Friday, December 1, 2023
Homeमराठी निबंधवृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध | vrukshavalli amha soyari essay in marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध | vrukshavalli amha soyari essay in marathi

मित्रांनो आज आपण बघणार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध. वृक्ष या शब्दाचा अर्थ होतो झाड. वृक्ष हे आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण असतात हे सांगण्याची कदाचित आवश्यकता नाही कारण आज जर आपण जिवंत आहे तर ते वृक्षामुळेच. झाडापासून आपल्याला मुख्य म्हणजे ऑक्सिजन मिळतो त्याच्यासोबतच झाड आपल्याला सावली देत, अन्न देत, विविध प्रकारच्या वस्तू देखील झाडापासून बनवल्या जातात ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो उदा. टेबल, खुर्ची, दरवाजे, खिडक्या इ.

परंतु आजच्या काळात झाडांची संख्या हि प्रत्येक दिवशी कमी होत चालली आहे. ज्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जंगलतोड. सरकारने जंगल तोड थांबवण्यासाठी विविध प्रकारचे कायदे देखील बनवले आहे परंतु काही लोक त्या कायद्यांचा उल्लंघन करून जंगल तोड करतात म्हणून आज आपण बघणार आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध ज्याने झाडांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण होईल. तसेच लहान मुलांना शाळेत देखील हा निबंध विचारला जातो तर लहान मुलं देखील आपल्या शालेय कामासाठी या निबंधाचा उपयोग करू शकता चला तर मग बघूया वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती।। “संत तुकाराम”

त्या दिवशी वृत्तपत्रातील त्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. बातमी होती, चिपको आंदोलनाची’ हिमालयाच्या उतरणीवरील वृक्षसंपत्तीचे रक्षण बहुगुणा सारख्या नेत्यानी कसे प्राणपणाने केले त्याची !

लताद्रमाच्या सहवासातच आपले जीवन व्यतीत करणाऱ्या ऋषींच्या वंशजांना आज त्याच भूमीत ही वनसंपत्ती वाचविण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत. सस्यशामल असलेल्या वसुंधरेची ही अवस्था कशामुळे झाली? त्याचे मुख्य कारण म्हणजे आज ढासळलेले पर्यावरणाचे संतुलन ! प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत गेली. सरपण, वनौषधी, कागदासाठी लागणारा बांबू, इमारती लाकूड, उदयोगधंद्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन गेल्यामुळे आज मातीची धूप होत आहे. थोडीथोडी नाही तर वर्षाला सुमारे ६०० कोटी टन वृक्षसंपत्ती कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी कमी होत चालले अर्थव्यवस्थेचा ताण वाढतो आहे.

या सर्वांचे कारण मुख्य एकच – बेसुमार जंगलतोड ! भलेही तुकाराम महाराजांना पर्यावरण हा शब्द माहीत नसेल, जमिनीची धूप, वातावरणातील कार्बन- डायऑक्साइड व ऑक्सिजन यांचे आवश्यक प्रमाण याची कल्पना नसेल परंतु तरीसुद्धा ‘वृक्षवल्ली हे आपले सोयरे आहेत.’ असे सांगून सोयर’ या एका शब्दांत त्यांनी पर्यावरणाच्या संतुलनाची कल्पना एकवटली आहे. या सोयऱ्यांची सोयरीक आपण जपली तर किती त-हेनी ते आपली सोय बघतात काय सांगावे ? फुलांच्या सुगंधाने, मधुर फळांच्या आस्वादाने, स्नेहाच्या सावलीने मनुष्याला सुखी करणाऱ्या या वृक्षाचा मंत्र एक असतो –

सेवितव्यो महावृक्षः फलच्छायासमान्वितः । यदिदैवात्फलं नास्ति छाया केन निवार्यते ।।

वृक्ष म्हणजे पृथ्वीचे आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवी जीवन टिकणार नाही. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात. या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे. वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग पर्यावरणाचे असंतुलन ढासळून जाईल व मानवाच्या विनाशाशिवाय दुसरा एकही पर्याय उरणार नाही.

म्हणूनच शकुंतलेला वृक्षलतांनी निरोप देणे, ‘मॅकबेथ’ मधील झाडांचे सैन्य चालून येणे या गोष्टीत खरी जादू भरली आहे. आज दिवसेंदिवस बेबंद बनत चाललेल्या लहरी हवामानाला वेठीला धरून, पूर्वीसारखे पुन्हा ताळ्यावर आणून, कामाला लावण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे. शहरांतील सिमेंट काँक्रिटच्या उंच जंगलांची नव्हे.

श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले की, माझा वास सर्व वृक्षामध्ये आहे. वराह पुराणात म्हटले आहे –

यावत भूमंडलं धने, सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठन्ति मेदिन्याम् संततिः पुत्र पौतृकी। देहन्ते परमं स्थानम्, यत्सुरैरपित दुर्लभम् । प्राप्नेति पुरूषो नित्यं, महामायाप्रसादतः ।।

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि वृक्षाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे देखील तुम्हाला समजले असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असतो जर तुम्हाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments