Wednesday, November 29, 2023
Homeमराठी निबंधसूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar Marathi...

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध | Surya Ugavala Nahi Tar Marathi Essay

मित्रांनो आज आपण बघणार आहोत सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध म्हणजेच Surya Ugavala Nahi Tar Marathi Essay. सूर्य हा या संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सूर्य हा एक तारा आहे जो एक आगीच्या गोळ्या सामान आहे. सूर्या मुळेच आपल्या पृथ्वी वर जीवन आहे आणि सूर्यच आपल्या पृथ्वी वर रोज प्रकाश घेऊन येत असतो, त्यामुळे आपण एक-मेकांना बघू शकतो. सूर्य हा सौरमंडल मधील केंद्र बिंदू आहे सूर्या वरूनच आपल्या पृथ्वी वर प्रकाश येतो सूर्या पासून पृथ्वी वर प्रकाश येण्यापर्यंत ८ मिनिट १७ सेकंदाचा कालावधी लागतो आणि त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वी वर प्रकाश पडतो म्हणून आपण कुठल्याही वस्तूला किंवा लोकांना बघू शकतो.

आपण रोज सूर्या ला बघतो, सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो. पण तुम्ही कधी हा विचार किंवा कल्पना केलीये का कि सूर्य उगवला नाही तर? मित्रांनो जर सूर्य नसता तर या पृथ्वी वर काहीच नसत आपण देखील राहिलो नसतो. सूर्याच्या भोवताली पृथ्वी आणि अन्य ग्रह परिक्रमा घालत असता सूर्याला आपण पृथ्वी वरून बघितल्यावर सूर्य आपल्याला खूप लहान दिसतो कारण सूर्य हा पृथ्वी पासून खूप लांब आहे. परंतु सूर्य हा खूप मोठा आहे. जर सूर्य नसता तर या पृथ्वी वर काहीच राहील नसत कारण सूर्या पासून आपल्याला व्हिटॅमिन ड मिळत आणि व्हिटॅमिन ड ने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन ड हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

जर सूर्य उगवला नसता तर आपल्याला खायला अन्न देखील राहिले नसते कारण झाडांना जगण्यासाठी देखील सूर्य किरणांची आवश्यकता असते. मग जर सूर्यच नसता तर आपल्या या पृथ्वी वर झाड आणि अन्न-धान्य देखील पिकले नसते. म्हणून जर सूर्य नसता तर झाड नसते आणि झाड नसते तर आपल्याला अन्न मिळणं अवघड झालं असत. सूर्य नसता तर संपूर्ण पृथ्वी वर कायम अंधार राहिले असते सकाळ, दुपार, संध्याकाळ या शब्दांना काही महत्वच उरले नसते. म्हणून सूर्य हा या संपूर्ण जगासाठी अतिशय महत्वाचा आहे. पृथ्वी वरील प्रत्येक गोष्टीला आपली एक अनमोल किंमत असते बघायला गेलं तर पाणी हे आपलं जीवन आहे पाण्यामुळेच पृथ्वी वर मानव, पशु-पक्षी, झाड हे जिवंत आहे पाणी हे जणू आपल्याला अमृता समान आहे.

पण तुम्हाला माहित आहे का जर सूर्यच नसता तर आपल्याला पाणी देखील उपलब्ध झाले नसते. कारण सूर्याच्या प्रकाशाने नदी मधील पाण्याचं बाष्पीभवन होत आणि त्याचे ढग तयार होतात आणि ते आपल्याला पाणी देतात म्हणून सूर्य हा अतिशय महत्वाचा आहे. जर सूर्य नसता तर आपल्या नदीतील पाण्याचं बाष्पीभवन झालं नसत आणि पृथ्वी वर पाऊस देखील पडला नसता आणि जर पृथ्वी वर पाऊस पडला नसता तर पृथ्वी वरील मानव जीवन हे नष्ट झालं असत. असं म्हणतात कि जर आपण सकाळचं कोवळं ऊन घेतलं तर आपलं स्वस्थ हे चांगलं आणि निरोगी राहत कारण आपल्याला सूर्याच्या कोवळ्या प्रकाशापासून व्हिटॅमिन ड मिळत.

परंतु जर सूर्यच नसता तर आपण हे व्हिटॅमिन ड कुठून घेतलं असत? आणि जर आपल्याला हे व्हिटॅमिन ड मिळालं नसत तर आपलं शरीर हे जणू रोगाचं घरच झालं असत सूर्य न उगवल्याने सकाळ देखील झाली नसती आणि आपल्या चारही बाजूंनी रोगराई पसरली असती. सूर्य बिना मनुष्याचं जीवन हे व्यर्थ आहे जर सूर्य नसता तर प्रथ्वी वर वातावरणच चक्र नसत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे देखील आपल्याला माहित नसत आपल्याला फक्त एकच गोष्ट माहिती असती ती म्हणजे काळोख. मित्रांनो याच्यावरून आपण सांगू शकतो कि सूर्य हा आपल्या पृथ्वीसाठी आणि आपल्या साठी अतिशय महत्वाचा आहे एक प्रकारे सूर्य म्हणजेच जीवन आहे.

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध क्रमांक २

आज आमच्या शाळेला सुट्टी होती मी आणि माझा मित्र राहुल आम्ही दोघांनी एक प्लॅन बनवला दिवसभर क्रिकेट खेळण्याचा आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस क्रिकेट खेळलो. सूर्य खूपच तापला होता त्यामुळे आमचे घामाने हाल-बेहाल झाले होते आम्ही खेळून झाल्यावर घरी गेलो. घरी गेल्यानंतर आई ने माझा अवतार बघितला आणि माझ्यावर ओरडायला लागली कारण घामाने माझे हाल-बेहाल झाले होते आणि क्रिकेट खेळून मी खूप दमलो देखील होतो म्हणून मी लवकर झोपी गेलो. त्या दिवशी मला खूप चांगली झोप आली कारण मी आदल्या दिवशी क्रिकेट खेळून खूप दमलो होतो. दुसऱ्या दिवशी मी वेळेच्या थोड्या आधी उठलो आणि उठल्या उठल्या बाहेर खिडकी उघडून बघितलं बघितलं तर काय सूर्यच उगवला नव्हता कारण मी सुर्यास्थाच्या आधीच उठलो होतो. मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला परंतु मला झोप नाही आली.

मी असच विचार करत बसलो तेवढ्यात माझ्या मनात एक विचत्र विचार आला आणि तो म्हणजे असा की जर सूर्य उगवला नाही तर? जर सूर्य उगवला नसता तर किती छान झालं असत सकाळी लवकर उठाव लागलं नसत, उठून रोज शाळेत जावं लागलं नसत, कारण जर सूर्यच उगवला नसता तर दिवस झालाच कसा असता आणि जर दिवसच झाला नसता तर मग शाळेत जायचा प्रश्नच नाही. जर सूर्यच उगवला नसता तर माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना देखील किती आराम करता आला असता कारण माझ्या वडिलांना रोज ऑफिस ला जावं लागत आणि जर सूर्य नसता तर दिवस झाला नसता आणि जर दिवस झाला नसता तर वडिलांचं ऑफिस उघडायचा प्रश्नच नाही.

जर सूर्य नसता तर मला काही काम पण नसत दिवसभर मस्त आराम केला असता, झोपलो असतो सूर्य नसता तर जीवनात मज्जाच मज्जा होती. सूर्याच्या उष्णतेमुळे क्रिकेट खेळताना आम्हाला घाम देखील आला नसता म्हणून आम्ही मन भरून क्रिकेट खेळलो असतो असे विचार माझ्या मनात त्या दिवशी आले परंतु चांगल्या विचारांची मज्जा लुटताना माझ्या मनात काही दुसरे विचार देखील आले ते म्हणजे सूर्य उगवला नाही तर फक्तच चांगलच होईल का? त्याचे काही वाईट परिणाम तर होणार नाही?असे विचार देखील माझ्या मनात आले.

जर सूर्यच नसता तर पृथ्वी वर सूर्य किरण कुठून आले असते. जर सूर्य किरण पृथ्वी वर आले नसते तर पृथ्वी वर कायम अंधार राहील असत आणि आपल्याला बाहेर देखील पडत आलं नसत. फक्त एवढच नाही तर झाडांना जिवंत राहण्यासाठी देखील सूर्य किरणांची आवश्यकता असते आणि जर सूर्य नसता तर त्या झाडांना सूर्य किरणे कुठून मिळाली असती? आणि जर झाडांना सूर्य किरणे मिळाली नसती तर झाड देखील जगली नसती आणि झाड जगली नसती तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळाला असता? आणि जर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नसता तर आपण कस जगलो असतो?

मी या सगळ्या गोष्टींचा देखील विचार करत होतो कि तेवढ्यात खिडकीतून सूर्य प्रकाश आला आणि मला तेवढ्यात कोंबड्याच्या आवाज देखील ऐकू आला कुकुडुकु. हा आवाज ऐकू येताच आणि सूर्य प्रकाश माझ्या खिडकीतून आत येताच माझ्या डोळ्यातून चक्क पाणीच आलं आणि सूर्य उगवला नाही तर? हा विचार मी माझ्या डोक्यातून कायमचा काढूनच टाकला कारण मला तेव्हा कळून चुकलं कि सूर्य म्हणजे आपलं जीवन आहे आणि सूर्या शिवाय मानव जीवनाची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

सूर्य उगवला नाही तर? (थोडक्यात माहिती)

1) जर सूर्य नसला तर कोणताही प्राणी जिवंत राहणार नाही. उन्हाच्या अनुपस्थितीत वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही. झाडे ऑक्सिजन देणार नाहीत आणि त्याशिवाय आयुष्य जगन अशक्य आहे.

2) जर ह्या जगात सूर्य नसता तर जगात किती रोग पसरली असती. सूर्याच्या प्रकाशात बर्‍याच रोगांचे जंतू मरतात ज्यामुळे काही रोग नियंत्रणात राहतात. आपल्या शरीराला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळतो, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते.

3) जर सूर्य नसला तर झाडे-झुडपे किंवा कोणतीही पिके मिळणार नाहीत. काहीही वाढणार नाही कारण सूर्यप्रकाश हा हिरव्या वनस्पतीना वाढवण्यास मदत करतो आणि वनस्पती प्रकाशाच्या उपस्थितीतच आपले अन्न तयार करतात. परिणामी, ते स्वत: चे खाद्य तयार करू शकणार नाहीत आणि आपल्याला पीक मिळणार नाही.

4) सूर्य उगवला नाही तर आपल्या पृथ्वी वर ऋतू देखील राहणार नाहीत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यापैकी आपल्याला काहीच बघायला मिळणार नाही बघायला मिळेल तो फक्त अंधार.

5) सूर्य उगवला नाही तर आपल्याला प्यायला पाणी देखील मिळणार नाही कारण जर सूर्यच नसेल तर तलाव, नद्या, सरोवरे यांच्यातील जमा पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि जर त्यांचे बाष्पीभवन झाले नाही तर पाऊस देखील पडणार नाही आणि जर पाऊस पडला नाही तर आपल्याला प्यायला पाणी देखील मिळणार नाही.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हे होते सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हे निबंध आवडले असतील आणि हे निबंध तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. जर तुम्हाला हे निबंध आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन असतो जर तुम्हाला सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध हे निबंध आवडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments