लोक..


आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी.
आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


ज्ञान लेऊन सज्ज हो
शास्त्र घेउन कर्ता हो
जीव-जीवाशी हर्ष कर
धर्म होऊन शासन कर


नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.


एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.

Sant Dnyaneshwar Suvichar / संत ज्ञानेश्वर सुविचार

Sant Dnyaneshwar Suvichar

आज जरी यश, सुख, समृद्धी
माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते
याची सतत जाणीव ठेवून,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
– संत ज्ञानेश्वर


ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात.


माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.


मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.


कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे.


कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेऊन, मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.


ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात.


आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.


माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.


मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.

Motivational Marathi Suvichar / मोटिवेशनल मराठी सुविचार

Motivational Marathi Suvichar

हिम्मत एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.


महत्व वेगाला नाही
तर
आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला
चाललोय याला असत.


नशीबही हरायला तयार आहे
फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे


कितीही मोठे व्हा
पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.


खेळ असा दाखवा
कि
जिंकता आलं नाही
तरी
आपली छाप सोडता आली पाहिजे.


तुटता तारा बघून
स्वप्न पूर्ण होत
असती तर
सगळे रात्रभर जागून
त्याचीच वाट बघत असते ना.


इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.


दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य
तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.


चार पैसे कमी कमवा
पण
आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.


श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत.

मराठी सुविचार संग्रह – Marathi suvichar sangrah

Marathi suvichar sangrah

व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहुन नियतीवर नैतिक विजय मिळवा.


जन्मभूमीला आपल्या कर्तृत्वातून किर्तीच्या शिखरावर न्या.


स्वाभिमान जागृत ठेवूनच दिवसाची वाटचाल करा.


पुण्य करा, साधुसंतांच्या शिकवणुकीचे सार्थक होईल.


संतांच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास करा.


परमेश्वराला भक्तीमार्गाने आपलेसे करा.


परमेश्वराला प्रसन्न करणारी भक्ती करा.


सदासर्वदा प्रसन्न राहाणे हेच यशाचे खरे रहस्य आहे.


दिवसाची सुरूवात आई-वडिलांना वंदन करून करावी.


आई-वडिलांचे अनंत उपकार जन्मातही विसरू नका.


संतांनी सर्वप्रथम आई-वडिलांना गुरुस्थानी मानले हे सदैव लक्षात ठेवून वाटचाल करा.


मनातला अहंकार गिळंकृत करूनच दिवसाची छान सुरुवात करा.


दुसर्याच्या ज्ञानाची चर्चा करण्यापेक्षा स्वत:च्या ज्ञानाचे आत्मपरिक्षण करा.


परोपकार-सदाचार-नम्रता – सत्यवचन- तत्वनिष्ठा यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही.


ला-मुलींच्या कलागुणांना न्याय देऊन देशाभिमान जागृत करा.


ज्ञानदानाची भूमिका यशस्वीपणे बजावून विद्यार्थ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवा.


भक्ती करीत रहा, परमेश्वर काहीच कमी पडू देणार नाही.


अहंकारी माणसाला जगाची किंमत कळत नाही.


आपण चांगले वागलो तरच आपले पणातून आदर्श निर्माण करता येईल.


सत्य आणि अहिंसा यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही.


एकमेकांना नैतिक आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे.


प्रामाणिक आणि नि:स्वार्थी माणसे परमेश्वराला फार आवडतात.


आई-वडिलांची पुण्याई विसरू नका.


निष्कलंक चारीत्र्य जपणारी माणसे गौरवशाली इतिहास निर्माण करतात.


महापुरूषांप्रमाणे भारतीय संस्कृतीची प्राणपणाने जपवणुक करा. २७. भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य अमर्याद आहे हे लक्षात ठेवा.


आपल्या ताकदीचा उपयोग चांगल्या कामाकरता करा.


आळसाला आपला शत्रु समजून त्यापासून हजारो मैल दूर रहा.


स्वाभिमान जागृत ठेवून देशसेवा करा.


समाधानी आयुष्य जगण्यासाठी सत्याचा आधार घ्या.


सदासर्वदा गोरगरीबांची सेवा करा, परमेश्वर प्रसन्न होईल.


अशिक्षितांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नका मरणयातना भोगाव्या लागतील.


कमी बोलून समाजहितासाठी झगडत रहा.


अखंड परिश्रम करून मनुष्यजीवन सार्थकी लावा.


कोणतेही काम दर्जेदार कसे होईल याकडे काटेकोरपणे लक्ष द्या.


गोरगरीबांची सेवा करणे हाच आयुष्याचा सर्वोत्तम मार्ग होय.


निष्कलंक चारित्र्य हाच खरा पुरूषार्थ.


व्यसनाने माणूस राक्षस बनतो हे स्वप्नातही ध्यानात असू द्या.


नारी जातीचा आयुष्यभर यथोचित सन्मान करीत रहा.


सदासर्वदा खरे बोलणारी माणसेच देशसेवा करू शकतात.


संतांनी केलेली समाजसेवा प्रत्यक्षात आचरणात आणा.


मनुष्यजीवन लाखमोलाचे आहे हे सत्य विचारात घ्या.


संस्कारक्षम आयुष्य जगुन जगापुढे आदर्श निर्माण करा.


मिरवायचेच असेल तर कर्तृत्वाचे श्रेष्ठत्व मिरवा.


आपल्यापेक्षा इतरांना मोठे माना.


सत्यवचनी माणसाच्याच संगतीला रहायला शिका.


चांगले काम करताना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.


आयुष्यभर समाधान देत राहील असे सांगले काहीतरी करा.


माणुसकीचा आधार माणसाला खऱ्या अर्थाने सामर्थ्यसंपन्न बनवतो.


कर्तव्यनिष्ठ समाजनिर्मिती करणे हीच खरी देशसेवा होय.


आई-वडिलांनी केलेल्या संस्काराचा समाजाला फायदा करून द्या.


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेंषु कदाचन। चांगले कर्म करीत असताना फळाची अपेक्षा न धरता वाटचाल करा.


आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार निर्माण होईल असेच वर्तन करा.


व्यसनापासून कटाक्षाने दूर राहून उत्तम आरोग्य घडवा.


चांगले विचार माणसाला सुदृढ बनवितात.


कष्टातून स्वर्गसुखाची निर्मिती करा.


सदासर्वकाळ याचक बनून राहणे धोक्याचे आहे.


दानधर्म करीत रहा, कष्टाचे सार्थक होईल.


आपल्या आनंदी आयुष्यावर प्रत्यक्ष परमेश्वराची कृपादृष्टी असते हे ध्यानात घ्या.


नि:स्वार्थी प्रवृत्तीची माणसे समाजाच्या कायम स्मरणात राहतात.


सत्यवचनाचे सामर्थ्य अद्वितीय आहे


आयुष्यभर चांगले वागणार्याला कोणताही रोग होत नाही.


सातत्याने चांगली धडपड करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही.


खोटे बोलणार्यांच्या नशीबी अनंत यातनांचे भांडार खुलेच असते.


चांगले काम करा, कशाचीच भिती वाटणार नाही.


सत्कर्म करा, आयुष्यभर समाधानी रहाल.


सातत्याने मागत राहण्यापेक्षा देण्याचीही सवय लावून घ्या.


कमी आणि मुद्देसूद बोलणार्यालाच समाजप्रेम कळते.


तत्वनिष्ठा हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली होय.


विनम्र होऊन सज्जनांची सेवा करीत रहा.


चांगला माणूस त्याच्या प्रचंड कार्यक्षमतेने ठरत असतो.


गोरगरीबांना आणि अशिक्षितांनास्वातंत्र्याचा फायदा मिळवून द्या.


जो लवकर उठतो तोच भाग्यवान ठरतो.


सुशिक्षितांनी अशिक्षितांना मौलिक आधार द्यावा.


स्वातंत्र्याचा लौकीकार्थ समजावून घेऊन वाटचाल करा.


तरूण रक्ताचा चांगला उपयोग करून घ्या.


विश्वासाला मानवी जीवनात अतोनात महत्व आहे.


विश्वासाला पात्र राहुन मानवी जीवनाचे महत्व शतकोटीने वाढवा.


व्यसनांपासून हजारो मैल दूर राहणारा माणूस साक्षात देवदूतच समजा.


तत्वज्ञान पुष्कळ सांगावे पण अंगिकाराची सुरूवात स्वत:पासून करा.


पुण्याईच्या वाटेवर येण्यासाठी सत्कृत्य महत्वाचे ठरते.


तत्वनिष्ठेचे फळ गोड असते.


चांगल्या कामासाठीचा संघर्ष सर्वांनाच मनापासून आवडतो.


कष्ट हिच देवता समजून माणसाने प्रयत्नवादी व्हावे.


माणसाचे मोठेपण प्रचंड प्रमाणातल्या नैतिक सामर्थ्यावर अवलंबून आहे.


विकासावर भर देऊन स्वातंत्रय सत्कारणी लावण्याची शपथ घ्या, मानवतेचे कल्याण होईल.


रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यालाच आयुष्याचा अर्थ उमगतो.


स्वप्नवत सत्यापेक्षा साक्षात्कार तितकाच लाखमोलाचा ठरत असतो.


वहारातला प्रामाणिकपणा माणसाला मोठे बनवतो.


गरजवंतांची गरज भागवून लाखमोलाचे पुण्य कमवा.


वायफळ बडबडीपेक्षा कृतीवर भर देणे केव्हाही चांगले लक्षण ठरते.


उपजत ज्ञानाचा चांगला वापर कंरणारे बुध्दीवंत देशाला किर्तीच्या शिखरावर पोहचवतात.


एका हाताने दुसर्याचे घेताना आपल्या दुसऱ्या हाताला देण्याचीही सवय लागायला हवी याकडे कटाक्षाने लक्ष द्या.


आळशी माणसाला आयुष्यात काहीही कमावता येत नाही.


जो दुसर्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.


चैतन्यमयी परिस्पर्शने चांगले आयुष्य घडवता येते.


आई-वडिलांनी केलेले संस्कार आयुष्याला निर्णायक वळण देतात.


चांगल्यांच्या शोधात राहणे समाजासाठी हितकारक ठरते.


माणसाची एखादीही भयानक चुक आयुष्याची धुळधाण करायला पुरेशी ठरते.


चुका करूच नका, प्रगतीचा प्रशस्त मार्ग सापडेल.


नम्रतेने उत्तम आरोग्य आणि लोकप्रियता कमावता येते.


सुसंस्कृत मुले हीच देशाची खरी संपत्ती आहे.


चांगले तेच बोलत रहा, जगात वाईट काहीच नाही याची खात्री पटेल.


भारतीय संस्कृतीचे मोल अनमोल आहे.


नि:स्वार्थी माणसेच महापुरूषांचे विचार कृतीत उतरवू शकतात.


देशसेवेत पराकोटीचे पुण्य सामावलेले आहे.


जीवनातला खरा आनंद उपभोगण्यासाठी नेहमी खरे बोलावे.


दुसऱ्यांना अडचणींतून बाहेर काढताना होणारा आनंद अवर्णनीय असतो.


नेहमी दुसर्यांच्या हितासाठी झगडणाऱ्यांचेही एक समृध्द जग असते.


सदा सत्कर्म करा, परमेश्वर प्राप्तीचा आनंद उपभोगता येईल.


नियमात राहणार्यांच्या नशीबी सन्मानाचे जीवन ठरलेलेच असते.


खोटे बोलणार्याच्या नशिबी अवहेलनाच येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.


कष्टप्रद अनुभवातून व्यथित केलेले जीवन सत्कारणी लावता येते.


त्यागमय जीवनातच यशाचे रहस्य दडलेले असते.


समाजाकरता झगडणार्यांचे साक्षात परमेश्वर रक्षण करतो.


त्याग केला तरच मनुष्यजन्माची किंमत कळते.


सर्वगुणसंपन्न माणसांनाच समाजसेवा करता येते.


आपले हित कशात आहे हे ओळखायला शिका.


खोट्या सुखाच्या आहारी जाणार्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही.


महापुरूषांची चरित्रे आत्मसात करा.


दुसर्यांचे ऐकुन घेतो तोच श्रेष्ठ.


पुण्याईतून मिळालेले मोठेपणा सत्कारणी लावा.


पुण्यवंतांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून निर्धोक वाटचाल करा.


कर्तव्यात अधोरेखित केलेले जीवन हा लाखमोलाचे असते.


सत्य अरणि असत्य मानवी जीवनाचे मापदंड निश्चित करत असते.


गरजेएवढाच पैसा कमवा. नाव मात्र आभाळाएवढे कमवा.


निराधारांना आधार देणे हेच आपले प्रथम कर्तव्य समजा


स्त्रीजातीचा सन्मान करा, आयुष्याचे सार्थक होईल.


भारतीय संस्कृतीचा आदर्श जगभरात पोहचवा.


समृद्ध जीवननिर्मितीसाठी सज्जनांची संगत आवश्यक ठरते.


युवा शक्तीचे सामत्य अद्वितीय आहे.


महापुरूषांच्या विचाराची कास धरा.


तत्वनिष्ठेला प्राणपणाने जपा.


आयुष्यभर खरे बोलण्यांचे व्रत अंगीकारा.


उत्तम आरोग्य हेच जीवनाचे प्रमुख सत्ताकेंद्र आहे.


समाजसेवेचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्यालाच सत्ता मिळते.


जीवनात असे काही चांगले काम करा की त्याची सतत वाहवा होत राहील.


‘आधी केले मग सांगितले’ हा मुलमंत्र सामर्थ्यसंपन्न समाजनिर्मिती करतो.


सचोटी आणि प्रामाणिकपणा माणसाला समृद्धीच्या लाटेवर आरूढ करतो.


जनसेवा करा, सुखाची कमी पडणार नाही.


सुसंस्कृतपणाचा आरसा यशाचे प्रतिबिंब आहे.


नियमात बसेल तेच कर्तव्यात अधोरेखित करा.


प्रामाणिकपणा हाच यशाचा मुलमंत्र आहे.


निर्णायक क्षणी दाखवलेला कणखरपणा श्रेष्ठत्व सिध्द करतो.


गर्वाने कितीही छाती फुगवली तरी नियती योग्य तेच ठरवते.


घाबरायचेच असेल तर आपल्यातल्या करमीपणाला घाबरा.


कमी आणि मुद्देसूद बोला, लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील.


अधिक श्रमाने शरीर दमेल तर मन सुखात रमेल.


अधिकाधिक चांगले काम करणाराच पुरुषोत्तम ठरतो.


दुसरा अडचणीत असताना स्वस्थ बसूच नका.


अनंत यातना पचवणाराच माणुसकीचा खरा पुजारी असतो.


महापुरूषांचे विचार अगोदर स्वत: अंगीकारण्याचे सत्कर्म करा


संघर्ष निर्माण होईल इतके स्वत:तल्या अहंकाराला जागे करू नका.


मनातला सज्जनपणा महापुरूषांची निर्मिती करतो.


भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री-पुरूष भात समानता हाच सुसंस्कृतपणाचा खरा आरसा मानला जातो.


नारी जातीचा सन्मान करणारेच आपले श्रेष्ठत्व सिध्द करू शकतात.


आपल्या मुलांवर इतके संस्कार करा की समाजात सतत वाहवा होईल.


चांगूलपणाची सुरूवात स्वत:पासून करा.


निती-अनितीविषयी चांगला विचार करा, सद्गुणांची खाण सापडेल.


नैतिक पाठबळ निर्माण होईल असे कृत्य करा.


स्वार्थाचा पूर्ण नायनाट होईल इतके शुध्द अंत:करण ठेवा.


काळजीत आपला अमुल्य वेळ घालवू नका.


स्वार्थाच्या आडून मौल्यवान पीढीची बरबादी करू नका.


तिरस्कार करायचाच असेल तर व्यसनी माणसांचा करा.


व्यसनाधीनतेने कित्येक पिब्यांना पुरून उरेल इतके दुःख दिले आहे हे ध्यानात ठेवा.


मानवतेचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर व्यसनमुक्तीचा मुलमंत्र प्राणपणाने जपा.


स्वार्थाचा नायनाट करणारी प्रखर राष्ट्रभक्ती करा.


विश्वासाचे वातावरण निर्माण करणारी माणुसकी जपा.


कर्ज बुडवण्याची कुचकामी कृती करू नका, देशाच्या प्रगतीला हातभार लावाल.


विश्वासाने मिळालेला पैसा विश्वासाने परत करा, देशप्रेम वाढीस लागेल.


कर्जमुक्तीच्या आशेवर बसण्यापेक्षा व्यक्तीगत प्रगतीवर लक्ष केंद्रीत करा देशाची प्रगती होईल.


फुकटची आशा करण्यापेक्षा कष्टाने कमवायला शिका.


युगानुयुगे समाधान देणारी वातावरण निर्मिती करा.


श्रद्धा-अंधश्रद्धेची सरमिसळ करू नका.


सर्वधर्मसमभावानेच संस्कृतीची निर्मिती होऊ शकते हे सत्य विचारात घ्या.


महापुरूषांच्या मौल्यवान विचारांना आचरणात आणण्यासाठी सद्गुणांची कास धरा.


महापुरूषांच्या सद्विचारांना देशसेवेत परावर्तीत करायची कला शिका.


जगाच्या उद्धाराकरीता झटलेल्या महापुरूषांना जातीधर्मात अडकवू नका.


महापुरूषांची जयंती-पुण्यतिथी कशाकरीता साजरी करायची असते याचा विचार करा.


समाजाचे कल्याण करणारी भक्ती करा.


स्वाभिमान गहाण ठेवण्याइतके खचून जाऊ नका.


आत्मा हाच परमात्मा मानणान्यालाच जीवनातली सर्व सुखे उपभोगता येतात.


आयुष्याची शंभरी औट घटकेची होऊ देऊ नका.


स्वार्थरूपाने आयुष्यावर विराजमान झालेला राक्षस अगोदर गाडून टाका.


चांगल्या कामाची सुरूवात आपल्यापासून करा.


दुसऱ्याच्या सुखाची वहिवाट शोधण्याचा प्रयत्न करा.


सत्य पचवण्याची तयारी ठेवा, स्वर्गसुखाचा आनंद उपभोगाल.


स्वत:ला सत्कार्यात गुंतवून ठेवा. सुसंस्कृत पिढीची चिंता मिटेल.


सत्कार्यातच खरा परमेश्वर आहे हे पक्के ध्यानात ठेवा.


दुसर्याच्या कमीपणावर बोलण्यापेक्षा चांगला मार्ग सुचवण्याचा प्रयत्न करा.


चांगल्याची निर्मिती करायची असेल तर सद्विचारी व्हा. १९४.दुसऱ्यांच्या श्रेष्ठत्वाची कदर करायला शिका, विश्वाचे कल्याण होईल.


सुशिक्षितांकडून देशभक्तीची अधिकाधिक अपेक्षा करायला शिका.


आपापसात लढण्यापेक्षा स्वार्थाचा राक्षस गाडण्यासाठी आपली शक्ती खर्च करा.


कथा, किर्तन, प्रवचनाला जा. येताना ज्ञान घेऊनच या.


मानवजातीला कमीपणा आणणारी कृती सात जन्मातही करू नका.


मायेचा ओलावा निर्माण होईल अशी दिलदार कृती करा.


marathi uccha vichar

माणसातल्या देवाला अगोदर ओळखायला शिका.


सद्वर्तनाला साक्षी ठेवूनच परमेश्वराचे स्मरण करा.


मुक्या प्राण्यांवर दया करणारा सर्व मानवजातीला प्रिय असतो.


नम्रतेशिवाय मिळवलेले कोणतेही श्रेष्ठत्व क्षणभंगूर ठरते हे लक्षात ठेवा.


शंभरटक्के साक्षरतेबरोबर शंभर टके माणुसकीलाही तितकेच अमर्याद महत्व आहे.


पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो.


माणसातली माणुसकी ओळखणारा माणुस परमेश्वराला प्रिय असतो.


हजारो धर्मग्रंथाइतके श्रेष्ठत्व माणुसकीत आहे हे लक्षात घ्या.


परमेश्वराच्या दारात स्वार्थत्याग हाच सर्वश्रेष्ठ त्याग मानला जातो.


तत्वज्ञानी माणसांकडून कृतीची अपेक्षा धरणे केव्हाही चांगले लक्षण मानले जाते.


परोपकार करा, पुरूषार्थ गाजवण्याची संधी मिळेल.


हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका, गुलामीत राहू नका.


हुंडा घेण्यापेक्षा मुलामलींच्या भविष्याची जबाबदारी घ्या, जीवनाचे सार्थक होईल


परक्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्यातल्या परकेपणावरचा अविश्वास संपुष्टात आणा.


आळशी माणसाच्या सावलीचाही तिरस्कार करा, पण त्याला अधिकाधिक आळशी बनण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न करा.


प्रेमाने होणारी कामे भांडून आयुष्यातही पूर्ण होणार नाहीत हे ध्यानात घ्या.


लहान मुलांशी प्रेमाने वागा, जगाला प्रेम देता येईल


सत्याचा आधार घेऊनच सर्वांगीण प्रगतीचा विचार करा.


प्रामाणिक माणसांवरचा विश्वास समृद्ध राष्ट्रनिर्मिती करतो.


अनुभवसंपन्न ज्ञानाचा खजिना जवळ बाळगणारेच खरे तत्वज्ञानी मानले जातात.


तत्वज्ञान शिकवणारे भरपूर आहेत, अंगीकार करणारे वाढतील कसे याचाच सातत्याने विचार करा.


उपकारकत्त्याला वेदना होईल अशी कृती चुकूनही घडू देऊ नका. २२२. उपकारकर्त्याला परमेश्वरासमान माना.


कष्ट करणार्या माणसाला मोबदला बुडवू नका, आयुष्यातले सर्वात जास्त नुकसान टाळता येईल.


पर्यावरणाचा समतोल राखण्यातच समाजहित सामावलेले आहे हे पक्के ध्यानात ठेवून वाटचाल करा.


निरूत्साही शरीराची माणसे दुसर्याला वेदना देतात.


जेवढे जास्त उत्साही राहाल तेवढे प्रत्येकाला जास्त आवडाल.


निरर्थक बडबड करण्यापेक्षा सुचक मौन बाळगा, समाजमनाला आनंदाचे भरता येईल.


पाश्चिमात्य संस्कृतीचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यातल्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार करा.


भारतीय संस्कृतीचा मोठेपणा आदश्शात परावर्तीत करा.


शिस्त, प्रामाणिकपणा आणि निटनेटकेपणाचा अंगीकार करणारी माणसे परमेश्वराला फार आवडतात.


कष्ट करणार्या माणसांना जीवनात काहीच कमी पडत नाही.


साधु संतांनी सांगितले ते लोकांना सांगाच, पण स्वत:चेही काही तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करा, खरे तत्वज्ञानी व्हाल.


आयत्या पिठावर रेघा ओढण्यापेक्षा कष्टाची किंमत ओळखा, धनवान व्हाल.


ज्ञान संवर्धन हे समाजसेवेचे प्रमुख साधन बनवा.


घड्याळाकडे पाहून शिकवू नका ज्ञानाची आणि मनाची किंमत वाढेल.


वेळेचे महत्व विचारात घेऊन चांगल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्या.


प्रत्येकाने सरकारी कामे नियमात राहूनच पूर्ण करावीत, भ्रष्टाचार होणार नाही.


विजेची बचत करा. आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरू नका, राष्ट्रसेवा साधता येईल.


प्रखर राष्ट्रभक्ती करणारा माणूस आयुष्यातही भ्रष्टाचार करणार नाही हे ध्यानात घ्या.


अशिक्षितांना फसवून स्वत:ची पोळी भाजून घेऊ नका कारण तेच खरे भ्रष्टाचारेचे उगमस्थान ठरते.


स्वत:च्या विद्वत्तेचा फायदा दुसऱ्यांना करून द्या, समाजोद्दाराची संकल्पना कृतीत उतरवु शकाल.


जागतिक परिस्थितीशी मिळते जुळते घेताना भारतीय संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवा.


साधुसंतांच्या पावलावर पाऊल ठेवून चला, मनुष्यजन्माची किंमत कळेल.


अशिक्षितांना हिणवून स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका, ज्ञानसंपन्नता धोक्यात येईल हे लक्षात ठेवा.


मुलगा आणि मुलगी यांना देवाघरची फुलं समजून स्त्रीभ्रूण हत्या रोखा.


संयमाने रागावर नियंत्रण मिळवा, राष्ट्र कल्याणाचा मार्ग सापडेल.


आईवडिलांचा आत्यंतिक आदर करून आयुष्याची सार्थकता सत्कारणी लावा.


अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मौल्यवान मानवी जीवनाला धुळीला मिळवू नका.


धर्माधर्मात भेद मानू नका, विश्वकल्याणाची संकल्पना कृतीत उतरवाल.


स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्यवंताचे पदोपदी स्मरण करून समाधानी जीवन जगा.


गरीबातल्या गरीबाला मायेचा आधार देऊन माणूसकीला नव्याने उजाळा द्या.


पगाराइतके काम करा, समाजाचे हित साधले जाईल, इतकी ज्ञानसंपन्नता साधली जाईल.


परस्पर विश्वास आणि समन्वयातून माणसांतला वैचारिक भेद नष्ट करा.


धर्म ग्रंथामधल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अंगीकार करायला शिका.


आपल्याइतकेच इतरांना श्रेष्ठ माना, भगवंताची कृपावृष्टी होईल.


भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे पण भावनेकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नका.


कर्तव्यतत्परतेच्या उंचीने आभाळाएवढे काम करता येते हे महापुरुषांनी सिद्ध करून दाखविले आहे.


टीका करण्यावर भर देण्यापेक्षा सुधारणा सुचवा.


सत्कार्यच करीत रहा. मानवी जीवनाचे कल्याण होईल.


गरीब, गरजु आणि अशिक्षितांना मायेचा आधार द्या.


पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीच सर्वश्रेष्ठ आहे.


गरीबीची हेटाळणी करू नका स्वकर्तृत्व सत्कारणी लागेल इतके देशसेवेत झोकुन द्याल.


घामाने मिळवलेले ऐश्वर्य आयुष्यभर समाधान देत राहते.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता मराठी सुविचार संग्रह. मी अशा करतो कि तुम्हाला हे सुविचार आवडले असतील जर तुम्हाला हे सुविचार आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments