मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध | Mobile Shap Ki Vardan Marathi Essay

मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध म्हणजेच Mobile Shap Ki Vardan Marathi Essay. मित्रांनो बघायला गेलं तर मोबाईल शिवाय हे जग अपूर्ण आहे. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल बिना माणसाचं जीवन म्हणजे जणू पाण्या विना मासा. आजच्या काळात मोबाईल हि काळाची गरज बनली आहे. पूर्वी जेव्हा मुलगा बाहेर कुठे तरी फिरायला जायचा तेव्हा आई त्याला विचारायची कि बाळा पाकीट घेतलस, रुमाल घेतला, पैसे घेतले. पण आजच्या काळात जर मुलगा कुठे बाहेर फिरायला जात असला तर आई त्याला सगळ्यात आधी विचारते कि बाळा तू तुझा मोबाईल घेतलास. या उदाहरणावरून तुम्ही कल्पना करू शकता कि आजच्या काळात मोबाईल किती महत्वाचा आहे ते.

आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात हि मोबाईल च्या अलार्म पासून होते. जर आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना कॉल करायचं म्हटलं तर तिथे देखील मोबाईल आलाच. आणि आपण जर आजच्या युवा पिढीचं बघायला गेलो तर आजची युवा पिढी विना मोबाईलचा एक दिवस देखील काढू शकत नाही. मोबाईल जसा त्यांच्या जीवनाचा एक अदृश्य हिस्साच बनला आहे. मार्केट मध्ये मोबाईल देखील विविध फीचर्स सह उपलब्ध आहे. नवं-नवीन मोबाईल हे मार्केट मध्ये लॉन्च होतच असतात. जे काम एक महागातला मोबाईल करू शकतो, तेच काम एक स्वस्तातला मोबाईल देखील करू शकतो परंतु युवा महागातलेच मोबाईल वापरण्याला प्राधान्य देतात. याला आपण वायफळ खर्च देखील म्हणू शकतो. त्यांना मार्केट मध्ये कुठला नवीन मोबाईल आला कि लगेच तो मोबाईल हवा असतो. त्यांना त्या मोबाईल ची गरज असो किंवा नसो. यावरूनच एक प्रश्न आपल्या मनात येतो तो म्हणजे मोबाईल शाप कि वरदान?

मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध

आजच्या काळात मूळ अभ्यास देखील मोबाईल च्या अटी वर करतात. ते आपल्या आई-वडिलांना आधीच सांगता कि माझा अभ्यास झाल्यावर मला गेम खेळण्यासाठी मोबाईल पाहिजे तेव्हाच मी अभ्यास करेल. जर लहान मुलच एवढी मोबाईल प्रेमी आहेत तर मोठ्या माणसांची गोष्टच वेगळी आहे. मोबाईल शिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या काळातील जवळपास सगळीच कामे आपण मोबाईल च्या माध्यमातून करू शकतो उदाहरणात जर आपल्याला कुठल्या अनोळखी जागेवर जायचं आहे आणि आपल्याला तिथे जायचा रस्ता माहिती नाही तर आपण मोबाईल वर गुगल मॅप च्या साहाय्याने त्या ठिकाणी पोहचू शकतो. मोबाईल ने आपल्या जीवनाला अगदी सरळ बनवले व सोपे बनवले आहे.

जर आपल्याला कोणाशी बोलायचं असेल तर आपण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून त्या व्यक्तीशी बोलू शकतो. बोलू तर शकतोच पण आपण व्हिडीओ कॉल च्या माध्यमाने त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू देखील शकतो. जर आपल्याला बोर होत असेल तर मोबाईल आपले मनोरंजन करतो. आपण मोबाईल मध्ये गाणे ऐकू शकतो, व्हिडीओ पाहू शकतो त्याने आपलं मनोरंजन होत. जर आपल्याला हिशोब करायचा असेल तर आपण लगेच आपल्या मोबाईल च्या कॅल्क्युलेटर मध्ये लाखोंचा हिशोब काही सेकंदात करू शकतो. मोबाईल ने जणू काही संपूर्ण जग आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे. जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा लोकं मोबाईलचा वापर कमी करत होते. पण जेव्हा पासून मोबाईल इंटरनेट सोबत जोड्ल्यागेला तेव्हा पासून मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढली. लोकं अजून जास्त मोबाईल कडे आकर्षित झाले.

मोबाईल जेव्हा नवीन आले तेव्हा मोबाईल मध्ये कॅमेरा नव्हता. पण जसा-जसा काळ बदलत गेला मोबाईल देखील अपडेट होऊ लागले. थोड्या कळणे कॅमेरा असलेले स्मार्टफोन मार्केट मध्ये आले आणि तेव्हा पासून लोकं आपल्या प्रत्येक क्षणाला मोबाईल मध्ये कैद करून घेऊ लागले. त्यानंतर विविध प्रकारचे फोटो एडिट करणारे अँप देखील आले ज्याने आपल्याला हवे तशे फोटो एडिट करता येऊ शकतात. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग अँप आले ज्याने लोकं घरी बसूनच सगळं सामान ऑर्डर करायला लागले. ज्याने लोकांचा वेळ आणि पैसे याची बचत होऊ लागली. लोकांना देखील ते आवडू लागलं मोबाईल वरूनच आपण कुठल्याही वस्तू घेऊन त्याचे पैसे देखील ऑनलाईन देऊ शकतो. असं करत करत मोबाईल ने सगळ्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली.

मोबाईल चे फायदे हे खूप सारे आहेत जर आपल्याला काही एमर्जन्सी असेल किंवा आपलं काही दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टर ला कॉल करून बोलावू शकतो. सोबतच अडचणीच्या वेळी आपण पोलिसांशी देखील लगेच संपर्क साधू शकतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली आणि ती तुम्हाला पुन्हा-पुन्हा बघायची असेल तर तुम्ही त्या वस्तूचे फोटो काढून आपल्या मोबाईल मध्ये सेव करू शकता. आणि तुम्हाला वाटेल तेव्हा बघू शकता. आजचा काळ हा सोशल मीडिया चा काळ आहे. सर्व लोकं हे एकमेकांशी सोशल मीडिया च्या माध्यमातून जुडलेले असतात. सोशल मीडिया द्वारे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळू शकते. संपूर्ण जग आपल्याशी सोशल मीडियाद्वारे जुडलेले असते. आणि या सगळ्या गोष्टी जर कशाने शक्य होत असतील तर ते म्हणजे आपला मोबाईल.

जसे तुम्ही आता मोबाईल चे एवढे फायदे बघितले तसेच मोबाईल चे खूप सारे दुष्परिणाम देखील आहे. जश्या मोबाईल वर चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात तश्याच वाईट गोष्टी देखील शिकायला मिळतात. सोशल मीडिया खूप सारे ठग लोकं देखील आहेत. म्हणून लोकांनी मोबाईल चा आणि सोशल मीडिया चा उपयोग हा सावधानीने केला पाहिजे. आजचे पालक देखील संपूर्ण दिवस मोबाईल मध्ये व्यस्त असतात. दिवसभर ऑफिस च काम आणि घरी आलं कि मोबाईल या सगळ्यांमध्ये त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. मोबाईल ची नाश हि समाजामध्ये वाऱ्या प्रमाणे पसरत चालली आहे. लोकं मोबाईल शिवाय एक दिवस देखील राहू शकत नाही. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे परंतु जेव्हापासून मोबाईल माणसाच्या जीवनात आला तेव्हा पासून माणूस हा समजा पासून दूर होत चालला आहे.

जर आपण मोबाईल चा जास्त उपयोग केला तर आपलं डोकं दुखत आणि आपल्या डोळ्यांना देखील त्रास होतो. यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कि रात्री झोपताना मोबाईल हा उशाला ठेऊन झोपल्याने अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून रात्री झोपताना मोबाईल आपल्या पासून लांब ठेवायचा. जर तुम्ही रात्री जास्त काळ मोबाईल चा वापर केला तर तुमची झोप कमी होते आणि झोप कमी झाल्याने तुम्हाला अनेक रोगांना सामोरं जावं लागत. लहान मुलांना आपण मोबाईल पासून लांब ठेवलं पाहिजे कारण मोबाईल मधून निघणारे किरण हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी जास्त घटक असतात. लहान मुलांनी जर मोबाईल चा अति वापर केला तर त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.वैज्ञानिकांनी सांगितलं आहे कि मोबाईल मधून निघणारी रेडिओ ऍक्टिव्ह किरण हि आपल्या मस्तिष्क साठी हानिकारक ठरू शकता.

शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार २०२५ पर्यंत मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या हि दुपटीने वाढणार आहे. जेव्हा पासून इंटरनेटचे भाव हे कमी करण्यात आले तेव्हा पासून देखील मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या हि वाढू लागली. सगळे लोकं हे मोबाईल मध्ये गुरफटून गेले आहेत. असं बोलणं अयोग्य नसेल कि मोबाईल हा एक प्रकारे मानव जाती वर हावी झाला आहे. कुठे न कुठे आपण या समाजापासून व या प्रकृती पासून दूर होत चाललो आहे.

तात्पर्य

किती तरी गोष्टी अश्या आहेत कि मोबाईल मुले त्या आपल्याला अधिक सोप्या झाल्या आहेत. असं म्हणतात ना प्रत्येक शिक्याच्या दोन बाजू असतात. तसेच मोबाईल चे सकारात्मक आणि नकारत्मक दोन्ही पद्धतीने वापर आहे. ते आपल्यावर अवलंबून असत कि आपण त्याचा वापर कसा करतो. काही अपराधी लोकं मोबाईल चा दुरुपयोग करतात ज्याने समाजामध्ये अपराध हे वाढत चालले आहे. युवा मुलांमध्ये देखील सोशल मीडिया चा वाढत वापर बघण्यात येत आहे. त्यांनी सोशल मीडिया चा वापर हा कमी केला पाहिजे. कारण सोशल मीडिया चा अधिक वापर केल्याने त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर देखील होऊ शकतो. सेल्फी काढण्याचा रोग हा देखील सर्वत्र पसरत चालला आहे. ज्याने अनेक अश्या दुर्घटना होताना बघायला मिळतात. सांगायचं तात्पर्य एवढंच कि मोबाईल हा समाजात जगण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याचा उपयोग आपण मर्यादित केला पाहिजे. मी शेवट एवढचं सांगू इच्छितो कि “मोबाईल चा जर दुरुपयोग केला तर मोबाईल हा एक शाप आहे. आणि जर मोबाईल चा नीट उपयोग केला तर मोबाईल हा वरदान आहे”

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध. मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही अशेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध या लेखाविषयी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *