Wednesday, September 27, 2023
Homeमराठी निबंधमाझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel Essay in Marathi

माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel Essay in Marathi

मित्रांनो आपण आज बघणार आहोत माझा आवडता खेळ मराठी निबंध म्हणजेच Maza Avadta Khel Marathi Nibandh. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय खेळांविषयी निबंध देणार आहोत जे निबंध आपल्याला शाळेत होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्ही खाली दिलेल्या निबंधावर अभ्यास करून परीक्षेची तयारी करू शकता आणि तुम्हाला निबंध आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा.

माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध

संपूर्ण जगात कदाचित एखादा असा व्यक्ती असेल ज्याला क्रिकेट हा खेळ माहिती नसेल क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय व सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. भारतात देखील खूप क्रिकेट प्रेमी राहतात जर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी गेलात तर तुम्हाला क्रिकेट खेळणारी मुलं हि गल्लो-गल्ली दिसतील खुल्या मैदानात जर जागा मिळाली नाही तर मुलं गल्लीतच बॅट आणि बॉल घेऊन क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. हा खेळ मोठ्या मोकळ्या मैदानात खेळला जातो. क्रिकेट हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी देशात क्रिकेटला जास्त पसंती आहे.

सगळ्यात आधी टॉस केला जातो आणि जो संघ टॉस जिंकतो त्याला गोलंदाजी करायची आहे कि फलंदाजी हे ठरवण्याचा अधिकार असतो. सर्वप्रथम जो संघ गोलंदाजी करणार आहे त्या संघाचे ११ खेळाडू मैदानात उतरतात. त्यानंतर ज्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्या संघाचे दोन खेळाडू धाव काढण्यासाठी मैदानात उतरतात. प्रथम संघ फलंदाजी करतो व विरोधी संघाला जमेल तितक्या जास्त धावांचे आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. विरोधी संघाला जिंकण्यासाठी जेवढ्या धावा फलंदाजाच्या संघाने केल्या आहेत त्यापेक्षा एक धाव जास्त करावी लागते जर त्या संघाने जास्त धावा केल्या तर तो संघ विजयी ठरतो. जो संघ धावांचा पाठलाग करतो त्याला गोलंदाज म्हणतात आणि जो संघ चेंडू फेकतो त्याला गोलंदाज म्हणतात.

फलंदाजाणे चौकार आणि षटकार मारू नये यासाठी मैदानात चेंडू पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक उपलब्ध असतात. कसोटी सामने, वन डे, टी -२० असे अनेक प्रकारचे क्रिकेट सामने आहेत. आजकाल खूप सारे लोक टी -20 सामने पाहणे पसंत करतात कारण त्या सामन्यांमध्ये धावांचा जणू पाऊसच पडतो आणि सोबतच हा सामना फक्त २० ओव्हर चा असतो ज्यामुळे लवकर संपतो. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी देशांमध्ये सध्या क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळ १८४४ मध्ये अमेरिका आणि कॅनडा दरम्यान झाला. न्यूयॉर्कमधील सेंट जॉर्ज क्रिकेट क्लबच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. क्रिकेट ची सुरुवात हि फ्रांस देशा मध्ये झाली परंतु तेव्हा क्रिकेट ला वेगळ्या पद्धतीने खेळलं जात होत.

सूत्रांच्या माहितीनुसार आज आपण जो क्रिकेट खेळ खेळत आहोत त्याची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली होती. हा खेळ इंग्लंडपासून जगातील सर्व देशांमध्ये पसरला. १८४८ मध्ये मुंबईतील ओरिएंटल क्लब येथे प्रथम क्रिकेट सामना खेळला गेला. एक कसोटी सामना हा ५ ते ६ दिवस खेळला जातो आणि जो वन डे सामना आहे तो ५० ओव्हर चा असतो आणि तो १ दिवसात पूर्ण होतो आताच्या काळात जर आपण बघायला गेलं तर जास्त प्रमाणात २०-२० सामने खेळले जातात आणि जास्त लोकांना पाहायला देखील आवडतात आजकाल इंडियन प्रीमियर क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल सामन्यांचे वेड तरुणांमधे वारंवार पाहिले गेले आहे. हा दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात खेळला जातो. क्रिकेटचा खेळ इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लोकांनी सुरू केला होता. क्रिकेट हा पहिला खेळ होता जो श्रीमंत इंग्रज लोक आणि हिंदुस्थानातील महाराजांनी खेळला होता. भारतातील क्रिकेट खेळाची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीने केली होती.

आज जेव्हा पण भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असतो तर लोकं जणू तो सामना पाहण्यासाठी वेडे होतात जे लोकं ऑफिस मध्ये कामाला असतात ते सुट्टी घेतात, जे मुलं शाळेत असतात ते शाळेतून सुट्टी घेतात लोकांचा उत्साह हा सामन्या दरम्यान बघायला मिळू शकतो. भारतीय क्रिकेटपटू इतर देशांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जातात आणि इतर देशांचे खेळाडूही येथे क्रिकेट खेळण्यासाठी येतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या मध्यभागी एक खेळपट्टी बांधली जाते जिला आपण स्पीच देखील म्हणतो. पीचच्या दोन्ही बाजूला विकेट्स ठेवल्या जातात ज्याला आपण स्टंप देखील म्हणतो. विकेटमधील अंतर सुमारे बावीस यार्ड असते. षटक संपेपर्यंत क्रिकेट संघातील खेळाडू फलंदाजी करतात किंवा जो पर्यंत सगळे फलंदाज बाद होत नाही तो पर्यंत खेळतात.

क्रिकेट खेळातील महत्त्वाचे निर्णय जसे की खेळाडू आऊट आहे की नाही, नो बॉल आहे की नाही इत्यादी निर्णय पंच घेतात. क्रिकेटच्या मैदानावर दोन पंच असतात आणि विशेष परिस्थितीत एक विशेष पंचही ठरविला जातो, याला थर्ड पंच म्हणतात. कलकत्ता क्रिकेट क्लब हे भारतातील पहिल्या क्रिकेट संस्थेचे नाव होते. ७८७८ मध्ये एक प्रोफेसर एका प्रेसिडेंसी कॉलेज क्रिकेट क्लबच्या नावाखाली प्राध्यापकांनी भारतीय क्रिकेट क्लबची स्थापना केली. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, रोहित शर्मा, विराट कोहली इ. भारतातील नामांकित क्रिकेटपटूंची नावे आहेत. भारतीय क्रिकेट संघात सध्या कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा उपकर्णधार आहेत.

लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकरचे मास्टर ब्लास्टर शॉट्स पाहण्यासाठी आणि मैदानात तिकिट खरेदी करण्यासाठी लांब रांगा जमतात. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे चाहते आणि प्रशंसक देखील सर्वत्र आहेत सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हे सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय खेळाडू आहेत. महेंद्रसिंग धोनीला आयपीएलचा राजा म्हटले जाते. त्याच्या संघाने आयपीएलमधील सर्वाधिक सामने जिंकले आहेत. शनिवारी 2 एप्रिल 2011 रोजी भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेने 6 गडी राखून पराभव केला. हा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. १९८३ मध्ये भारताने वेस्ट इंडिजला हरवून पहिला विश्वचषक जिंकला.

क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय खेळ आहे जो लोकांना खेळायला आणि पाहायला आवडतो. क्रिकेट सारखे खेळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आजकाल शाळा, महाविद्यालय, गल्ली परिसरात क्रिकेट खेळले जाते. मुले लहानपणापासूनच शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळतात. क्रिकेटला सज्जन खेळ म्हणतात. भारतातील क्रिकेटला उंचीवर नेण्याचे श्रेय सचिन, सुनील गावस्कर, धोनी, विराट आणि कपिल देव इत्यादी क्रिकेटपटूंना जाते. क्रिकेट हा एक मनोरंजक खेळ असून तो खेळ खेळल्याने खेळाडू मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो. भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप लोकप्रिय आहे.

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध

बॅडमिंटन हा खेळ माझा आणि माझ्या मित्रांचा आवडता खेळ आहे बॅडमिंटन या खेळाला सुरुवातीला सेनेचे अधिकारी इंग्लंड मध्ये खेळतं होते आणि जेव्हा ते भारतमध्ये येऊन हा खेळ खेळायला लागले तेव्हा पासून हा खेळ भारतामध्ये देखील लोकप्रिय झाला. या खेळाचे नियम बनवण्यासाठी सन १८९३ मध्ये बॅडमिंटन असोशिएशन ची स्थापना करण्यात आली बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी मैदानाची लांबी हि ४४ फूट आणि रुंदी हि २० फूट असते. या मैदानाला दोन सामान भागांमध्ये विभागण्यासाठी मध्ये एक जाळी लावली जाते हि जाळी जमिनीपासून ५ फुटाच्या उंचावर बांधली जाते त्या जाळीजवळून १ ९८ मीटर च्या अंतरावर एक सफेद रंगाची सर्व्हिस लाईन आखलेली असते जिथून खेळाडू हा खेळ खेळण्यास सुरुवात करतो या खेळतं सगळ्यात आधी कोणता खेळाडू खेळेल हे ठरवण्यासाठी इतर खेळांप्रमाणे टॉस ची मदत घेतली जाते.

बॅडमिंटन या खेळाला जिंकण्यासाठी या खेळात २१ पॉईंट निर्धारित केले आहेत जो संघ सगळ्यात आधी पॉईंट पूर्ण करतो तो संघ विजयी ठरतो दोन्ही संघाना नियमांचे पालन करून हा खेळ खेळावा लागतो. या साठी नेट च्या मध्यभागी पंच म्हणजेच अंपायर बसलेले असतात ते पंच दोन्ही खेळाडूंच्या अंकाची मोजणी करत असतात आणि सोबतच खेळाचे नियम मोडल्यावर पॉईंट कट देखील करतात. बॅडमिंटन या खेळाला दोन जण किंवा चार जण मिळून खेळू शकता या खेळाची बॅट हि जाळी ने बनलेली असते जिला लोखंडचा दांडका असतो ज्याची लांबी ६८० मिमी. आणि रुंदी २३० मिमी. असते. आणि त्या बॅटच वजन ७० ते ८० ग्रॅम इतकं असत. बॅडमिंटन या खेळाची लोकप्रियता खूप आहे. भारतामध्ये क्रिकेट नंतर याच खेळाला सर्वात जास्त खेळले जाते.

मला हा खेळ याच्यासाठी आवडतो कारण या खेळाचे नियम पण सोप्पे आहेत आणि हा खेळ खेळायलाही सोपा आहे. सोबतच या खेळाला सगळेच लोकं खेळू शकता कारण हा खेळ खेळायला खूप सोपा आहे. मी शाळा सुटल्यावर रोज माझ्या मित्रांसोबत , माझ्या बहिणीसोबत किंवा माझ्या भावासोबत बॅडमिंटन हा खेळ खेळतो खेळून झाल्यावर अभ्यास पण नियमित करतो. हा खेळ अतिशय शांततेने खेळाला जाऊ शकतो व कोणाला इजा पोहचेल असे देखील या खेळात काहीच नाही. बॅडमिंटन या खेळाचे आमच्या शाळेत दरवर्षी सामने असतात ज्याच्यात मी भाग घेऊन बक्षिस पण मिळवतो. भारतात देखील खूप सारे आंतराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंडियन प्रतियोगिता जिंकली आहे आणि सोबतच १९८० पासून ते २००१ पर्यंत भारताकडून या खेळाला अंतराष्ट्रीय स्तरावर खेळले.

सन २०१५ मध्ये सायना नेहवाल २०१२ मधील ऑलम्पिक मध्ये कांस्य पदकासह भारतीय महिला प्लेयर वर्ड मध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता आणि पिव्ही सिंधू ने २०१६ मध्ये रौप्य पदक जिंकले. या खेळाडूंपासून मला खूप प्रेरणा मिळते मी भविष्यत बॅडमिंटन चा आंतराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे स्वप्न बघत आहे. भारतामध्ये बॅडमिंटन हा वेळेनुसार एक लोकप्रिय खेळ बनत चालला आहे. आणि भविष्यात हा क्रिकेटपेक्षा देखील लोकप्रिय खेळ होण्याची श्यक्यता आहे.

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध

आजकाल भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात क्रिकेट हा सार्वधिक लोकप्रिय खेळ आहे. आपल्या देशात लोकांना क्रिकेट मॅच बघायला इतकी आवडते कि लोक चक्क ऑफिस मधून सुट्टी घेतात. फुटबॉल असो, हॉकी असो किंवा क्रिकेटचा विश्वचषक असो, स्टेडियममध्ये उत्साह निर्माण होतो. जमाव नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र पोलिस कर्मचारी नेमले जातात. जेव्हा संघ जिंकतो तेव्हा प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा जयजयकार करतात. त्याचे चित्र वर्तमानपत्रात छापले जाते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन केले जाते आणि त्यांना देशवासीयांचे प्रेम देखील मिळते.

क्रिकेट, हॉकी, फुटबॉल कितीही लोकप्रिय असले, तरी माझा आवडता खेळ कबड्डी आहे जो अजूनही खेड्यांमध्ये, गावात आणि शहरातील शाळांमध्ये खेळला जातो. प्रत्येक खेळाप्रमाणे कबड्डीही मनोरंजन व व्यायाम करणारा खेळ आहे. इतर खेळांप्रमाणे कबड्डी खेळाला खेळण्यासाठी महागड्या वस्तू आणि उपकरणे लागत नाहीत. फार पूर्वीपासून कबड्डी हा एक लोकप्रिय खेळ आहे. त्यावेळी कबड्डी खेळाचे काही नियम होते परंतु ते विशिष्ट नियमांनी बांधलेले नव्हते. परंतु आज कबड्डीसाठी एक मैदान असते जे आयताकृती आणि साडे बारा मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीचे आहे.

मुले खेड्यात व शहरात कबड्डी खेळतात पूर्वीच्या काली रिकाम्या मैदानाच्या मधे एक रेष आखायचे आणि दोन्ही संघ सामना सुरू करायचे. क्रिकेट संघाप्रमाणेच यातही दोन संघ असतात. दोन्ही संघात प्रत्येकी १२ खेळाडू ज्यातील ७ खेळाडू हे मैदानात सामना खेळण्यासाठी उतरतात व उरलेले ५ खेळाडू हे राखीव असतात. दोन्ही संघातील खेळाडूंनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे व किट घातलेली असते. वेगळ्या रंगाचे कपडे घालण्याचा मुख्य हेतू असा असतो कि कोणता खेळाडू कोणत्या संघाचा आहे हे जाणून घेणे सोपे जाते. प्रत्येक खेळाडूच्या शर्ट वर मागच्या बाजूने एक अंक लिहिलेला असतो ज्याने पंचाला त्या खेळाडू ला ओळखण्यास मदत होते.

दोन्ही पक्षांचे आपापले नेते आहेत. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी परिचय करून देतात. नाणे फेकले जाते आणि नाणे फेकल्यावर सामन्याला सुरुवात केली जाते. जो संघ टॉस जिंकतो तो आधी आक्रमण करतो म्हणजेच एंट्री करतो. सर्वात आधी आक्रमक खेळाडू-कबड्डी-कबड्डी म्हणतो आणि त्यांच्या पार्टीमध्ये जातो त्या खेळाडूला नियमांचा भंग न करता, श्वास न घेता स्पर्श करून आपल्या हद्दीत परत यावे लागते. जर तो सुखरुप परत आला तर तर त्याने स्पर्श केलेला विरोधी संघातील खेळाडू हा बाद मानला जातो. जितके अधिक खेळाडू बाहेर असतील तितक्या विजयी संघाच्या खात्यात अधिक गुण जोडले जातील. जर खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात असेल आणि त्याचा श्वास मधे फुटला असेल तर तो खेळाडू बाद मानला जातो आणि तो संघाबाहेर असतो.

खेळाच्या शेवटी, पराभूत झालेल्या संघाचे नेते(कप्तान) आणि सदस्य विजयी संघाचे अभिनंदन करून नम्रता दर्शवतात. ज्या संघाने विजय मिळविला आहे त्याला ट्रॉफी दिली जाते. कबड्डीमुळे शारीरिक विकास तर होतोच तसेच मानसिक विकास देखील होतो. नियमबद्ध खेळून, नियमांचे पालन करून कबड्डी हा खेळ खेळला जातो. शाळा-महाविद्यालयात त्याचे महत्त्व वाढतच चालले आहे. राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धादेखील होतात. कबड्डी ला मर्दानी खेळ देखील म्हटले जाते म्हणून मला कबड्डी खेळ खूप आवडतो आणि माझा आवडता खेळ हा कबड्डी आहे.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हा होता माझा आवडता खेळ मराठी निबंध आम्ही या लेखामध्ये तुम्हाला ३ लोकप्रिय खेळांविषयी निबंध दिले ज्याचा वापर तुम्ही आपल्या शालेय निबंध लेखनासाठी करू शकता. आम्ही आशा करतो कि आम्ही लिहिलेले हे तिन्ही हि निबंध तुम्हाला आवडले असतील. जर तुम्हाला हे निबंध आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला माझा आवडता खेळ मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमच्या गोड कमेंट मुळेच आम्हाला असेच निबंध लिहिण्यासाठी ऊर्जा मिळते. जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments