शिव जयंती भाषण | Shivjaynti Speech In Marathi 2021
मित्रानो आज ह्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांचं अंगावर काटा आणणार भाषण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो !
आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भाषण बघणार आहोत ते भाषण वाचून देखील तुमच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही चला तर मग महाराजांचं नाव घेऊन आपल्या भाषणाला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
शिव जयंती भाषण 2021
थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडा खालून साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं आणि पाळता-पाळता विहिरीत पाडाव, विहिरीत मगर दिसावी मगराला पाहून पुन्हा विहिरीतून वर यावं वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी आणि उडी टाकता-टाकता पुन्हा इज फांदी ला पकडावं, फांदी च मोहोळ उठाव आणि मधाचा एक थेंब तोंडात पडावा. ह्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन मिसळली कि क्रांतीची सुरुवात होते क्रांती करणारांच्या रक्ताचे पाट वाहू लागतात, क्रांती करणारांच्या संसाराची राख-रांगोळी होते पण ज्यांचा क्रांतीत भाग नसतो त्यांच्या पिढ्या देखील सन्मानानं जगत असतात !
आमच्या महाराष्ट्रचा इतिहास लिहिला घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खण-खनटांनी, ढगांच्या गड-गटांनी, डोंगराच्या हिरव्या-पिवळ्या शालीन आणि सह्याद्रीच्या ढालीन. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथे उभं राहते तिथे चांगल्या आचार्यांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहेत हि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचे यात्यार्त ज्ञान हि एक वैचारिक आवश्यकता आहे ह्या भूमिकेतून शिव छत्रपतींच्या चरित्र चिंतना साठी मी उद्युक्त झालो आहे. संपूर्ण भारतात ज्यांनी मूठ भर मावळे घेऊन मुघलशाही ची कत्तल करून, ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव, अद्वितीय, सिंहासनाधीश, शीमंत कुलवंत, राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज !
सह्याद्रीच्या कड्या-कपारातून हिंदवी स्वराज्याची रुई ठोकणारा, सह्याद्रीचा बाणेदार, ढाण्या वाघ, अष्टपैलू शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर झाला. “अरे अंधार आला तर दिवा पाहिजे, अंधार झाला तर दिवा पाहिजे आणि आपल्या देशात शिवबांसारखा युवा पाहिजे” समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे कि धर्मासाठी बलिदान होईल. “मरा आणि स्वराज्य प्राप्त करा” हे वचन त्यांनी अनेक भक्तांना ऐकवले पण ज्यांनी ते पूर्ण रूपात साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या मातेचं नाव जिजाबाई , वडिलांचं नाव शहाजी भोसले !
दिल्लीपतीच्या नरडीचा घोट घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात महाराज अजून वयाने किती तरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती ते आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे सुलतानाच्या वतनदारी वर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच पाणी प्यावे का, परकीय राजवटीत विनाकारण युद्ध होऊन आपली माणसे नाहक मरतात, कुटुंब उध्वस्त होतात. तरी पण आपल्या पदरी काय फक्त गुलामगिरी. असे सांगितल्याने त्या मावळ्यांचा चेहरा शिवाजी महारांजांच्या चेहऱ्या सारखा रागाने लाल भडक व्हायचा. ते मावळे महाराजांना म्हणायचे ” बोला राजे बोला आपण जे बोललं ते आम्ही एका पाया वर करण्यासाठी तयार आहोत”
हिंदवी स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते पण महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कधी हिम्मत सोडली नाही, काळ कठीण होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशहा च्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. “अरे शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, अरे बघत नसतो आम्ही किती कुणाची जहागीरदारी” महाराजांच्या आदर्श शाशकारणा बद्दल मी दोन उदाहरण सांगू इच्छितो उदाहरण पाहिलं – महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणायचे रयतेच्या भाजी च्या देठालाही हात लावता कामा नये. म्हणजेच जनतेचा एक पैसे देखील नुकसान होता कामा नये अशे महाराज प्रजादक्ष राजे होते !
उदाहरण दुसरे ते म्हणजे कल्याणाच्या सुभेदाराची सून सैनिकांनी नजराणा म्हणून महाराजांसमोर उभी केली हिला पाहुचन छत्रपती उदगारले “अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो असे वदले शिव छत्रपती” युक्ती आणि कूटनीती मध्ये महाराजांचा हाथ पकडणं कुणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हटले युक्ती आणि कूटनीती मध्ये महाराजांच्या करंगळीत जेवढं होत तेकंध अवरंगजेबाच्या पूर्ण शरीरात देखील नव्हतं. अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पार्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूट नीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजार पानाचे केलेले नाटक आणि औरंगजेबाने जिझिया कर लागू केल्यावर “तुमच्या वर इतके दारिद्र्य आले आहे का” असं म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र हे महाराजांच्या युक्ती ची आणि कुशल बुद्धी ची उदाहरण आहेत !
शिवरायांची आपल्या मावळ्यांवर होती अफाट भक्ती. एकता,मानवता आणि बंधुता हीच त्यांची खरी शक्ती. शिवरायांचा एक मावळा बाजी प्रभू देशपांडे ह्या सेनापती चे वर्णन करताना एक कवी म्हणतो “जिवंत नरवीर लढले , लढले त्यात नवल कसले घडले. धडा वेगळे शीर झाल्यावर नुसते धड हि लढले” शिवरायांचा एक मावळा समोरच्या दहा शत्रूंना भारी पडत होता अशी बलदंड ताकती ची आणि शक्ती ची माणसं ह्या ह्याच मातीत आमच्या राजन तयार केली, म्हणूनच अफाट सैनिक घेऊन आलेल्या शाहिस्तेखानालाहि पाळता भुई थोडी झाली. आहो जीवाचं जाणार होता पण बोटावर निभावलं. भल्या-भल्यांची शक्ती आमच्या राजानंपुढं टिकाव धरत नव्हती. असा शक्तिशाली राजा ह्या नाहाराष्ट्रानं पहिला आणि सह्याद्री हि गर्वानं छाती काढू लागला !
व्हिएतनाम एक असा देश आहे कि ज्याने हिंदुस्तान कडून जी प्रेरणा घेतली त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यात २० युद्ध चाललं. अमेरिकेला वाटत होत कि ह्या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. केवळ काही तसाच पुरेसे आहे ह्या देशाला नष्ट करण्यासाठी. परंतु व्हिएतनाम च हे युद्ध अमेरिकेला चांगलंच महागात पडलं. व्हिएतनाम ह्या युद्धात विजयी झाल्यानंतर , व्हिएतनाम रहट्र्पतींना पत्रकारांनी ह्या विजयाचं रहस्य विचारलं. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिल अमेरिके सारख्या महान देशाला हरवणं आमच्या सारख्या लहान देशाला शक्यच नव्हतं, परंतु युद्ध काळात एक शूर राजाच चरित्र माझ्या हाती आलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. त्यावर पत्रकारांनी विचारलं कि हे शूर परकर्मी राजा कोण होते? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिल छत्रपती शिवाजी महाराज !
आणि त्यावर ते असं हि म्हणाले कि जर हे महापुरुष आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही ह्या संपूर्ण जगावर राज्य केले असते. आणि त्यांनी मृत्यू पूर्वी आपली अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली कि माझ्या समाधीवर लिहिलं जावं “छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधिस्त झाला” आणि हे वाक्य आजही त्या व्हिएतनाम च्या राष्ट्रपतींच्या समाधी वर लिहिलेलं आहे. शिव छत्रपतींच चरित्र हा अनेकांच्याच अभिमानाचा विषय आहे. देशभक्त, समाज सेवक, संशोधक आणि जनसामान्य ह्या सर्वानाच ह्या चरित्र चिंतना बद्दल जिव्हाळा आहे. ३२५ वर्षांपूर्वी शिव छत्रपतींनी देह त्याग केला परंतु त्यांचा किर्तीरुपी देह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात अजून हि जिवंत आहे !
भाषणाच्या शेवटी
आपण माझे भाषण शांत रूपाने ऐकून घेतले त्या बद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद करतो. माझ्या आजच्या भाषणाला इथेच पूर्णविराम देतो आणि ह्या व्यासपीठाची राजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.
शेवटचे शब्द
तर मित्रांनो हे होत शिव जयंती भाषण 2021 जर तुम्हाला महाराज्यांचा हे भाषण आवडलं असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला पण चालू करा ज्याने आमचं नवीन आर्टिकल तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल. कारण आम्ही असेच आर्टिकल तुमच्यासाठी रोज घेऊन येतो. जर तुम्हाला शिव जयंती भाषण ह्या आर्टिकल विषयी कोणते प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता जय हिंद, जय महाराष्ट्र. !