सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर मराठी गोष्ट | Marathi Gosht
मित्रांनो आज आपण बघणार आहोत सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर मराठी गोष्ट आपण लहान असतो तेव्हा पासून आपले आई-वडील आपल्याला शिकवतात कि नेहमी खरे बोलावे कारण विजय हा नेहमी खर्याचाच होतो आज आपण जी गोष्ट बघणार आहोत ती देखील “नेहमी खरे बोलावे” याच म्हणी वर आधारित आहे गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर मराठी गोष्ट.
सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर
इरान देशात जीलान गावात सय्यद अब्दुल कादिरचा जन्म झाला. त्याचे वडिल लहानपणी मरण पावले. आईने त्याचे पालनपोषण केले. बालक अब्दुल कादिरला लहानपणापासुन शिक्षणाची आवड होती. जीलान गावाजवळ उच्च शिक्षणाची सोय नव्हती.
गावात शिक्षण पुर्ण झाल्यावर बगदादला जाण्याचा तो विचार करू लागला. बगदादमध्ये उच्च शिक्षणाचे केंद्र होते. अब्दुल कादिरच्या आईची इच्छा नव्हती की तिचा एकुलता एक मुलगा येवढया लांब जावा. परंतु मुलाची शिक्षणाची आवड पाहून तिने जाण्याची अनुमती दिली.
ही नऊशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी मोटार आणि रेल्वे नव्हती. व्यापारी लोक उंट, खेचर इत्यादी प्राण्यांवर सामान ठेवून व्यापार करण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावात गटागटाने जात होते. परंतु रस्त्यात काही लुटारू आणि ठग लोकांची भिती होती. यात्रा करणारे लोकही व्यापार्यांच्या बरोबर गटागटाने येत जात होते. व्यापार्यांचा एक गट जीलान मधुन बगदादला जाणार होता. अब्दुल कादिरच्या आईने आपल्या मुलाला चाळीस अशर्फियां सुरक्षित राहावीत म्हणून त्याच्या बंडीत ठेवल्या होत्या.
ज्यावेळी व्यापा-यांचा एक गट बगदादला जायला निघाला त्यावेळी तो त्यांच्याबरोबर चालु लागला. आई म्हणाली,”मुला, तुझे वडिल येवढेच पैसे ठेवून गेले. माझी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही मोठे संकट तुझ्यावर आले तरी तु खोटे बोलू नकोस, देवावर विश्वास ठेव.”
आईला नमस्कार करून मुलगा अब्दुल कादिर व्यापार्यांच्या गटाबरोबर जाऊ लागला. रस्त्यात दरोडेखोरांनी व्यापा-यांना घेराव घातला आणि त्यांच्याजवळील सामान लुटले. दरोडेखोर पुष्कळ होते. शांत जंगलात त्यांनी आक्रमण केले म्हणून व्यापारी काही करू शकले नाही. अब्दुल कादिरचे कपडे फाटलेले होते म्हणून दरोडेखोर समजले की मुलाजवळ काही नसेल. ज्यावेळी दरोडेखोर व्यापाऱ्यांना लुटून जाऊ लागले त्यावेळी एका दरोडेखोराने अब्दुल कादिरला विचारले “मुला, तुझ्याजवळ काय आहे?
अब्दुल कादिरला आईची गोष्ट आठवली तो न घाबरता म्हणला,”माझ्याजवळ चाळीस अशी आहेत.” दरोडेखोराला वाटले की मुलगा थट्टा करतो. ते रागावले परंतु ज्यावेळी अब्दुल कादिरने बंडी काढून त्यांना दाखविली आणि त्याच्यात अशर्फी निघाली तेव्हा दरोडेखोरांना आश्चर्य वाटले. त्यांच्या सरदारने विचारले,”मुला, तु जाणतोस की आम्ही तुझ्याजवळील अशर्फी खेचून घेऊ. तरी तु आम्हाला त्याची माहिती सांगितली.
अब्दुल कादिर म्हणाला,”माझ्या आईने मला खोटे बोलायला सांगितले नाही. अशर्फी वाचविण्यासाठी मी खोटे कसे बोलणार? तुम्ही अशर्फी घेऊन गेलात तरी देव माझ्यावर दया करील.”
एका लहान मुलाचे बोलणे ऐकून दरोडेखोराना आपल्या लुटमारीबद्दल मोठा पश्चाताप झाला. त्यांनी अब्दुल कादिरला अशर्फी परत केली तसेच सर्व व्यापायांचा माल परत केला आणि दरोडे घालण्याचे काम सोडून दिले. अशा प्रकारे एका मुलाने सत्याला सामोरे जाऊन दरोडेखोरांना पापापासुन वाचविले.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण जर आयुष्यात नेहमी खऱ्याची साथ दिली तर आपल्यावर येणार संकट हे टळू शकत म्हणून आयुष्यात नेहमी खरीचीच साथ दिली पाहिजे. आम्ही आशा करतो कि तुम्हाला सत्यवादी मुलगा अब्दुल कादिर मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.