माझा वाढदिवस मराठी निबंध | Maza Vadhdivas Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझा वाढदिवस मराठी निबंध. माझ्या वाढदिवशी लिहिलेला हा निबंध खालील वर्गातील मुलांना खूप उपयोगी पडणार आहे ते वर्ग म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडणार आहे. आपल्याला बऱ्याच वेळा शालेय परीक्षेत किंवा स्पर्धेत माझा वाढदिवस हा मराठी निबंध विचारला जारो तर आपण या निबंधाचा उपयोग करू शकता. जर तुम्हाला आणखी दुसऱ्या विषयावर निबंध हवे असतील तर तुम्ही आमची वेबसाईट चेक करू शकता या वेबसाईट वर तुम्हाला शाळेत लागणारे भरपूर निबंध दिले आहेत. चला तर मग बघूया Maza Vadhdivas Nibandh In Marathi.


माझा वाढदिवस मराठी निबंध


प्रस्तावना

मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझा वाढदिवस मराठी निबंध. वाढदिवस साजरा करणे प्रत्येकाला आवडते. वर्षातून एकदा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि सर्व लोक हा संपूर्ण आनंद आणि उत्साहाने साजरा करतात. मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत, नातेवाईक आणि मित्रांसह साजरा करतो. १९ ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे.

वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवसाला आपण वाढदिवस म्हणून साजरा करतो. माझा वाढदिवस हा आनंदाने साजरा व्हावा या साठी माझे नातेवाईक व माझे पालक कोणतीही गोष्ट हि अपूर्ण राहू देत नाही. जर आपण आजच्या काळात बघायला गेलं तर श्रीमंत लोकं हे वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.

प्रत्येकाच्या परिस्थिती नुसार लोकं आपला वाढदिवस हा साजरा करत असतात. जशी ज्याची परिस्थिती असेल तशी तो व्यक्ती आपल्या घराची सजावट करतो. श्रीमंत लोकं आपला वाढदिवस हा नेहमी एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये साजरा करत असतात परंतु गरीब लोकं हे आपल्याला घरालाच सजवतात व आपला वाढदिवस साजरा करतात.

कदाचित असा कुणी व्यक्ती असेल जो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दुखी राहत असेल. वाढदिवसाच्या दिवशी सगळे लोकं आपल्याला शुभेच्छा देतात वाढदिवस हा आनंदाने भरलेला असतो आणि याच सोबत आपल्या घरातील वातावरण हे देखील आनंदमयी असते.

वाढदिवसाची सकाळ

ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो त्याच्या पहिल्या दिवशी मी रोजच्या वेळेपेक्षा लवकर झोपतो कारण दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या दिवशी मला सकाळी सकाळी लवकर उठायचं असत. सकाळी लवकर उठल्यावर मी सगळ्यात आधी दात घासून अंघोळ करतो कारण आई-बाबांनी घेतलेले नवीन कपडे घालण्याची मला खूप घाई झालेली असते.

सकाळी लवकर उठल्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईकांचे व मित्र-मैत्रिणींचे कॉल सुरु होतात. काही लोकं तर मला व्हिडीओ कॉल करून देखील शुभेच्छा देतात. आई-बाबा माझी सकाळी ओवाळणी करतात आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मी सकाळी उठलो तेव्हा मला आई-बाबांसह घरातील इतर सदस्यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सकाळी मी आई-वडिलांसोबत मंदिरात जातो. त्यानंतर मी वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतो. माझी आई मला टिळक लावते आणि मला लाडू आणि खीर भरवते. आई आणि बाबा एकत्रितपणे दरवर्षी मला एक छान भेटवस्तू देतात.वाढदिवसाची सजावट आणि तयारी सकाळपासूनच सुरू होते. वाढदिवसाच्या एक महिन्यापूर्वी वाढदिवसाचे नियोजन सुरू होते. त्यानंतर मी सकाळी शाळेत जातो आणि माझा वर्ग आणि शाळेत सर्व विषयांचे शिक्षक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजकालच जग हे डिजिटल जग आहे आणि खूप सारे लोकं हे सोशल मीडिया चा वापर देखील करतात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. माझे सर्व मित्र व नातेवाईक मला वाढदिवस निम्मित सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देतात. सोशल मीडिया हे अतिशय मजबूत माध्यम आहे. ज्याच्या बाध्यमातून माझे मित्र व माझे नातेवाईक मला अगदी सेकंदामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

आजच्या काळात मोबाईल फोन हा प्रत्येक व्यक्तीकडे उपलब्ध असतो. वाढदिवसाच्या या सुवर्ण क्षणाला लोक आपल्या मोबाईल फोन च्या कॅमेऱ्या मध्ये कैद करून ठेवतात. आणि त्या कैद केलेल्या फोटोंना लोक एक-मेकांसोबत share करतात. माझ्या वाढदिवसाचे फोटो देखील माझ्या मित्रांनी आपल्या मोबाईल मध्ये क्लिक करून सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत कारण आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे.

वाढदिवसाच्या दिवशी रात्रीची पार्टी

रात्र झाल्यावर मी आणखी नवे कपडे घालून तयार होतो. माझे सर्व नातेवाईक आणि मित्र परिवार माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होतात. सर्व जण माझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये छान-छान कपडे घालून येतात आणि माझ्या साठी छान-छान भेटवस्तू देखील आणतात त्याच्यासोबतच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतात. वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू घेणे प्रत्येकाला आवडते. मलाही प्रत्येकाने दिलेली भेट आवडते. संगीत नाटकं आणि प्रत्येकजण एकमेकांशी बोलत आनंदित असतो आणि नृत्य देखील केले जाते.

वाढदिवसाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवले जातात. घरी मिठाई, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक आणि कॉफी इत्यादींचे आयोजन केले जाते. वाढदिवसाचा केक ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला लहान मुळापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना केक फूड आवडतात. जेव्हा मी केक कापतो, तेव्हा माझे सर्व नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीय वाढदिवसाचे गाणे गातात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

मी आज खूप आनंदी आहे सर्व वडीलधारे माणसे मला आज आशीर्वाद देत आहेत. या दिवशी मला खूप सार प्रेम आणि आशीर्वाद मिळतो. वाढदिवसाच्या पार्टीला मी सर्व शालेय मित्रांना व शिक्षकांना देखील आमंत्रित करतो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व जण आपला किमती वेळ काढून सहभागी होतात या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. शिक्षक माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी वेळ काढतात, हे माझ्यासाठी पुरेसे आहे.

सर्व काका काकू माझ्या दीर्घ आयुष्याबद्दल माझे आभार मानतात. प्रत्येकजण मला एक भेट देतो दरवर्षी माझे पालक माझ्यासाठी उत्कृष्ट आणि संस्मरणीय कार्यक्रम आयोजित करतात. सर्वांचं इतकं प्रेम आणि आनंद मिळाल्यानंतर माझे डोळे ओलसर झाले. मी देवाला प्रार्थना करतो की दरवर्षी हा दिवस असाच जावो. त्यानंतर सर्व मित्र व नातेवाईक स्वादिष्ट भोजन करतात त्या सगळ्यांना दर वर्षी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीतले भोजन हे खूप आवडते ते सर्व त्या भोजनाची खूप तारीफ स्तुती करतात.

आवडत्या थीमनुसार मोठी पार्टी

आजकाल काही श्रीमंत आणि धनवान लोक त्यांच्या इच्छित थीमनुसार पार्टी करतात. अशा वाढदिवसाच्या मेजवानीवर पाण्यासारखे पैसे टाकले जातात. प्रत्येकजण थीमनुसार कपडे घालतो. आजकाल मुलांच्या पार्टीत त्यांच्या पसंतीचे व्यंगचित्र केक, पिक्चर केक बनवले आहेत.

अशाप्रकारे पार्टी वाढदिवस कार्यक्रम आयोजित केले जातात. केक थीमनुसार तयार केले गेले जातात. मुलांच्या थीम पार्टीमध्ये जादुई कार्यक्रम आयोजित केले जातात. थीमनुसार सजावट केली जाते. थीमनुसार केक देखील ऑर्डर केले जातात. संगीत आणि नृत्य यासाठी डीजे इत्यादी बोलवले जातात.

काही पार्टी अगदी रात्रभर राहते. ही पार्टी खूप नेत्रदीपक असते. संगीत खुर्ची या सारखे खेळ देखील मनोरंजनासाठी खेळले जातात. शेवटी सर्व पाहुण्यांना परतीची भेटही दिली जाते. थीम बर्थडे पार्टीत फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरही तिथे असतात. थीम बर्थडे पार्टी घरापासून बागेत सजविली गेली असते.

मित्र आणि नातेवाईकांसह मजा

प्रत्येकजण उघडपणे मजा करतो. काही लोक सर्व प्रकारच्या गोष्टी करतात, गाणी गातात आणि त्यांचा आनंद घेतात. सर्वांना आनंदी पाहून मला खूप समाधान मिळते. मला नेहमीच हे संस्मरणीय क्षण आठवतात. पार्टी संपल्यानंतर मी माझ्या मित्रांसह काही भेटवस्तू उघडतो. मला आनंद वाटतो की प्रत्येकाने मला अशा उत्कृष्ट भेटवस्तू दिल्या.

मग रात्री अकरा वाजता माझ्या वाढदिवसाची पार्टी संपली. आपल्याला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा लोक पूर्ण आनंद घेऊन घरी परत जातात. मित्र आणि प्रियजनांबरोबर वाढदिवस साजरा करणे ही वेगळी गोष्ट आहे. पार्टी एन्जॉय केल्यावर सगळेजण निरोप घेऊन आपल्या घरी निघतात.

तात्पर्य

प्रत्येकाला त्यांचा वाढदिवस आवडतो. आजूबाजूचे लोक त्याला या दिवशी खास व्यक्तीसारखे वाटतात. वाढदिवशी, आम्हाला आपले महत्त्व अधिक कळते. लोक आपला हा दिवस आठवतात आणि आम्हाला आनंदी शुभेच्छा देतात. या अविस्मरणीय दिवसाचा हा उत्सव मी कधीही विसरणार नाही. हा दिवस पसंत नसलेला कदाचित् कोणी व्यक्ती असेल. या दिवशी सर्व लोकांना आनंदी आणि खुश राहण्याची संधी मिळते. वाढदिवसाच्या या शुभेच्छा मला नेहमीच आठवतात. अशी आशा आहे की दरवर्षी हा वाढदिवस साजरा होईल आणि मला यासारख्या आनंदी शुभेच्छा मिळत राहतील.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता माझा वाढदिवस मराठी निबंध मी अशा करतो कि आमच्या द्वारे लिहिला गेलेला हा निबंध तुम्हाला आवडला असेल व हा निबंध तुमच्या उपयोगात येईल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो.

जर तुम्हाला माझा वाढदिवस मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून देखील नक्की कळवा कारण तुमची एक गोड कमेंट आम्हाला असेच अप्रतिम निबंध लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *