मी शाळा बोलतेय मराठी निबंध | Mi Shala Boltoy Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत मी शाळा बोलतेय मराठी निबंध. जस कि आपण सर्वांना माहिती आहे कि शाळा हे ज्ञानाचं मंदिर असतं जिथे आपल्याला खूप काही शिकायला मिळत. सगळेच मुलं लहान असताना शाळेत जातात जेव्हा ते लहान असता तेव्हा त्यांना अक्षरांची ओळख नसते पण एकदा शाळेत गेल्यावर त्यांना सर्व अक्षरांची ओळख होते, ते वाचायला आणि लिहायला शिकतात आणि तेच वाचन आणि लेखन त्यांना भविष्यामध्ये एक महान व्यक्ती बनण्यास मदत करत. आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत कि कधी आपली शाळा संपेल आणि कधी आपण कॉलेज ला जाऊ. परंतु जेव्हा आपली शाळा संपते आणि आपण कॉलेज ला जातो तेव्हा आपल्याला जाणवत कि नकी हे कॉलेज, नको हे कॉलेज च जीवन या पेक्षा आपली शाळा बरीं.

आपल्याला आपल्या शाळेची खूप आठवण येते परंतु ते दिवस निघून गेलेले असतात. आणि आपल्या कडे उरतात त्या फक्त शाळेच्या आठवणी. तर ती शाळा आज आपल्या सोबत बोलणार आहे मी शाळा बोलतेय या मराठी निबंधाच्या माध्यमातून. हा निबंध शालेय विद्यार्थ्यांना देखील परीक्षेत खूप वेळा विचारला जातो तर शालेय विद्यार्थी आम्ही दिलेल्या या निबंधाचा सर्व करून जाऊ शकता चला तर मग बघूया Mi Shala Boltey Marathi Nibandh निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मी शाळा बोलतेय मराठी निबंध

माझ्या विद्यार्थ्यांची मी माता आहे !

माझ्या मुलांना मी नवा जन्म दिला आहे. त्यांना संस्काराचे शक्तिवर्धक दूध पाजले आहे. त्यांना ज्ञान देऊन त्यांचे पोषण केले आहे. त्यांना आयुष्यभर पुरेल 7 अशा शिक्षणाची आणि संस्कारांची शिदोरी दिली. फार काय, पण त्यांच्या कल्याणांसाठी मी माझे सर्वस्व त्यांना अर्पण केले आहे.

माझ्या कुशीतील वाचनालयात जेव्हा माझी मुले पुस्तक वाचताना दिसतात तिव्हा मला त्यांच्यात रवींद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब – आंबेडकर दिसू लागतात. जे मुळातच बुद्धिमान असतात त्यांच्या बुद्धीला पैलू, | पाडण्याचे काम मी निष्ठेने करत असते. इथे कुणी मुले तुकोबांच्या अभंगवाणीचा दरवळ घेतात, ज्ञानेश्वरांच्या काव्याचा आस्वाद घेतात, बालकवींच्या निरागस कुलराणीचे स्मितहास्य अनुभवतात, केशवसुतांच्या तुतारीचा आवाज ऐकतात.

ही मुले माझ्या अंगाखांदयांवर म्हणजे क्रीडांगणावर खेळत असतात. त्यांच्या विळण्याचा मला फार अभिमान वाटतो. कुणी भारतातील लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट खेळतात. एका मुलाने लागोपाठ तीन षटकार ठोकले तेव्हा मला युवराजसिंगची आठवण झाली. मला खात्री आहे की यातून पुढे सचिन तेंडूलकर निर्माण होणार आहेत. काही मुले हॉकी खेळतात. उत्तम खेळतात. मागे एकदा कधीतरी भारताने हॉकीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. माझी ही मुले पुन्हा एकदा ताच पराक्रम करतील आणि सुवर्णपदक खेचून आणतील, जगाचे डोळे दिपवतील अशी मला नुसतीच आशा नव्हे, तर खात्री आहे. इतर मुले आणखी काही वेगवेगळे खेळ खेळतात. ते पाहून तर असे वाटते की ते ऑलिंपिक्सचीच तयारी करत आहेत.

काही मुले विज्ञानाच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात गर्क झालेले दिसतात. त्यांनी आपली निष्ठा विज्ञानाला वाहिली आहे. त्यांच्या डोळ्यांपुढे जगदीशचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा जयंत नारळीकर असू शकतील.

एक खेड्यांतून आलेला अत्यंत गरीब विद्यार्थी होता. अंगावर फाटके कपडे, दोन वेळचे जेवणही त्याला मिळत नव्हते. तो माझ्या कुशीत आला. भक्तिभावानं वागला. आज तो आय.ए.एस. होऊन फार मोठा अधिकारी बनला आहे. गाडी बंगल्याचा मालक आहे. आई म्हणून सर्व मुलांना माझे आशीर्वाद आहेत.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता मी शाळा बोलतेय मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला मी शाळा बोलतेय मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *