Friday, September 29, 2023
Homeतंत्रज्ञानटेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From Telegram...

टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From Telegram In Marathi

मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे. एक काळ असा होता जेव्हा घरातले लोकं आपल्या मुलांना म्हणायचे तू संपूर्ण दिवस मोबाईल वापरत असतो त्या पेक्षा अभ्यास कर. या व्यतिरिक्त म्हणायचे एवढा जास्त वेळ मोबाईल वापरतो तुला त्याचे पैसे मिळत का. पण आजच्या काळात ती गोष्ट कुठे तरी खरी होताना दिसत आहे. खूप मुलं अशी आहात जी मोबाईल चा उपयोग करून महिन्याचे लाखो रुपये कमवत आहे. विविध अशे एप इंटरनेट वर उपस्थित आहे ज्याचा उपयोग करून मुलं लाखो रुपये कमवू शकतात.

त्यात सगळ्यात आधी ज्या एप च नाव येत ते म्हणजे YouTube. परंतु पैसे कमवायचा बाबतीत जर YouTube नंतर दुसरं कुठलं नाव येत असेल तर ते म्हणजे Telegram तर आजच्या या लेखामध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत कि How To Earn Money From Telegram In Marathi.सोबतच आपण Telegram एप विषयी दुसरी माहिती देखील घेणार आहोत. चला तर मग बघूया टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे.

टेलिग्राम एप वर अकाउंट कस बनवायचं

Step 1 – टेलिग्राम एप वर अकाउंट बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला टेलिग्राम एप ला गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे. किंवा तुम्ही खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करून देखील टेलिग्राम एप ला डाउनलोड करू शकता.

Step 2 – एप डाउनलोड केल्यानंतर एप ला ओपन करायचं आहे. एप ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्यासमोर मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याचा पर्याय येईल. तिथे तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक समाविष्ट करायचा आहे. तुम्हाला तो मोबाईल क्रमांक समाविष्ट करायचा आहे जो तुमच्या जवळ असेल.

Step 3 – त्यानंतर तुम्ही समाविष्ट केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये समाविष्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या नेक्स्ट च्या बटनावर क्लिक करायचं आहे.

Step 4 – OTP समाविष्ट केल्यानंतर तुमच्या समोर पुढचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव समाविष्ट करायचं आहे आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये तुमचं आडनाव समाविष्ट करायचं आहे. आणि नेक्स्ट करायचं आहे.

Step 5 – त्या नंतर तुमचं टेलिग्राम अकाउंट सुरु म्हणजेच ऍक्टिव्ह होईल.

टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे

मित्रांनो आम्ही तुम्हाला टेलिग्राम वरून पैसे कमावण्याचे 5 सोपे मार्ग सांगणार आहोत ज्या मार्गाने तुम्ही टेलिग्राम वरून लाखो रुपये कमावू शकतात. प्रत्त्येक आयडियाची सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे. चला तर मग बघूया टेलिग्राम वरून पैसे कमावण्याचे मार्ग कोणते आहेत.

#1 अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

जर आपण टेलिग्राम मध्ये अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) बघितलं तर भरपूर अशे लोक आहेत जे टेलिग्राम मध्ये अफिलिएट मार्केटिंग करतात आणि पैसे कमवतात. मित्रांनो जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग मार्केटिंग चा अर्थ माहित नसेल तर मी सांगू इच्छितो कि अफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या इ-कॉमर्स वेबसाईट वरील प्रोडक्ट ला विकण्यास मदत करणे. जर आपण त्यांचं ते प्रोडक्ट विकण्यास त्यांची मदत केली तर प्रत्येक प्रोडक्ट वर आपल्याला ठरल्या नुसार कमिशन दिल जात. त्यालाच आपण अफिलिएट मार्केटिंग म्हणतो.

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला टेलिग्राम वर स्वतःच चॅनल ओपन करायचं आहे. चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला एखाद्या इ-कॉमर्स वेबसाईट वर आपलं विक्रेता अकाउंट बनवायचं आहे. विक्रेता अकाउंट बनवल्या नंतर तुम्ही ज्या प्रोडक्ट ची अफिलिएट मार्केटिंग करणार आहेत त्या प्रोडक्ट ची तुम्हाला अफिलिएट लिंक घ्यायची आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल वर येऊन अपलोड करायची आहे. जर कुणी व्यक्ती तुमच्या द्वारा दिल्या गेलेल्या लिंक वरून जर प्रोडक्त्त विकत घेत असेल तर त्या बद्दल तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट मागे १० किंवा २० टक्के कमिशन दिल जात. अशा प्रकारे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करून टेलिग्राम वरून पैसे कमावू शकता.

#2 स्वतःचे कोर्स किंवा सर्व्हिस बनवून

जर तुम्हाला टेलिग्राम वरून पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या चॅनल चे subscriber म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या चॅनल चे subscriber वाढवायचे आहे. आपला पुढचा मार्ग आहे स्वतःचे कोर्स किंवा सर्व्हिस विकायच्या. मित्रांनो जर तुमच्याकडे असं कुठलं नॉलेज आहे जे फक्त तुम्हाला माहिती आहे आणि बाकीचे लोकं ते शिकण्यासाठी उत्सुक आहे. तर तुम्ही त्याचा एक व्हिडीओ कोर्स बनून आपल्या टेलिग्राम चॅनल वर विकू शकता. हा देखील टेलिग्राम वरून पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे.

परंतु या साठी तुम्हाला सर्वात आधी त्या कोर्स चे शॉर्ट व्हिडीओ बनून मोफत लोकांपर्यंत पोचवायचे आहे. ज्याने लोकांना समजेल कि या कोर्स मध्ये नेमकं काय आहे. जर लोकांना तुमचा तो शॉर्ट व्हिडीओ आवडला तर ते तुमचा पूर्ण कोर्स नक्की विकत घेतील. लोकांकडून पैसे कसे घ्यायचे हे तुमच्यावर असेल. तुम्ही महिन्याचे चार्जेस ठेऊ शकता किंवा वन टाइम चार्जेस ठेऊ शकता. जर तुम्ही share केलेलं फ्री नॉलेज लोकांना आवडलं तर ते तुमचा कोर्स नक्की विकत घेतील.

#3 लिंक शॉर्टनर (link shortener)

लिंक शॉर्टनर च्या साहाय्याने तुम्ही कोणत्याही लिंक ला शॉर्ट करून त्याच्यावरून पैसे कमावू शकता. जर तुम्ही एखादा असं कन्टेन्ट पोस्ट करत आहेत ज्या मध्ये एखादी लिंक समाविष्ट आहे तर त्या लिंक ला तुम्ही लिंक शॉर्टनर च्या मदतीने छोटी करून आपल्या टेलिग्राम चॅनल वर पोस्ट करू शकता. जर तुम्ही लिंक शॉर्टनर चा उपयोग करून तुमच्या टेलिग्राम चॅनल वर एखादी लिंक पोस्ट केली आणि एखाद्या व्यक्ती ने जर त्या लिंक वर क्लिक केलं, तर त्या व्यक्तीला मुख्य कन्टेन्ट पर्यंत पोहचण्याआधी एक जाहिरात दाखवली जाते. जेव्हा ती जाहिरात यूजर कडून पूर्ण बघितली जाईल तेव्हाच त्याला मुख्य कन्टेन्ट पर्यंत पोहचता येईल.

आणि जर लोकांनी त्या लिंक शॉर्टनर च्या ऍड बघितल्या तर त्या बद्दल तुम्हाला पैसे दिले जातात. टेलिग्राम वर अशे बरेचशे चॅनल आहेत जे या पद्धतीने पैसे कमवतात. ते कुठल्याही गोष्टी ची लिंक देताना त्या लिंक ला लिंक शॉर्टनर च्या साहाय्याने शॉर्ट करतात. उदाहरणार्थ मोबाईल, मोबाईल अप्लिकेशन, मुवि ची लिंक अश्या गोष्टींच्या लिंक देतात. आणि त्या लिंक वर क्लिक केल्यावर युजर ला जाहिरात दिसते आणि त्याचे पैसे चॅनल मालकाला मिळतात. अशा प्रकारे तुम्ही लिंक शॉर्टनर चाय साहाय्याने टेलिग्राम वरून पैसे कमावू शकतात.

#4 स्पॉन्सरशिप (sponsorship) च्या मदतीने

मित्रांनो जस कि आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं कि जेवढे जास्त subscriber तुमच्या टेलिग्राम चॅनल वर असतील तेवढे जास्त टेलिग्राम वरून पैसे कमावण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतात. आपला पुढचा जो मार्ग आहे स्पॉन्सरशिप त्याच्यासाठी देखील तुम्हाला अधिक subscriber असण्याची आवश्यकता आहे. जर तुमच्या चॅनल वर अधिक subscriber आहेत तर तुम्हाला विविध प्रकारच्या प्रोडक्ट ची स्पॉन्सरशिप मिळू शकते. जर तुमचं चॅनल एखाद्या ब्रँड च्या किंवा प्रोडक्ट च्या नजरेत आलं तर तुम्हाला त्या प्रोडक्ट ची किंवा ब्रँड ची स्पॉन्सरशिप देखील मिळू शकते.

जर समजा तुमचं चॅनल हेल्थ शी संबंधित आहे तर तुम्हाला हेल्थ शी संबंधित प्रोडक्ट ची किंवा ब्रँड ची स्पॉन्सरशिप मिळू शकते. जर तुमचं चॅनल टेकनॉलॉजि संबंधित आहे तर तुम्हाला टेकनॉलॉजि शी संबंधित प्रोडक्ट ची किंवा ब्रँड ची स्पॉन्सरशिप मिळू शकते. याचा अर्थ असा कि तुमचं चॅनल ज्या विषयाशी संबंधित त्या विषयाशी संबंधित जाहिराती तुम्हाला मिळू शकता.

#5 पेड प्रोमोशन्स किंवा चॅनल विकून

मित्रांनो पेड प्रोमोशन्स किंवा चॅनल विकून हे दोन मार्ग सगळ्यात अधिक प्रचलित आहे आधी आपण बघू चॅनल विकून पैसे कशे कमवायचे. जर तुमच्या चॅनल वर अधिक subscriber असतील तर तुम्ही आपलं चॅनल विकून देखील पैसे कमावू शकता. जर तुम्हाला टेलिग्राम वर subscriber वाढवण्याची पद्धत माहिती असेल तर तुम्ही अशे खूप सारे चॅनल बनवून त्यांचे subscriber वाढवुन ते चॅनल विकू शकता. खूप सारे असे लोकं आहेत जे आधीच जास्त subscriber वाले चॅनल घेण्यासाठी तयार असतात. तुम्ही तुमच्या चॅनल ची किंमत subscribers वरून ठरवू शकता. जेवढे जास्त subscribers तेवढी जास्त किंमत.

आता दुसरा मार्ग म्हणजे पेड प्रोमोशन्स हा देखील खूप चांगला मार्ग आहे टेलिग्राम वरून पैसे कमवण्याचा. तुम्ही इतर लोकांचे टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट किंवा वेबसाईट यांसारख्या गोष्टी प्रमोट करून त्याचे चार्जेस घेऊ शकता. खूप सारे लोकं प्रमोशन साठी तयार असता परंतु त्यासाठी तुमच्या टेलिग्राम चॅनल वर आधी subscribers असणं आवश्यक आहे. जितके जास्त subscriber तितके जास्त पैसे कमावण्याचे मार्ग.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हे होत टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे , How To Earn Money From Telegram In Marathi आम्ही आशा करतो कि तुम्हाला समजलं असेल कि टेलिग्राम वरून पैसे कसे कमवायचे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल. कारण आम्ही अशेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला टेलिग्राम से पैसे कैसे कमायें इन मराठी या लेखाविषयी काही समस्या किंवा प्रश्न असेल तर तुम्ही आहाला कमेंट करून विचारू शकता. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments