पिता आणि पुत्र मराठी गोष्ट | Stories For Kids In Marathi

मित्रांनो आज आपण बघणार आहोत पिता आणि पुत्र मराठी गोष्ट वडील आणि मुलगा हे एक असं नातं असत ज्याची शब्दात स्थुती करणं कठीण असत. एक वडील आपल्या मुलासाठी काय-काय करू शकता हे सगळं तर आपण जाणतोच वडील आपल्या मुलाच्या सर्व गरजा पूर्ण करतात त्याच सोबत परिवार देखील सांभाळतात आपल्या परिवाराला व आपल्या मुलाला काय हवं काय नको हे सगळं देखील वडीलच बघतात. तर आज आपण अश्याच एका विषयावर गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे पिता आणि पुत्र मराठी जर तुम्हाला हि गोष्ट आवडली तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ज्याने आमचं मनोबल वाढेल आणि आम्ही अश्याच अप्रतिम गोष्टी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत राहू चला तर मग बघूया पिता आणि पुत्र मराठी गोष्ट.

पिता आणि पुत्र मराठी गोष्ट

एक तरूण पिता आपल्या लहान मुलास घेऊन बसला होता. थोडया वेळाने एक कावळा त्याच्या समोरील घराच्या छपरावर बसला होता. मुलाने वडिलांना विचारले,”हे काय आहे?”

वडिल म्हणाले,कावळा आहे. परत मुलाने विचारले,”हे काय आहे?” वडिल परत म्हणाले, हा कावळा आहे.

मुलगा सारखा विचारीत होता की हे काय आहे. वडिल त्याला प्रेमाने प्रत्येक वेळी सांगत गेले की हा कावळा आहे.

काही वर्षानंतर मुलगा मोठा झाला आणि वडिल म्हातारे झाले. एक दिवस वडिल चटईवर बसले होते घरात मुलाला भेटायला कुणीतरी आले त्यावेळी वडिलांनी त्याला विचारले,”कोण आले आहे?

मुलाने नांव सांगितले. थोड्या वेळा नंतर दुसरे काही जण आले आणि वडिलांनी परत विचारले. यावेळी मुलगा चिडून म्हणाला, “तुम्हाला काय करायचे आहे कोण आले, कोण गेले, हे सारखे का बडबडत असतात.

वडिलांनी मोठा श्वास घेतला. हातात डोके पकडले, मोठया दुखाःने ते हळूहळू बोलू लागले, “मी कधीही तुला झिडकारले नाही. प्रत्येक वेळी तुला सांगत गेलो की कावळा आहे. आपल्या आई वडिलांचा तिरस्कार करणारी मुले वाईट समजली जातात. तुम्ही नेहमी ही गोष्टी लक्षात ठेवावी कि आई वडिलांनी तुमचे पालन- पोषण कष्ट करून केले आणि तुम्हाला प्रेम दिले.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती पिता आणि पुत्र मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत गोष्ट लहान आहे परंतु लाभदायक आहे हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जस आपल्या आई-वडिलांनी आपला लहान असताना सांभाळ केला तसेच आपण देखील त्यांचा म्हातारपणाचा आधार बनलं पाहिजे. आम्ही आशा करतो कि तुम्हाला पिता आणि पुत्र मराठी गोष्ट हि आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *