मित्रांनो आज आपण बघणार आहोत माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक तरी प्रसंग घडलेला असतो जो तो व्यक्ती कधीच विसरत नाही. आज आपण असाच एक प्रसंग बघणार आहोत माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध या लेखाद्वारे.शालेय विद्यार्थ्यांना देखील हा निबंध खूप वेळा परीक्षेत विचारला जातो तर शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सराव करू शकता. जर तुम्हाला असेच आणखी नवं-नवीन निबंध पाहिजे असतील तर आमच्या वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला नक्की ऑन करा कारण आम्ही शालेय विद्यार्थ्यांना लागणारी सर्व सामग्री या वेबसाईट वर उपलब्ध करून देत असतो. चला तर मग बघूया माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध
मी तेव्हा जेमतेम तीन वर्षांची असेन. काकू वगैरे आम्ही तेव्हा एकत्रच राहत होतो. आमची एकत्र कुटुंबपद्धती होती. आमचे घर दुमजली होते. वरच्या माळ्यावर काकूने इंग्रजीचे वर्ग काढले होते. लहान लहान लाकडी बाकडे केले होते. विद्यार्थी सतरंजीवर खाली बसत असत आणि बाकड्यावर लिहीत असत. मला तेथे जाऊन बसायला मनाई होती.
पण वर्गात काय चालले आहे ते पाहण्याची माझ्या बालमनाला फार उत्सुकता वाटायची. मी तिथल्या दाराआड लपायची. चोरून पाहायची व ऐकायची. या शिकवणीवर्गाला काकूने संस्कार केंद्र असे नावे दिले होते. कारण पहिल्या दहा मिनिटात ती गीतेतील एक श्लोक विद्यार्र्यांकडून पाठ करवून घ्यायची.
नंतर प्रार्थना म्हणवून घ्यायची आणि नंतर इंग्रजी शिकवायला सुरुवात करायची. मी दाराआड आहे हे एकदा तिच्या लक्षात आले. तिने मला बोलावले. प्रार्थनेपर्यंत शेवटच्या बाकावर बसण्याची मला परवानगी दिली. मला खूप आनंद झाला. मी रोज जाऊन बसू लागले.
विशिष्ट लयीत विद्यार्थ्यांना शिकवलेले संस्कृत श्लोक मलाही पाठ झाले. एकदा काकूने ते एका विद्यार्थिनीला म्हणायला सांगितले. म्हणताना तिला नीट आठवेना. ती अडखळली. तेव्हा मला न राहवून मीच ते म्हणून दाखवले. न शिकवताही तीन वर्षाच्या चिमुरडीला ते म्हणता येतील याची कुणी कल्पनाही केली नव्हती. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. काकूने गीता पाठांतर स्पर्धेत माझे नाव दिले. तिथे मला बक्षीस मिळाले. ते बक्षीस अजून माझ्या घरी आहे. तो संस्मरणीय प्रसंग अजून माझ्या मनात ताजा आहे.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला माझ्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.