मित्रांनो आज आपण बघणार आहोत पांढरा हंस मराठी गोष्ट हि अशी एक Marathi Gosht आहे जी लहान मुलांसाठी पण आहे आणि तरुणांसाठी पण आहे या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे म्हणून हि गोष्ट पूर्ण नक्की वाचा आणि गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ज्याने आमचं मनोबल वाढेल आणि आम्ही अश्याच अप्रतिम गोष्टी तुमच्यासाठी रोज घेऊन येत राहू चला तर मग बघूया पांढऱ्या हंसाची मराठी गोष्ट.
पांढऱ्या हंसाची मराठी गोष्ट
दुर्गादास नावाचा एक धनवान शेतकरी होता. परंतु तो फारच आळशी होता. तो शेत पाहायला कधी जात नव्हता आणि शेतातील पीकपण पाहायला जात नव्हता. तो आपल्या गायी-म्हशीची तसेच घरातील सामानाचीसुद्धा देखभाल करत नव्हता. सर्व कामे तो नोकरांवर सोपवत असे. त्याच्या आळशी पणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घराची व्यवस्था बिघडली होती. शेतीत त्याला नुकसान होऊ लागले. गायीच्या दुधा-तूपापासुन त्याला फायदा मिळत नव्हता.
एक दिवशी दुर्गादासचा मित्र हरिश्चंद्र त्याच्या घरी आला होता, हरिश्चंद्राने दुर्गादासची परिस्थिती पहिली, ती फारच हलाखिची झाली होती. तो समजून चूकला की समजावून आळशी दुर्गादास आपला स्वभाव बदलणार नाही. म्हणून तो आपला प्रिय मित्र दुर्गादासच्या चांगल्यासाठी म्हणाला,”मित्रा, तुझी वाईट परिस्थिती पाहून मला फारच दुःख होत आहे. तुझे दारिद्र्य नाहिसे करण्यासाठी माझ्याजवळ एक साधा उपाय आहे. तो मी जाणतो.
दुर्गादास म्हणाला,”कृपा करून तो उपाय मला सांग मी तो जरुर अमलात आणिन.” हरिश्चंद्र म्हणाला, सर्व पक्षी जागण्याच्या अगोदर मानसरोवरात राहणारा पांढरा हंस पृथ्वीवर येतो. तो दिवस उजाडल्यावर परत जातो. त्याचे दर्शन होणे फार भाग्याचे मानतात. त्याचे दर्शन ज्याला झाले त्याला काहीही कमी पडत नाही.
दुर्गादास म्हणाला,”त्या हंसाचे दर्शन मी अवश्य घेईन. हरिश्चंद्र निघून गेला. दुर्गादास दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला. तो घराच्या बाहेर हंस पाहण्यासाठी खळ्यात गेला. त्या ठिकाणी त्याने पहिले की एक माणूस त्याच्या गव्हाच्या राशीतून आपल्या गव्हाच्या राशीत भर घालत होता. दुर्गादासला पाहून तो शरमिंदा झाला आणि माफी मागू लागला.
खळयातून घरी आल्यावर तो गौशालेमध्ये गेला. त्याठिकाणी एक पहारेकरी गायीचे दूध काढून आपल्या बायकोच्या भांडयात टाकत होता. दुर्गादासने त्याला दटावले. घरात येऊन पाणी पिऊन परत तो हंसाला पाहण्यासाठी बाहेर पडला आणि शेतावर गेला. त्याने पहिले की शेतावर अजूनपर्यंत मजूर कामाला आले नव्हते. तो तेथे थोडया वेळ थांबला. ज्यावेळी मजूर आले त्यावेळी त्यांचे वर्तन उघडे पडले. अशा प्रकारे तो जिथे गेला त्या ठिकाणचे त्याचे नुकसान वाचले.
पांढऱ्या हंसाच्या निमित्ताने दुर्गादास नेहमी सकाळी उठून बाहेर पडू लागला. आता त्याचे नोकर बरोबर काम करू लागले. त्यांच्याकडील चोरी बंद झाली होती. पहिल्यांदा तो रोगी असायचा आता तर त्याचे स्वास्थ चांगले झाले होते. ज्या शेतात दहा मण धान्य मिळत होते. त्या ठिकाणी आता पन्नास मण धान्य मिळू लागले.
एक दिवस दुर्गादासचा मित्र हरिश्चंद्र त्याच्या घरी आला. दुर्गादास म्हणाला,”मित्रा, मला आजपर्यंत तरी पांढरा हंस दिसला नाही. परंतु त्याला शोधण्यामुळे मला फार लाभ झाला. हरिश्चंद्र हसला आणि म्हणाला,”कष्ट करणे म्हणजेच पांढरा हंस आहे. कष्टाचे पंख नेहमी उज्वल असतात. कष्ट न करता नोकरावर जो काम सोपवतो त्याला नुकसान सहन करावे लागते.. आणि जो स्वतः कष्ट करून नोकरावर देखरेख ठेवतो. त्याला संपत्ती व सन्मान यांची प्राप्ती होते.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती पांढरा हंस मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत गोष्ट लहान आहे परंतु लाभदायक आहे आम्ही आशा करतो कि तुम्हाला पांढऱ्या हंसाची मराठी गोष्ट हि गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.