एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध ।Sainikache Atmavrutta Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध. भारतीय सैनिक हे एक असं नाव आहे जे ऐकून आपल्या दुश्मन देशांना पळता भुई थोडी होते. सेने मध्ये भर्ती होण्यासाठी व एक सैनिक बनण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. परिश्रमासोबतच एका सैनिका जवळ अजून एक गोष्ट असते ती म्हणजे मानसिकता. एक सैनिक जेव्हा युद्धभूमी मध्ये उतरतो तेव्हा त्याची मानसिकता असते कि तो नक्की मृत्यू वर विजय मिळवेल. अशी मानसिकता फक्त धैर्यवान आणि कुशल लोकांकडे असते.

एक सैनिक बनण्यासाठी अगदी लहान वया पासूनच तयारी करावी लागते कारण सैनिक बनायचं हे इतकं सोपं नाही. कारण एका सैनिकाच्या खांद्यावर संपूर्ण देशाची रक्षा करण्याचा भार असतो. सैनिक बॉर्डर वर उभे असतात त्यांना रात्र आणि दिवस काही नसत प्रत्येक क्षण हा त्यांच्यासाठी सारखा असतो. आपल्या देशाचा सैनिक हा बॉर्डर वर उभा असतो म्हणून आपण इकडे कसलीही चिंता न करता आरामात झोपू शकतो. आपण सैनिकांचे कितीही आभार मानले तरी देखील ते कमीच आहे म्हणून प्रत्येक भारतीयाला आपल्या सेनेवर गर्व आहे. आपल्या सैनिकांची वीर कथा हि सर्वांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे म्हणून आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलेलो आहोत Sainikache Atmavrutta Marathi Nibandh.

या निबंधाद्वारे तुम्हाला एका सैनिकाचे आत्मवृत्त ऐकायला मिळणार आहे जे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला भारतीय सेनेवर गर्व देखील होईल. हा निबंध खूप वेळा शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत विचारला जातो तर शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सराव करू शकता. तुम्हाला जर आणखी असेच निबंध हवे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईट वर बघू शकता इथे तुम्हाला शाळेत लागणारे सर्व निबंध उपलब्ध करून दिले आहेत. निबंध आवडल्यास आम्हाला कमेंन्ट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून निबंध लिहिण्यास ऊर्जा देते. चला तर मग बघूया एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध.


एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध


मी एक सैनिक आहे कठोर परिश्रम आणि कष्ट करून मी भारतीय सेनेची वर्दी घातली आहे. मी लहान होतो तेव्हा पासून माझं एकच स्वप्न होत ते म्हणजे भारतीय सेनेत भर्ती होऊन आपल्या भारत देशाची सेवा करणं माझ्या मातृ भूमीला वाईट गोष्टींपासून आणि लोकांपासून वाचवणं आणि म्हणूनच मी कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली. माझ्या घरची परिस्थिती हि अत्यंत नाजूक होती. तरी सुद्धा मी कधी हार मानली नाही मी परिस्थिती सोबत लढत राहिलो आणि शेवटी मी परिस्थितीला हरवलं आणि भारतीय सेनेत भर्ती झालो.

तो क्षण माझ्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता परंतु माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात आश्रू होते. ते सुरुवातीला माझ्या या निर्णयाने नाराज होते त्यांना असं वाटत होत कि सेनेत भर्ती होणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं, कधी युद्ध झालं आणि माझ्या मुलाला त्या युद्धात मारलं तर, अशी त्यांची विचारधारा होती परंतु माझी मेहनत आणि माझे देशाप्रती प्रेम पाहून त्यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन केले. सेनेत भर्ती झाल्यानंतर माझ्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान होत ते म्हणजे सेनेची सुरुवातीची ट्रेनिंग कारण सेनेत भर्ती झाल्यावर सुरुवातीला जी ट्रेनिंग घेतली जाते ती खूप अवघड असते.

खूप सारे लोक अशे असतात जे ट्रेनिंग मधेच सोडून निघून येतात आणि जे लोक टिकतात ते सैनिक बनतात. मला देखील सैनिक बनायचं होत म्हणून मी असं काही केलं नाही कितीही त्रास झाला तरी आपण जिंकायचं हे माझं उद्दिष्ट होत म्हणून मी माझी ट्रेनिंग सोडली नाही. बघता-बघता मी सैन्याची ट्रेनिंग हि पूर्ण केली. सैनिक असणे म्हणजे हि खूप गर्वाची गोष्ट आहे जोपर्यंत आपण आपले ध्येय आपले लक्ष्य बनवित नाही तोपर्यंत लक्ष आपल्यापासून दूर राहते, परंतु जेव्हा आपण लक्षला आपला साथीदार बनवतो तेव्हा लक्ष देखील आपल्या पाठीशी उभे होते.

सैन्यभरती आणि कठोर अशी ट्रेनिंग पार पाडल्यावर एका सैनिकाचे लक्ष असते आपल्या देशाची आणि मातृभूमीची रक्षा करणं. कितीही कठीण परिस्थिती आली तरी सैनिक कधी मागे हटत नाही मृत्यू जरी त्याच्या समोर आला तरी तो मागे हटत नाही तो देशाची रक्षा करण्यासाठी मरायला देखील तयार असतो. जेव्हा मी सैन्यात भर्ती झालो तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरु होते. मला असं वाटत होत कि हा खूप छान अवसर आहे आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचा. जर मरण आलं तर वीरमरण येईल. माझे आई-वडील रडतील परंतु त्यांना गर्व असेल कि त्यांचा मुलगा देशासाठी शाहिद झाला.

काश्मीर मध्ये माझी सर्वप्रथम ड्युटी लागली तेव्हा काश्मीर मध्ये परिस्थिती हि फार खराब होती. आतंकवाद्यांनी स्वर्ग सारख्या काश्मीर ला नर्क बनवलं होत. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला कुणाचा तरी मृत्यू होत होता. अश्या या परिस्थितीत मी संपूर्ण हिमतीने युद्धात शामिल झालो. आपली भारतीय सेना हि पुढे-पुढे चालली होती. मी सुद्धा आपल्या सेनेसोबत खांद्याला खांदा मिळवून लढत होतो. माझे खूप सारे सैनिक बंधू हे शाहिद झाले होते आणि खूप सारे सैनिक बंधू हे जखमी झाले होते. खूप सारे असे सैनिक होते ज्यांना पाणी द्यायला देखील कोणी नव्हतं. कारण आमच्या जवळ वेळ कमी होता आणि दुश्मन आमच्यावर गोळ्यांचा जणू पाऊस पाडत होते.

परंतु आम्ही त्यांच्या सोबत लढता-लढता आपल्या जखमी सैनिक भावांना देखील सांभाळत होतो. त्या जखमी सैनिकांना पाहून डोळ्यात अश्रू येत होते परंतु दुश्मन आपल्या मातृ भूमीकडे येताना पाहून आमचे रक्त खवळत होते आणि आम्ही दुश्मनावर तुटून पडतं होतो. आम्ही दुश्मनांचे खूप सारे ठिकाण हे तोफांनी उडवले. त्यांचे देखील खूप सारे सैनिक आम्ही मारले होते. ‘भारत माता कि जय’ अशी घोषणा करत आम्ही पुढे चालत होतो. आणि शेवटी आमची मेहनत कामी आली आम्ही सगळे दुश्मन मारून हे युद्ध जिंकलो. युद्ध जिंकायचा आनंद हा खूप झाला होता तो आनंद अनुभवायला एक सैनिकच व्हावं लागत.

सर्व सैनिक बांधवांना खूप आनंद आणि दुःख देखील झाले होते कारण आपल्या देशाचे बरेच सैनिक हे शाहिद झाले होते. आनंद देखील झाला होता आणि डोळ्यात आश्रू देखील होते. सर्व सैनिकांना अंतिम श्रद्धांजली देण्यात आली. सर्व सैनिकांना आपल्या देशाच्या तिरंग्यात गुंढाळलेलं होत खरंच जे मरण एका सैनिकाला येत त्याची उपमा करणं हे अशक्य आहे. त्यानंतर बाकीच्या सैनिकांना वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं माझे आई-वडील देखील तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते त्यांचे शीर हे गर्वाने उंचावले होते त्यांच्या चेहर्या वरचा आनंद पाहून मी देखील भारावून गेलो होतो. तो क्षण माझ्या जीवनातील सगळ्यात भारी क्षण होता.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध. मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल शालेय विद्यार्थी आपल्या शालेय कामासाठी या निबंधाचा वापर करू शकता. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा ज्याने सगळ्यांना समजेल कि सैनिक आपल्या देशा साठी काय-काय करतो आणि सोबतच वेबसाईटच्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला असेच अप्रतिम लेख लिहिण्यास ऊर्जा देते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *