संगतीचे परिणाम मराठी गोष्ट | Marathi Gosht
मित्रांनो आज आपण बघणार आहोत संगतीचे परिणाम मराठी गोष्ट आपल्याला नेहमी शिकवलं जात कि कायम चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं कारण एक कांडा जर सडला तर आणखी शंभर कांद्यांला सोडवतो या वरून तुम्ही कल्पना करू शकता कि संगतीचे परिणाम आपल्या जीवनावर कश्या प्रकारे होऊ शकतात. चला तर मग बघूया संगतीचे परिणाम मराठी गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
संगतीचे परिणाम
एकदा बाजारात पोपट विकणारा आला होता. त्याच्याजवळ दोन पिंजरे होते. दोन्ही पिंज-यात एक-एक पोपट होता. त्यातील एका पोपटाची किंमत पाचशे रुपये आणि दुसऱ्या पोपटाची किंमत पाच पैसे होती. तो सांगत होता जो कोणी पाच पैशाचा पोपट घेण्यास तयार असेल तर घेऊन जा. परंतु पाचशे रुपयाचा पोपट खरेदी करणाऱ्याला दुसरा पोपटसुद्धा घ्यावा लागेल.
तेथील राजा टेहाळणीसाठी बाजारात आला होता. पोपटवाल्याचा आवाज ऐकून त्याने हत्ती थांबवला आणि विचारले,”यांच्या किंमतीत येवढा फरक का?”
पोपटवाला म्हणाला,”तुम्ही घेतल्यानंतर आपोआपच समजेल. राजाने पोपट विकत घेतले. ज्यावेळी तो झोपायला लागला त्यावेळी पाचशे रुपयांच्या पोपटाचा पिंजरा त्याच्या पलंगावर टांगण्यासाठी नोकराला सांगितले. सकाळचे चार वाजल्यावर, राम राम सीता राम असे भजन पोपटाने केले. त्याने सुंदर श्लोकपण म्हटले. राजाला प्रसन्न वाटले.
दुसऱ्या दिवशी राजाने दुसऱ्या पोपटाचा पिंजरा ठेवला. जशी सकाळ झाली तसे पोपटाने घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात केली. राजाला राग आला. त्याने नोकराला सांगितले की या पोपटाला मारुन टाका.
पहिला पोपट राजाजवळ होता. त्याने नमतेपूर्वक राजाला सांगितले की त्याला मारु नका. तो माझा भाऊ आहे. आम्ही दोघेजण जाळीत फसलो आणि पकडलो गेलो. मला एका संताने नेले. त्याच्याकडे मी भजन शिकलो. याला एका खाटिकाने नेले. त्याठिकाणी तो शिव्या शिकला. त्याचा काही दोष नाही. हा तर वाईट संगतीचा परिणाम आहे. राजाने त्याला मारले नाही तर उडवून दिले.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती संगतीचे परिणाम मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जर आपली सांगत वाईट असेल तर आपलं भविष्य देखील वाईट असत आणि जर आपली सांगत चांगली असेल तर आपलं भविष्य हि चांगलंच होत म्हणून नेहमी चांगल्या लोकांची सांगत धारावी. आम्ही आशा करतो कि तुम्हाला संगतीचे परिणाम मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.