Friday, December 1, 2023
Homeमराठी निबंधसंताची शिकवण मराठी निबंध | Santachi Shikvan Marathi Nibandh

संताची शिकवण मराठी निबंध | Santachi Shikvan Marathi Nibandh

मित्रांनो आज आपण बघणार आहोत संताची शिकवण मराठी निबंध. संत हे असे असतात ज्यांच्या पासून आपल्याला खूप काही शिकायला मिळत. संत हे हे आपल्या धर्माला पुढे नेण्याचं काम करत असतात. आपण जर संतांच्या संगती मध्ये राहिलो तर आपल्यावर देखील चांगले संस्कार होतात व आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो. संत आपल्याला नेहमी खरे बोलायला व देवाची भक्ती करायला सांगतात. संत आपल्याला खूप काही शिकवतात.

म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत Santachi Shikvan Marathi Nibandh. या निबंधापासून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. निबंध छोटा आहे परंतु लाभदायक आहे. तुम्हाला जर शालेय कामासाठी असेच निबंध हवे असतील तर तुम्ही आमची वेबसाईट बघू शकता कारण आम्ही शालेय मुलांसाठी असेच नवं-नवीन निबंध घेऊन येत असतो आणि हा निबंध आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग बघूया संताची शिकवण मराठी निबंध.

संताची शिकवण मराठी निबंध

जगाच्या कल्याणा । संताच्या विभूती । देह कष्टविती उपकारे ।।
या ओळीत संताच्या जीवनाचे सारे सार आले आहे. संत जगत असतो तो दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नव्हे. परंतु सामान्य माणूस मात्र देवाला शोधायला पढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री जातो. मोठमोठ्या मंदिरात जातो. परंतु खरा देव त्या माणसाला कधीच भेटत नाही. म्हणून संत म्हणतात की, ‘देव दगडात नसून माणसात आहे.’

संत गाडगे महाराज यांचे जीवनचरित्र याबाबत फार बोलके आहे. बाबा स्वत:साठी कोणाकडून काहीही घेत नसत. पण कुणी दात्याने त्यांना फारच आग्रह केला आणि पुनः पुन्हा म्हटले की, ‘आम्हाला तुम्हाला काही दयायचे आहे. तर बाबा त्याला सांगत, ‘तुम्ही माझ्या नातलगांना जेवायला द्या.’ गाडगेबाबांचे नातलग म्हणजे गावातील गोरगरीब, लुळेपांगळे, कुष्ठरोगी, अपंग, अनाथ लोक. बाबांच्या या नातलगांना बाबांमुळे लाडवाचे व शिऱ्याचे जेवण मिळे. त्यांचे पोट भरले की बाबा ते तृप्त होत. त्यातला एकही कण स्वत: खात नसत.

जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।

तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा ।। दुसर्यासाठी जगलास तरच खरे जगलास असे संत मानतात.

पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री यात्रेकरूंसाठी गाडगेबाबांनी बांधलेल्या प्रशस्त धर्मशाळा आहेत. या धर्मशाळा गाडगेबाबांनी सर्वसामान्य यात्रेकरूंसाठी बांधल्या. बाबा यात्रेच्या ठिकाणी जात पण देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करत व तेथील परिसर स्वत:च्या हातांनी स्वच्छ करत. कारण इतर संताप्रमाणेच त्यांचीही शिकवण होती. देव दगडात नसून माणसात आहे.,

स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष कटाक्ष होता. मूर्तिपूजा, व नवससायास यांसाठी बळी देणे त्यांना मान्य नव्हते. देव या दगडात नाही तर माणसात आहे असे ते सांगत. कीर्तनातून ते आपला संदेश जनताजनार्दनापर्यंत पोचवत. मनाचा निर्मळ। वाचेचा रसाळ। त्यांच्या गळा माळ। असो नसो।

-संत तुकाराम

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता संताची शिकवण मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असतो जर तुम्हाला संताची शिकवण मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments