मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत समजुतदार अस्वल मराठी गोष्ट म्हणजेच Stories For Kids In Marathi हि एक अशी गोष्ट आहे ज्या गोष्टी पासून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे गोष्टीच्या नावावरून तर तुम्हाला कल्पना आलीच असेल कि हि गोष्ट कशावर आधारित आहे गोष्ट वाचून झाल्यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कि तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली चला तर मग बघूया समजुतदार अस्वलाची मराठी गोष्ट.
समजुतदार अस्वलाची मराठी गोष्ट
एक शिकारी शिकार करण्यासाठी गेला होता. त्याने खांदयावर मोठी भरलेली बंदूक आणि काडतूसांची पट्टी लावली होती. समोरील उंच पर्वत दूरपर्यंत पसरले होते. पर्वतांमध्ये हजार फूट खोल दरी होती. दोन पर्वतांना जोडणाऱ्या दरीवरुन जाणारी छोटी पाऊलवाट होती. त्याठिकाणी खूप रानटी बोरे पिकलेली होती. त्याला माहित होते की अस्वलांना बोरे खायला फार आवडते.
त्याने पाहिले एक लहानसे अस्वलाचे पिल्लू पाऊलवाटेवरुन दुसऱ्या पर्वतावर जात होते. गोळी मारली तर अस्वल दरीत पडेल त्यामुळे काही लाभ होणार नाही म्हणून तो गुपचूप उभा राहिला होता. दुर्बिणीतून त्याने पाहिले की दुसऱ्या बाजूने मोठे अस्वल त्या बाजूला येत होते.
दोघे भांडणार आणि दरीत पडून मरणार, तो मनांत बडबडला. पाऊलवाट येवढी अरुंद होती की त्याच्यावरुन परत पाठीमागेपण जाता येत नव्हते आणि दोघेजण एकदम बाहेर पडणे अशक्य होते. तो लक्षपूर्वक पाहू लागला.
एक गोळी मारली तर दुसरा ओरडून खाली दरीत पडेल. पाहत राहण्याशिवाय दुसरे काही करता येत नव्हते.
दोन्ही अस्वले समोरासमोर आली. त्यांच्या भाषेत काय बोलाचाली झाली ते माहित नाही. पांच मिनीटे ते शांत झाले आणि शिकाऱ्याने पाहिले की मोठे अस्वल गुपचूप झाले आणि बसले. लहान अस्वल त्याच्यावर चढून पुढे गेले. मोठे अस्वल उठून उभे राहिले.
अरे बापरे, पशू येवढे समजूतदार असतात आणि माणसे मात्र एकमेकांत भांडत बसतात. शिकारी गोळी न घालता निघाला. त्याने शिकार करण्याचा नाद सोडला. संताचे आचरण पाहून दृष्ट माणसेही सुधारतात.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती समजूतदार अस्वलाची गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत गोष्ट लहान आहे परंतु लाभदायक आहे आम्ही आशा करतो कि तुम्हाला समजूतदार अस्वलाची हि गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.