माझे बाबा मराठी निबंध | Maze Baba Marathi Essay

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत माझे बाबा मराठी निबंध म्हणजेच Maze Baba Marathi Essay या लेखामध्ये तुम्हाला माझे बाबा या विषयावरती २ निबंध दिले आहेत प्रत्येक निबंध मध्ये वेगळा शब्दप्रयोग केला आहे कारण मुलांना कायम परीक्षेमध्ये माझे बाबा या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितलं जातो. तुम्ही तुम्हाला हव्या त्या निबंधाचा वापर करू शकता आणि तुम्हाला निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग सुरु करूया.

माझे बाबा मराठी निबंध (क्रमांक १)

“माझे बाबा मराठी निबंध” एक बाबाच असे असता ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते ते आपल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या तस्सेच नैतिक जबाबदाऱ्या देखील पार पाडत असतात. प्रत्येक घरामध्ये वडिलांना एक कठोर व्यक्ती म्हणून ओळखलं जात परंतु त्याच्या मागे देखील काहीतरी कारण असत आपले वडील आपल्याला जितके कठोर वाटतात तितकेच ते मायाळू देखील असतात. एक वडीलच असे असतात जे स्वतःच्या आनंदाचा विचार न करता आपल्या कुटुंबाला व नातेवाईकांना आनंदी ठेवण्यामध्ये व्यस्त असतात. वडिलांसारखा संघर्ष करणारा दुसरा व्यक्ती क्वचितच कोणी असतो. वडील हे आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी काहीही करू शकतात ते स्वतःसाठी काही करणार नाही परंतु आपल्या कुटुंबासाठी सगळं काही करतील.

माझे वडील हे एक शेतकरी आहे ते शेती करून आमच्या संपूर्ण कुटुंबाचे पालन-पोषण करतात व आम्हाला आनंदी ठेवतात. माझे बाबा हे खूप शांत स्वभावाचे आहे. माझे वडील माझ्या संपूर्ण गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मी त्यांच्याकडे जी गोष्ट मागितली ती लगेच आणून देतात. माझे वडील हे अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे आहे, ते आपले काम अत्त्यंत कष्टाने करतात त्यांचं असं म्हणणं आहे कि कष्टाचा पैसे हा आपल्याला कायम टिकतो. माझे वडील आपला मौल्यवान वेळ काढून तो वेळ माझ्याशी गप्पा मारण्यामध्ये घालवतात दिवसभर काय घडलं, मला काही समस्या आहे का, मला काही हवं आहे का या सर्व गोष्टींची चौकशी करतात आणि मी जर त्यांना माझी काही समस्या सांगितली तर लगेच त्या समस्येचं निवारण देखील करतात.

माझ्या वडिलांची शिस्त हि खूप कडक आहे त्यांना वाईट मार्ग हा अजिबात आवडत नाही ते लोकांना देखील शिस्तीच पालन करण्याचा सल्ला देतात आणि ते स्वतः देखील शिस्तीचं पालन करतात. माझे बाबा आपले संपूर्ण काम वेळेवरच पूर्ण करतात आणि मला देखील सर्व काम वेळेवरच पूर्ण करायला सांगतात ते मला देखील नेहमी शिस्त पाळण्याचा सल्ला देतात आणि शिस्त पाळण्याचे फायदे देखील सांगतात. त्यांचं स्वप्न आहे कि मी खूप शिकावं आणि डॉक्टर बनाव, गरीब लोकांचा इलाज करावा ते या कामाला करण्यासाठी मला खूप प्रोत्साहन देत असता आणि माझी पण जिद्द आहे कि मी त्यांचं हे स्वप्न नक्की पूर्ण करणार आणि त्यांचे शीर हे गर्वाने उंचावणार.

माझे बाबा माझे जीवन, आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य गंभीरतेने घेतात कोणत्याही गोष्टीकडे कधीच दुर्लक्ष करत नाही ते सर्वांची मदत करत असतात आणि सर्वांना शिकवतात पण कि कोणतेही काम हे जर मनापासून केले तर ते नक्की यशस्वीरीत्या पार पडते. माझे बाबा आमच्या कुटुंबासाठी देखील आपला मौल्यवान वेळ देतात आम्हाला फिरायला घेऊन जातात आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. माझे बाबा कधीही आपली समस्या आमच्यापुढे येऊ देत नाही किंवा आम्हाला असे समजू देखील देत नाही कि त्यांना काही समस्या आहे अनेक समस्यांनी त्रासलेले असून देखील ते आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतात व आमच्या आनंदात स्वतःच आनंद असे समजतात.

जर माझ्या कडून काही चुकी झाली असेल तर माझे बाबा माझ्यावर कधीच हात उचलत नाही आणि माझ्यावर कधी ओरडत देखील नाही ते अतिशय प्रेमाने मला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ती चूक का करू नये याच कारण देखील सांगतात त्यांनी इतक्या प्रेमाणे समजून सांगितलेलं असत कि ती चूक पुन्हा करण्याची माझी हिम्मत किंवा इच्छा देखील होत नाही माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे बाबा कोणतीही समस्या आल्यावर त्या समस्येवरचे नियंत्रण हरपत नाहीत ते धीराने आणि संयमाने त्या समस्येचे निवारण करतात. मी माझ्या बाबांकडून शिकलो आहे कि आयुष्यात कितीही मोठी समस्या आली तरी त्या समस्ये वरच नियंत्रण कधी गमवायचा नाही आणि कायम खऱ्याची साथ द्यायची त्या समस्येचं निवारण नक्की होणार.

वेळोवेळी ते चुकीच्या गोष्टींबद्दल मला माहिती देतात आणि मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात. म्हणून मी शेवटी एवढेच सांगू इच्छितो कि मला गर्व आहे माझ्या वडिलांबद्दल कारण त्यांच्यासारखा व्यक्ती संपूर्ण जगात शोधला तरी कुठेच सापडणार नाही.

माझे बाबा मराठी निबंध (क्रमांक २)

रुपलेखा

वडिलांसारखा संघर्ष आपल्या जीवनात दुसरा कोणताही व्यक्ती करू शकत नाही संघर्ष करून आपल्या जीवनात यशस्वी कस व्हायचं हे फक्त आपल्या वडिलांकडून शिकता येऊ शकत. एक वडीलच असे असतात जे आपल्या समस्यांचा व आपल्या आनंदाचा विचार न करता आपल्या परिवाराला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी रात्र-दिवस काबाड कष्ट करत असता. एक वडीलच असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याचा विचार करतात आणि संपूर्ण जीवनात कष्टाचा व समस्यांचा सामना करून आपल्या परिवाराला सुखी ठेवतात.

एक वडीलच असे असतात जे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह आपल्या नैतिक जबाबदाऱ्या देखील पार पाडत असतात. एक वडील आपल्या संपूर्ण आयुष्यात एक कठोर व्यक्ती म्हणून जगात असतात त्यांचं कठोरतेच कारण म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाला योग्य वाटेवर चालवणं पण ते जितके बाहेरून कठोर दिसत तितकेच ते आतून दयाळू देखील असता. ते कायम आपल्या आनंदाला बाजूला ठेऊन आपल्या परिवाराच्या आनंदाचा विचार करत असतात. ते आपल्यासाठी कायम कमी वस्तू विकत घेतात परंतु आपल्या मुलांना आणि परिवाराला कधीही कुठल्याच वस्तूची कमी पडू देत नाही. एक बाबाच असे आहे जे नेहमी एक मुलगा, एक भाऊ आणि एक चांगले जोडीदार म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असता.

जीवनात वडिलांचे महत्व

माझे बाबा हे जगातील सगळ्यात चांगले व्यक्ती आहे ते आपलं काम अगदी मन लावून करतात व खूप कष्ट देखील घेतात. आधी आम्ही खूप गरीब होतो दोन वेळच जेवण देखील मिळत नव्हतं पण माझ्या बाबांनी कष्ट करून आमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधरवली आणि हि त्यांचीच देणं आहे कि मी आज एक चांगल्या शाळेत चांगलं शिक्षण घेत आहे. माझे वडील जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती हि नाजूक होती ज्या कारणाने ते जास्त शिकू शकले नाही परंतु त्यांची इच्छा आहे कि मी खूप शिकावं आणि एक चांगला व्यक्ती बनाव. मी यशाचा मंत्र माझ्या बाबांकडून घेतला आहे ते नेहमी म्हणत असता कष्ट करत रहा यशाच्या फळाची चिंता नको करू.

म्हणूनच मी कायम कष्ट करत असतो. माझ्या बाबांनीच मला शिकवलं कि नेहमी खरे बोलावे आणि सतत दुसऱ्यांची मदत करावी त्यांच्या या शिकवणीमुळे मी नेहमी खरं बोलतो आणि समाजामध्ये मला शक्य तितकी लोकांची व माझ्या वर्ग मित्रांची मदत करतो. माझ्या बाबांनी मला शिकवलं कि पैशाचा वापर हा योग्यरीत्या कसा करावा मी जेव्हा लहान होतो तेव्हा बाबा मला खर्चायला काही पैसे द्यायची मी ते पैसे असेच करत होतो पण बाबांनी जेव्हा पासून पैसे कसे खर्च करायचे हे शिकवले तेव्हा पासून मला पैश्याची खरी किंमत समजली आणि मी वायफळ खर्च बंद केला. माझे वडील खूप कष्ट करून घर चालवतात पण आम्हाला कधीही कुठल्या गोष्टी ची कमी भासू देत नाहीत.

संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर माझे वडील हे खूप दमलेले असतात पण आम्हाला दिवसभर वेळ दिला नाही या कारणाने ते थकून आल्यावर सुद्धा तो वेळ आमच्याशी गप्पा मारण्यामध्ये घालवतात. आपल्याला काही अडचण आहे का, काही हवं आहे का याची विचारपूस देखील करतात. ते कायम आपल्या परिवाराला मी आनंदी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मनात कितीही सुख असलं तरी, त्यांच्या अश्या स्वभावामुळेच मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन मिळत. त्यांनी आम्हाला कायम पुढे कस जायचं हेच शिकवलं कितीही अडचणी आल्या तरी आपली वाट सोडायची नाही अडचणींचा सामना करायचा तुम्हाला यश नक्की मिळेल अशी त्यांची शिकवण.

माझे वडील हे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या या चांगल्या प्रकारे समजतात म्हणून ते कष्ट करायला कधीही मागे हटत नाही आणि आळस देखील कधी करत नाहीत ते दररोज कामाला जातात ते आपले कर्तव्य कधीच विसरत नाहीत. मला असं वाटतं की वडिलांसारखे बलिदान आणि प्रेम इतर कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. माझ्या बाबांनी मला शिकवली कि इतर लोकांचा कायम आदर करा आणि त्यांची मदत करा कारण जशी वागणूक आपण समाजाला देऊ तशीच वागणूक समाज देखील आपल्याला देईल म्हणून सगळ्यांशी कायम प्रेमाणे वागा आणि मोठ्या व्यक्तींचा आदर करा. मला माझ्या वडिलांकडून सांगितल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी खूप आवडतात म्हणून मी या सर्व गोष्टी माझ्या आयुष्यात देखील पाळतो.

माझे बाबा खूप धैर्यवान आहेत ते कुठलही काम करताना अतिशय समजदारीने आणि धर्याने करतात म्हणून ते कुठलही काम करताना कायम यशस्वी ठरतात. त्यांची काम करण्याची जिद्द आणि धर्य पाहून मला देखील आयुष्यात पुढे जाण्याची ताकत मिळते. माझे बाबा हे एक चांगले वडील तर आहेच तसेच ते एक चांगला मुलगा देखील आहे, ते माझ्या आजी-आजोबांची देखील खूप काळजी घेतात, त्यांना काय हवं काय नको या सर्व गोष्टी बघतात. सकाळी उठल्या बरोबर ते आधी आपल्या पालकांचा आशीर्वाद घेतात मगच कामाला सुरुवात करतात. ते मला देखील कायम मदत करतात व माझी काळजी घेतात म्हणून माझे बाबा हे जगातील सगळ्यात चांगले बाबा आहेत.

तात्पर्य

पालक जुन्या वट वृक्षासारखे असतात, ज्यांनी जीवनाचा प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख पाहिले आहे, प्रत्येक क्षण जगला आहे, त्यांच्याकडे प्रत्येक चांगल्या वाईट व्यक्तीस समजण्याची क्षमता आहे. जोपर्यंत आपल्या कपाळावर वडिलांचा हात आहे तोपर्यंत आपल्याला कशाचीही चिंता करण्याची गरज नसते. ते नेहमीच दु: ख स्वत: सहन करतात आणि केवळ आम्हाला आनंद देतात, म्हणूनच आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळतो. वडिलांचे संघर्ष आपण कधीही विसरू नये. आपण मोठी झाल्यानंतर त्याची सेवा केली पाहिजे आणि त्याला एक चांगली व्यक्ती तसेच एक चांगला मुलगा असल्याचे दर्शविले पाहिजे. आपण आपल्या पालकांना कधीही विसरू नये, आपण प्राप्त केलेले यश हे त्यांच्या संघर्ष आणि विचारांचे परिणाम आहेत.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता माझे बाबा मराठी निबंध आम्ही आशा करतो कि आमच्या द्वारे लिहिलेले दोन्ही निबंध तुम्हाला आवडले असतील. जर तुम्हाला हे निबंध आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हे निबंध आवडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा आहे हे देखील कळवा जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *