गौ मातेचा भक्त रामसिंह मराठी गोष्ट | Marathi Gosht

मित्रांनो आज आपण बघणार आहोत गौ मातेचा भक्त रामसिंह मराठी गोष्ट आपल्या भारत देशामध्ये गाई ला माता मानलं जात गाईची पूजा करतात परंतु काही ठिकाणी याच गाईची हत्या देखील केली जाते. आज आपण त्यावरच आधारित गोष्ट बघणार आहोत गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया गौ मातेचा भक्त रामसिंह मराठी गोष्ट.

गौ मातेचा भक्त रामसिंह

सबलगडच्या तहसिलदारच्या फाटका जवळ रहिम बसला होता. त्यावेळी आतून रामसिंह शिपाई एक चपाती आणि खीर घेऊन बाहेर येत होता.

रहिम-: अरे रामसिंह, ही चपाती आणि खीर घेऊन तू कुठे जातोस?

रामसिंह-: हा नैवद्य आहे. रहिम -: म्हणजे काय?

रामसिंह-: आम्ही ज्यावेळी चपाती बनवतो त्यावेळी पहिली चपाती गायीला देतो. त्याला नैवेद्य म्हणतात.

रहिम-तू चपाती खाल्ली का?

रामसिंह-: प्रथम आम्ही गायीला खाऊ घालतो. गायीने खाल्ल्यावर मी चौकात पाय ठेवतो.

रहिम-: तुम्ही गायीला माता का मानतात?

रामसिंह-: माता माता नव्हे तर जगन्माता. तुमच्या मुसलमान धर्मात सांगितले आहे की पृथ्वी गायीच्या शिंगावर उभी आहे.

रहिम-: तुझा इष्टदेव कोणता? तुम्ही त्याची पूजा कशी करतात.

रामसिंह-: माझी इष्टदेवता गाय आहे. मी गायीची पुजा करतो.

रहिम-: आज तुझी गाय भक्ती पाहिली जाईल.

रामसिंह-: कशी?

रहिम-: तुला माहितच आहे की तहसिलदार कलेक्टर, पोलीस चौकीचा ऑफिसर, दिवाण आणि काही शिपाई मुसलमान आहेत

रामसिंह-: हे मी जाणतो.

रहिम- या जिल्हयाच्या ठिकाणी पोलीस चौकीपण आहे. माहित आहे ना ?

रामसिंह -: माहित आहे.

रहिम-: जिल्ह्याच्या कचेरीत व पोलीस चौकीमध्ये मोकळी जागा आहे. त्याठिकाणी गायीची हत्या केली जाईल.

रामसिंह-: कोणत्या वेळेला?

रहिम-: रात्री बारा वाजता.

रामसिंह-: अकरा वाजल्यापासून माझा पहारा आहे.

रहिम-: म्हणजे तु तुझ्या डोळ्यासमोरच गोमातेची हत्या झालेली पाहशील.

रामसिंह-ही गोष्ट कारकूनानी सगळीकडे पसरवली आहे की आज रात्री गोहत्या तहसिहदाराच्या कचेरी समोरील मोकळ्या जागेत होणार आहे.

रहिम-: होय! ठाकूरसाहेब, पोलीस ऑफिसर मुसलमान आहेत ही गोष्ट निश्चित झाली आहे.

रामसिंह-: माझ्यासमोर गोहत्या ही गोष्ट अशक्य आहे.

हिम-: मी स्वतःच्या हातानी गायीच्या गळयावर सुरी मारणार आहे.

रामसिंह-:मग तु डोक्यावर कफन बांधून ये.

रहिम-: पाहूया की तू काय करशील ते?

रात्री अकरा वाजता रामसिंह शिपाई पोलीसाचे कपडे घालून हातात भरलेले पिस्तुल घेऊन खजिन्याचा पहारा करण्यासाठी गेला तेव्हा त्याला त्या ठिकाणी आणखी बारा बंदुका ठेवलेल्या दिसल्या. पाच गावांत गस्त घालणारे शिपाई आणि सात पोलीस चौकीचे शिपाई येऊन त्यांनी भरलेल्या बंदुका आणि पिस्तुले हातात घेतली.

अर्ध्या तासानंतर एक तरुण मुलगा आणि सुंदर गाय घेऊन रहिम आला. त्याने अंगणात एका खुंटयावर गायीला बांधले आणि सुरीची धार काढू लागला.

अंगणात खुर्च्या टाकलेल्या होत्या. कलेक्टर, तहसिलदार, पोलीस ऑफिसर आणि दिवाण लोक खुर्च्यांवर बसले होते. शहरातील श्रीमंत प्रतिष्ठित मुसलमान पण येऊन बसले. सर्व मिळून चौदा होते. शिपाई त्यांच्या मागे होते. नंतर मौलवीने उभा राहून देवाची (अल्लाची) प्रार्थना वाचली. सुरी घेऊन रहिम पुढे आला.

रामसिंह-: खबरदार रहिम खबरदार

रहिम -: काय बोलतोस

रामसिंह-: चुकूनहीं गाईला हात लावू नकोस.

रहिम-: गप्प बैस.

रामसिंह-: तहसिलदार साहेब, हा जिल्हा फक्त मुसलमानांचा नाही तर त्याच्यात हिन्दू लोकपण राहतात समजले.

तहसिलदार-: याचा अर्थ?

रामसिंह-याचा अर्थ असा आहे की या जिल्हयात गोहत्या होत नाही.

तहसिलदार-माझा हुकूम आहे.

रामसिंह-: तुमच्या हुकूमाला किंमत नाही. कलेक्टर हुकुम दाखवा.

तहसिलदार-: माझ्या गावाचा म्हणजेच जिल्ह्याचा मी कलेक्टर आहे. सबलगडाचा मी पंचम जॉर्ज आहे समजले.

रामसिंह-: जरी तुम्ही परमेश्वर असता तरी माझ्यासमोर गोहत्या होऊ देणार नाही.

पोलीस ऑफिसर-: होणार होणार माझ्यासमोर हत्यार ठेवून तू तहसिलदार ऑफिसच्या बाहेर जा.

रामसिंह-:माझे हत्यार कोण घेईल?

पोलीस ऑफिसर मी

रामसिंह -: या, खेचून घ्या.

दिवाण -:काय तुझ्यावर संकट कोसळले रामसिंह, ऑफिसरशी तू असा बेजबाबदारपणे वागतो.

रामसिंह-: कोणत्या वेडयाने त्याला ऑफिसर बनवले. लोकांचे मन दुखविण्याचे ऑफिसरचे काम नाही.

पोलीस ऑफिसर-: रहिम, तु तुझे काम कर. इस्लाम धर्म न मानणाऱ्याला बडबडू दे. रहिमने गाई जवळ जाऊन सुरा उंच केला. त्याचवेळी रामसिंहच्या पिस्तुलातून गोळी उडाली आणि रहीम जमिनीवर पडला.

पोलीस ऑफीसर-: पकडा पकडा. रामसिंहने दुसरी गोळी पोलीस ऑफीसरच्या छातीवर मारली. हाय बोलून तो सुध्दा जमिनीवर कोसळला. तहसिलदार उठून पळू लागला. रामसिंहने रिकामे पिस्तुल टाकले आणि भरलेली दुसरी पिस्तुल लगेच उचलली.

रामसिंहम्हणाला,”कोठे जातो जॉर्ज पंचम जॉर्ज, तू आपल्या कलेक्टरीचा अनुभव घे. असे बोलून रामसिंहने पिस्तूलाचा घोडा दाबून गोळी तहसिलदारावर झाडली. गोळी तहसिलदाराच्या डोक्याला लागली. तो लगेच जमिनीवर कोसळला.

याच्यानंतर धावाधाव सुरू झाली. रामसिंहला विश्रांती कुठली, त्याच्या पिस्तुलातून गोळया उडत होत्या. नेम अचूक असल्यामुळे भराभर अकरा माणसे मारली गेली आणि प्रेताचा ठिग जमू लागला. त्याच्यानंतर रामसिंहने गोमातेला नमस्कार केला आणि तिला सोडली, ती धावत बाहेर गेली त्याचवेळी रामसिंहने एक गोळी आपल्या छातीवर मारून तो खाली कोसळला. सकाळ झाली ही बातमी साऱ्या शहरभर पसरली. हिन्दू लोकांनी रामसिंहसाठी शोकसभा बोलवली. एका शेटजीनी पाचशे रुपयांची शाल त्याच्यावर टाकली. चार साधुंनी प्रेताला खांदा लावला. शहरातील मिठाईवाल्यांनी बत्तासे जमा केले आणि सोन्याच्या पेटीवाल्यानी पैसे आणि लाह्या जमा केल्या, माळी लोकांनी फुले गोळा केली. ज्यावेळी प्रेतयात्रा सुरू झाली त्यावेळी पुढे गोहत्या होणारी गाय होती. तिला सजवलेले होते. पाठीमागे शंख, घंटा आणि घडयाळयाचा आवाज होऊ लागला. रस्त्यामध्ये फुले, बत्तासे, पैसे आणि लाहया ओवाळून टाकू लागले. या प्रेतयात्रेत काही मुसलमान, खिश्चन लोकही सामील होते.

स्मशानात प्रेत उतरवले त्यावेळी महम्मद आणि सौदागरांनी गुलाबाची फुले वाहिली आणि हजरत महम्मद साहेब म्हणाले,”कुराणांत लिहीले आहे की त्या जनावरांना मारू नये ज्याचा उपयोग मनुष्य जातीला होतो. बादशाह अकबर आणि बादशाह जहांगिरने कायदयाने गोहत्या बंदी केली होती. खेदाची गोष्ट ही आहे की आमच्यातील कडवट मुसलमान हिन्दू भावंडाची मने दुःखी करण्यासाठी गोहत्या करतात. मी त्यांचा धिक्कार करतो. खिश्चन धर्माचे पाद्री होते. त्यांनी सांगितले “इंग्रज सरकारला गोहत्या करायची होती तर विलायतेत गोहत्या झाली असती परंतु तेथे त्याचे नामोनिशाण नाही आहे.” विलायतेत शेतकरी गायी पाळतात. पण खेदाची गोष्ट आहे की चामडयाचा व्यापार करण्यासाठी गोहत्या केली जाते. रामसिंहच्या शौर्याबद्दल मी त्याची खूप प्रशंसा करतो. सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी रामसिंहाच्या मुलाबाळांसाठी काही वर्गणी गोळा करावी. त्यावेळी पंधरा हजार गोळा करण्याचे ठरले. दयाळू महम्मदअली साहेबांनी तीन हजार आणि पाद्री साहेबांनी एक हजार रुपये दिले.

ही सत्य घटना आहे. फक्त नावे बदललेली आहेत.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती गौ मातेचा भक्त रामसिंह मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते.आम्ही आशा करतो कि तुम्हाला गौ मातेचा भक्त रामसिंह मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

Leave a Comment