मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिबीराजाची गोष्ट मराठी अर्थात Stories For Kids In Marathi हि गोष्ट जेवढी लहान मुलांसाठी उपयुक्त आहे तेवढीच तरुणांसाठी देखील उपयुक्त आहे. या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळणार आहे व मानवतेचा दर्शन घडणार आहे. तुम्ही लहान असताना शिबीराजा हे नाव जरूर ऐकलं असेल तर आज आपण त्याच शिबीराजाची मराठी गोष्ट बघणार आहोत जर तुम्हाला हि गोष्ट आवडली तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया शिबीराजाची गोष्ट.
शिबीराजाची गोष्ट मराठी
शिबी हा उशीनर देशाचा राजा होता. एक दिवस राजा सभेत बसला होता. त्यावेळी एक कबुतर उडत आले आणि राजाच्या मांडीवर कपडयात लपून बसले. कबूतर फार घाबरलेले होते. राजाने त्याच्यावर प्रेमाने हात फिरवून गोंजारले.
कबुतराच्या मागे थोडया वेळाने एक ससाणा उडत आला आणि राजाच्या पुढे बसला. ससाणा माणसा सारखा बोलू लागला. “तुम्ही तर न्यायी राजा आहात. कोणाचे खादय तुम्ही हिरावून घेतले नाही पाहिजे. हे खादय आहे. तुम्ही त्याला सोडा.” कबुतर माझे खाद्य आहे.
शिबी राजा म्हणाला,”तू माणसाची भाषा बोलतो. साधारण पक्षी नसला पाहिजे. तू कोणीही असो हा कबुतर मला शरण आला आहे. म्हणून मी शरणागतीचा त्याग करू शकत नाही.
ससाणा बोलला,”मी खूप भूकलेला आहे. तुम्ही माझे खादय हिरावून माझे प्राण का घेता?”
राजा शिबी म्हणाला, “तुझी भूक कोणतेही मांस खाऊन शमवता येईल. तुझ्यासाठी कबुतराला मारले जाण्याची आवश्यकता नाही. तुला किती मांस पाहिजे!
ससाणा म्हणाला,”राजा, कबुतर मरो किंवा दुसरा प्राणी मरो मांस तर कोणालाही मारून मिळते. सर्व प्राणी जर आपली प्रजा आहे आणि शरणागती आहेत तर त्यांच्यातील कोणालाही मारायचे असले तर या कबुतराला मारायला काय हरकत आहे. मी तर ताजे मांस खाणारा प्राणी आहे. अपवित्र मांस खाणाच्या मला लोभ नाही. त्याच्याबरोबर वजन असलेले ताजे मांस कोणत्याही प्राण्याचे असो ते माझी भूक थांबू शकते.
राजाने विचार केला आणि म्हणाला, “मी दुसऱ्या प्राण्यांना मारणार नाही. स्वतःचे मांस मी तुला देईन. ससाणा बोलला की एका कबुतरासाठी आपण सम्राट होऊन स्वतःचे शरीर का कापता? तुम्ही परत विचार करा.”
राजा म्हणाला,ससाण्या, तुला तर तुझे, पोट भरलेच पाहिजे. तू माझे मांस घे आणि मूक शमव. मी विचार केला की माझे शरीर काही अमर नाही. शरणागत आलेल्या प्राण्याचे रक्षण करण्यास शरीर उपयोगी आले तर याच्यापेक्षा दुसरा कोणताही उपयोग होऊ शकणार नाही.
राजाच्या आज्ञेने काटा मागविला. एका पारडयात कबुतराला बसविले आणि दुसऱ्या पारडयात डावा हात कापून ठेवला परंतु कबुतराचे पारडे जमिनीवरून उचलले गेले नाही. शिबी राजाने आपला एक पाय कापून पारडयात ठेवला तरी कबुतराचे पारडे उचलले गेले नाही. ते फार वजनदार होते. शिबी राजाचे शरीर रक्ताने माखले तरी देखील त्याला दुःख नव्हते. आता तर तो स्वतःच पारडयात बसला आणि ससाण्याला म्हणाला मला खाऊन तुझी भूक मिटव.
राजा ज्या पारडयात बसला ते पारडे जमिनीवर आणि कबुतर ज्या पारडयात होते ते पारडे वर उचलले गेले. त्यावेळी सर्वांनी पाहिले की ससाणा साक्षात इंद्रदेवाच्या रूपात प्रकट झाला. अग्नि देवता म्हणाली, “राजा तुम्ही तर फार मोठे धर्मात्मा आहात की त्याची बरोबरी जगात कुणाबरोबरही करता येणार नाही. इंद्राने राजाचे शरीर पहिल्याप्रमाणे केले आणि बोलला धर्माची परीक्षा घेण्यासाठी आम्ही दोघांनी ससाण्याचे व कबुतराचे रूप घेतले. तुमचे यश अमर राहिल. दोन्ही देवतांनी राजाची प्रशंसा केली आणि त्याला आशिर्वाद देऊन अंतर्धान पावले.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती शिबीराजाची गोष्ट मराठी या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत गोष्ट लहान आहे परंतु लाभदायक आहे आम्ही आशा करतो कि तुम्हाला शिबीराजाची गोष्ट मराठी हि गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.