निष्पाप दान मराठी गोष्ट | Marathi Gosht
मित्रांनो आज आपण बघणार आहोत निष्पाप दान मराठी गोष्ट देवावर लोकांची खूप श्रद्धा असते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक माणूस हा देवाची पूजा करतो आणि बाहेर कुठे देवाच्या दर्शनाला गेल्यावर मोकळ्या मानाने दान देखील करतो. आजची आपली हि गोष्ट त्याच विषयाशी संबंधित आहेत चला तर मग बघूया निष्पाप दान मराठी गोष्ट जर तुम्हाला गोष्ट आवडली तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे आम्ही अश्याच गोष्टी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत राहू.
निष्पाप दान मराठी कथा
एक जुने मंदिर होते. त्याच्या भिंती पडल्या होत्या. खुप जोराच्या वारा पावसाने मंदिराचे छत हलून पडले. त्या दिवशी एक साधु मंदिरात येऊन बसला. त्याचे भाग्य चांगले होते म्हणून त्याच्या वरील कोपरा पडला नव्हता. साधुला काही दुखापत झाली नाही.
साधु सकाळी उठून देणग्या गोळा करण्यासाठी बाजारात गेला. त्याने विचार केला की मी इथे असताना मंदिर पडले तर ते चांगले करून जायला पाहिजे.
बाजारातील लोकांची देवावर फार श्रध्दा होती. साधू विद्वान होता. त्याने दारोदारी फिरून देणग्या गोळा केल्या. मंदिर दुरूस्त केले. मोठा उत्सव करून देवाची मूर्ती स्थापन केली. त्यासाठी पुजा केली, भंडारा झाला सगळयांनी आनंदाने प्रसाद घेतला.
मंडाऱ्याच्या दिवशी साधु देणगीदारांचे आभार मानण्यासाठी उभा राहिला. त्याच्या हातात कागद होता. त्याच्यात देणगीदारांच्या नावांची लांबलचक यादी होती. त्यांच्यातील मोठे दान एका वृद्ध बाईने दिले होते.
लोकांना वाटले की त्या वृद्ध बाईने शंभर-दोनशे रुपये दिले असतील. काही लोकांनी शंभर रुपये दिलें होते. परंतु सर्वांना आश्चर्य वाटले की ज्यावेळी साधुने सांगितले की तिने मला चार आणे दिले तेव्हा लोकांना वाटले की साधु थट्टा करत आहे. साधु पुढे म्हणाला, “ती लोकांच्या घरी जाऊन पीठ दळण्याची काम करते. हे पैसे तिने काही महिने एकत्र करून गोळा केले होते. ही तिची आयुष्याची पुंजी होती. मी सर्वस्व दान करणाऱ्या त्या वृद्ध आईला नमस्कार करतो.
लोकांनी माना खाली घातल्या. खरोखर म्हातारीने मनापासून केलेले सर्वस्व दान हे सगळयात श्रेष्ठ दान आहे.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती निष्पाप दान मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते दान करताना फक्त मन मोकळे पाहिजे दान करताना पैश्याला नव्हे तर मोकळ्या मनाला किंमत असते गोष्टीतील वृद्ध आईने जे दान केले ते दान म्हणजेच निष्पाप दान. आम्ही आशा करतो कि तुम्हाला निष्पाप दान मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.