क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध । Marathi Nibandh
आज आपण बघणार आहोत क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध. मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीच आहे कि आजच जग हे इंटरनेटच जग आहे. जर इंटरनेट आणि मोबाईल नसला तर लोकांची दशा होते मोठ्या माणसांपेक्षा आजकालच्या पिढीतले लहान मुलं हे जास्त मोबाईल चा वापर करतात. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल व इंटरनेट नव्हतं तेव्हा सर्व मुलं हि एकत्र जमून मैदानी खेळ खेळायचे ज्याने त्यांचं मनोरंजन व्हायचं आणि आरोग्य पण चांगलं राहायचं परंतु आजच्या पिढातल्या मुलांना मैदानी खेळ काय असता हे माहितीच नसत ते घरात बसूनच आपल्या मोबाईल वर ऑनलाईन गेम खेळात असता ज्याच्याने त्यांचं आरोग्य हे चांगलं राहत नाही.
म्हणून आम्ही मुलांसाठी क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत. कारण आजच्या काळातील मुलांना मैदानी खेळ काय असतात हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला शाळेत देखील या विषयावर निबंध तयार करून आणण्यास सांगितलं जातो आपण या निबंधाचा सराव करू शकता. तुम्हाला जर असेच निबंध आणखी पाहिजे असतील तर आमच्या वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला नक्की ऑन करा कारण आम्ही असेच निबंध आणि शाळेशी संबंधित साहित्य तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. चला तर मग बघूया क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध.
क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध
मी एक शाळेचे क्रीडांगण आहे. माझ्या एका बाजूला एक भव्य इमारत उभी आहे. ती अतिशय आकर्षक स्वच्छ व सुंदर आहे. ती माझी शाळा आहे. माझ्या दुसऱ्या बाजूला एक लहानसा विविध रंगांच्या फुलांनी सजलेला बगिचा आहे. मागे झाडे आहे आणि समोर माझ्याकडे येण्याकरिता छानसा रस्ता आहे.
शाळेतील माझी मुले माझ्या अंगाखांद्यावर खेळतात. ते माझी खूप निगा राखतात. ही मुले आणि रखवालदार माझी झाडपूस करून मला स्वच्छ ठेवतात. माझ्यावर पाणी शिंपडतात. माझ्या अंगावर एकही कागदाचा चिटोरा दिसणार नाही किंवा खडाही दिसणार नाही. याची काळजी घेतात. माझ्या अंगावर उंच-सखल भाग कुठेच नाही. माझ्यावर रोलर फिरवून माझा सपाटपणा व्यवस्थित ठेवला जातो. माझी मुले माझ्याजवळ,विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळतात.
कुणी क्रिकेट, कुणी फूटबॉल, कुणी हॉकी, कुणी बास्केटबॉल असे कितीतरी खेळ खेळले जातात. कुणी कबड्डी आणि कुणी खो- खो खेळतात. मुलांप्रमाणेच मुलीही खेळतात पण खेळणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असते. एन.सी.सी. ची परेड होते तेव्हा माझा रुबाब पाहावा. मुलांचे काय आणि मुलींचे काय गणवेश फारच उठून दिसतात.. त्यातच त्यांचे शिस्तबद्ध आणि लयबद्ध संचलन पाहन तर डोळ्यांचे पारणे फिटते.
मुले माझी एवढी निगा राखतात की कितीतरी राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा भरविण्याचा मान मला मिळतो. राज्यातील अनेक प्रदेशातून खेळाडू मुले व मुली या स्पर्धांसाठी येत असतात. काहींना सुवर्ण, काहींना रौप्य तर काहींना कास्य पदक मिळते. हा सोहळा अपूर्व असतो. जेव्हा माझ्या शाळेतील खेळाडूंना पदक मिळते तेव्हा माझा उर अभिमानाने भरून येतो कारण या खेळाडूनी माझ्याच अंगाखांदयावर खेळाचा सराव करून कौशल्य प्राप्त केलेले असते. रात्रीच्या शांत वेळी मी चिंतन करतो. मला जाणवते की माझ्या या मुलामधूनच ऑलिम्पिकस्मध्ये पदक मिळवणारे खेळाडू निर्माण होणार आहेत.
परंतु आजच्या पिढीतले मुलं मला विसरले आहेत त्यांना हे माहितीच नाही कि माझ्यावर कोणते खेळ खेळले जातात. पूर्वीच्या काळचे मुलं माझ्या अंगावर खेळायचे त्याने त्यांचा व्यायाम व्हायचा आणि ते सगळे निरोगी राहायचे परंतु आजच्या काळचे मुलं हे घरातच खेळ खेळतात आणि ते पण आपल्या मोबाईल फोन वर ते असे खेळ खेळतात ज्याने त्यांच्या शरीराची हालचाल तर होतच नाही परंतु अनेक रोगांना त्यांना जरूर समोर जावं लागत. माझ्या अंगावर येऊन क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी हे खेळ खेळणं कुठेतरी नाहीस होत चाललं आहे. मी क्रीडांगण बोलतोय आणि माझी सर्व मुलांना अशी विनंती आहे कि त्यांनी येऊन माझ्या अंगावर खेळावं जेणे करून त्यांचं शरीर हे निरोगी राहील आणि मला खात्री आहे कि मुलं माझं नक्की ऐकतील.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा ज्याने त्यांना देखील क्रीडांगणाचे महत्व समजेल सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेषण बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.