मित्रांनो आज आपण बघणार आहोत नदीची आत्मकथा मराठी निबंध. जसे कि आपण सर्व जण जाणतो कि नदी हि आपल्यासाठी खूप महत्वाची असते कारण पाऊस हा येऊन निघून जातो आणि आपल्याला पुढचा पाऊस येई पर्यंत पाणी पुरवते ती म्हणजे नदी. आपल्या देशात व राज्यात अश्या कित्तेक नद्या आहेत. परंतु माझा एक प्रश्न आहे कि आपल्या या नद्या स्वछ राहिल्यात का? कित्तेक लोक या नद्यांना दूषित करतात, नद्यांमध्ये कचरा टाकतात, कंपनी मधून निघणार सांडपाणी हे देखील नदीत सोडलं जात मग एवढं सगळं करून आपल्या नद्या या स्वछ राहिल्यात का?
लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे व नद्यांना दूषित होण्या पासून वाचवलं पाहिजे कारण नद्या म्हणजे आपलं जीवन आहे. लोक नद्यांमध्ये एवढं प्रदूषण करतात या बद्दल नदीचं काय मत आहे हे आपण आजच्या या Nadiche Atmakatha Marathi Nibandh च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शालेय मुलांना देखील हा निबंध बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला जातो तर शालेय मुलं देखील या निबंधाचा सराव करू शकता चला तर मग बघूया नदीची आत्मकथा मराठी निबंध.
नदीची आत्मकथा मराठी निबंध
“मी नदी बोलते आहे. मी उंच डोंगराच्या सुळक्यावरून उडी घेऊन तुमच्यापर्यंत वाहत येते. येताना वाटेत भेटणाऱ्या माझ्या अनेक सख्यांना मी बरोबरच घेऊन येते.
त्यामुळे माझ्या पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह बनतो. मी माझ्या किनाऱ्यावरील सर्वांना पाणी देते. त्यांची तहान भागवते. हिरवी राने आणि शेती पिकवते.
मोठ मोठे मळे माझ्या पाण्यावर जगतात. पशुपक्षी माझ्या सान्निध्यात राहून सुखावतात. वाघ आणि हरीण यांना सारख्याच प्रेमाने पाणी देते. त्यांच्यात मी भेद करीत नाही. माणसाचे तन-मन माझ्यामुळे शुद्ध होते. म्हणून मला पवित्र मानले जाते.
पण आजकाल मी अस्वच्छ होत आहे. ज्यांना मी स्वच्छ करते ती माणसेच मला ओंगळवाणी बनवत आहेत. शहरातील गटाराचे पाणी माझ्या प्रवाहात सोडून मला प्रदूषित करीत आहेत. शिवाय अनेक प्रकारचे कारखाने आपले विषारी वायु सोडून मला विषारी बनवतात. याचे परिणाम तुम्हा माणसानांच भोगावे लागणार आहेत. नव्हे ते आतापासून भोगत आहातच ! तरीही तुम्ही माणसे कानावर हात ठेवून आणि डोळ्यावर कातडे ओढून बसला आहात. नाना तऱ्हेचे रोग दूषित पाण्यामुळे होत आहेत हे तुमच्या कधी लक्षात येईल ?
मंग मला स्वच्छ ठेवण्याच्या काही योजना आता तरी सुरू करा. माझे आरोग्य राखाल तर तुमचेही आरोग्य आपोआप राखले जाईल. मग तुमच्यावर पश्चात्तापाची पाळी येणार नाही. म्हणून म्हणते.
ऐका माझी वाणी मग मिळेल तुम्हां शुद्ध पाणी ! “
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता नदीची आत्मकथा मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला नदीची आत्मकथा मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.