ऑनलाईन पैसे कसे कमवावे | इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कसे कमवावे
मित्रांनो आज आपण बघणार आहोत ऑनलाईन पैसे कसे कमवावे. पैसे हे सगळ्यांना हवे असतात कारण एक सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पैसे हि फार महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याकडे पैसे असतील तरच आपण एक आनंदी जीवन जगू शकतो. खूप साऱ्या लोकांना पैसे कमवण्याची इच्छा असते परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते या सर्व गोष्टींपासून वंचित राहतात. पैसे कमावण्याचे खूप सारे मार्ग आहेत परंतु वाढत्या तंत्रज्ञानामुळे फसवणूकहि तितकीच होते म्हणून आपल्याला योग्य त्या मार्गाची निवड करता आली पाहिजे. खूप लोक असे आहेत कि एखादी नौकरी करून किंवा छोटा-मोठा व्यवसाय करून पैसे कमवतात आणि खूप सारे लोक असे आहेत जे इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवतात.
आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न नक्की आला असेल कि इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कसे कमवावे ? तर तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलेलो आहोत या लेखामध्ये तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे १० सोपे मार्ग सांगितले आहेत ज्यांचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमाऊ शकता. याच्यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल फोन आणि एक चांगलं इंटरनेट कनेक्शन असं आवश्यक आहे. चला तर मग बघूया ते ऑनलाईन पैसे कमावण्याचे १० मार्ग कोणते आहेत. लेख आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
मोबाईल वरून पैसे कमवण्यासाठी आवश्यक गोष्टी
- तुमच्याकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे.
- तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- आपल्याकडे सरकारी बँक खाते असले पाहिजे जे आपल्या मोबाइल नंबरशी जोडलेले आहे.
- आपल्याकडे शासकीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे जेणेकरून लॉगिनच्या वेळी समस्या उद्भवू नये.
- आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग बद्दल पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
मोबाइलवरून पैसे कसे कमवायचे?
1. YouTube चॅनल
YouTube चॅनलच नाव ऐकल्या नंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल कि YouTube चॅनल बनवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी आपल्याकडे लॅपटॉप किंवा एक चांगल्या पद्धतीचा कॅमेरा असणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही तुमच्या स्मार्टफोन च्या मदतीने देखील YouTube चॅनल बनवू शकता आणि व्हिडीओ शूट करून अपलोड करू शकता.
तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या मोबाईल फोनच्या मदतीने एक YouTube चॅनल बनवायचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ज्या विषया संदर्भात व्हिडीओ बनवणार आहेत त्याच विषया संदर्भात तुम्हाला आपल्या YouTube चॅनल च नाव ठेवायचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही टेक्नॉलॉजिशी समंधित व्हिडीओ बनवत आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनल च नाव हे देखील त्याच विषया संदर्भात द्यायचं आहे.
जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो कि YouTube वरून पैसे हे गूगल ऍडसेन्स च्या माध्यमातून मिळतात आणि त्याच्यासाठी YouTube चा एक क्रायटेरिया आहे जो आपल्याला पूर्ण करावा लागतो. ज्यामध्ये आपल्या YouTube चॅनल वर १ हजार स्बस्क्राइबर, ४००० तासाचा वॉच टाइम आणि १०,००० पब्लिक व्हिवा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तर तुमचं चॅनल हे YouTube तर्फे मॉनिटाइज केलं जाईल आणि त्या नंतर तुम्ही तुमच्या YouTube चॅनल च्या माध्यमातून पैसे कमाऊ शकता.
2. Blogging च्या माध्यमातून
जर तुम्ही ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग शोधात असाल तर ब्लॉगिंग हा त्यावरचा योग्य पर्याय आहे परंतु या साठी तुम्हाला एक लॅपटॉप ची आवश्यकता पडेल. आपण बर्याच वेळा ऐकले असेल की लॅपटॉप किंवा संगणकाच्या सहाय्याने ब्लॉगिंगद्वारे लोक चांगले पैसे कमवू शकतात. जर तुम्ही लॅपटॉप घेऊ शकत नाही तर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा टॅबलेट घेऊन त्याला कीबोर्ड आणि माउस जोडून देखील ब्लॉगिंग करू शकता. यासाठी आपल्याला स्वतःची वेबसाइट तयार करण्याची आवश्यकता असेल.
जर तुम्हाला वेबसाईट बनवता येत नसेल तर तुम्ही एखाद्या वेब डेव्हलपर कडून वेबसाईट बनून घेऊ शकता. वेबसाईट बनवल्या नंतर तुम्हाला त्या वेबसाईट वर रोज आर्टिकल लिहायचे आहेत. तुम्ही ज्या विषयाशी संबंधित वेबसाईट चालू केली आहे त्या विषयाशी संबंधित आर्टिकल तुम्हाला रोज लिहून आपल्या वेबसाईट वर अपलोड करायचे आहेत. तुम्ही blogger.com किंवा wordpress वर आर्टिकल लिहू शकता.
तुम्हाला जर ब्लॉगिंग मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला नवीन विषयावर ब्लॉग लिहावे लागतील. तुम्हाला असे विषय शोधावे लागतील ज्यावर आधी कोणीच ब्लॉग लिहिला नसेल. असं केल्याने तुमचं कॉम्पिटिशन हे कमी होईल आणि तुमचे आर्टिकल हे लवकर रँक ला येतील. जेव्हा तुमच्या ब्लॉग वर ट्राफिक यायला सुरु होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या वेबसाईट ला गूगल एडसन सोबत जोडायचं आहे. गूगल एडसन जोडल्यानंतर जितके जास्त लोक तुमच्या वेबसाईट वर येतील तितके जास्त तुम्ही पैसे कमवाल.
3. Affiliate Marketing
मित्रांनो तुम्ही Affiliate Marketing विषयी नक्की ऐकलं असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का कि Affiliate Marketing च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे? Affiliate Marketing चा अर्थ काय होतो ? जर नाही माहिती तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि इंटरनेट वर खूप साऱ्या ई-कॉमर्स वेबसाईट उपलब्ध आहेत उदाहरणार्थ अमेज़ॉन , फ्लिपकार्ट , शॉपक्लूज या सगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.
तर या सर्व वेबसाईट आपला एक अफिलिएट प्रोग्रॅम रन करतात आपणही या प्रोग्रॅम चे सदस्य बनू शकतो आणि या प्रोग्रॅमची सदस्यता हि अगदी मोफत असते. जर तुम्ही एकदा या प्रोग्रॅम चे सदस्य बनलात तर तुम्ही या वेबसाईट वर उपलब्ध सगळे सामान हे विकू शकता. तुम्हाला फक्त कोणत्याही प्रोडक्ट ची अफिलिएट लिंक सोशल मीडिया वर शेयर करायची आहे जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या त्या लिंक वर क्लिक करून प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला त्याच्यासाठी त्या वेबसाईट कडून कमिशन दिल जात.
तुम्ही ज्या प्रोडक्ट ला विकणार आहेत त्या प्रोडक्ट ची तुम्हाला अफिलिएट लिंक बनवायची आहे आणि ती लिंक आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेयर करायची आहे जसे कि फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ती लिंक तुम्हाला शेयर करायचीय आहे. तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपले ग्रुप देखील बनवू शकता आणि त्या ग्रुप्स वर देखील या लिंक शेयर करू शकता.
तुम्ही या विषयाशी संबंधित आपलं एक YouTube चॅनल देखील बनवू शकता ज्याने तुम्हाला आणखी जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. YouTube चॅनल बनवून झाल्यावर तुम्ही ज्या प्रोडक्ट वर व्हिडीओ बनवणार आहेत त्या प्रोडक्ट ची अफिलिएट लिंक तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा उपयोग करून अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून लाखो रुपायी कमाऊ शकता.
4. Mobile App च्या साहाय्याने
मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या सोशल मीडिया ऍप चा वापर करत असाल आणि तुमच्या मोबाईल फोन मध्ये खूप सारे सोशल मीडिया अप्लिकेशन असतील उदाहरणार्थ फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, टेलिग्राम, शेयरचॅट इत्यादी. परंतु तुम्ही आज पर्यंत या सगळ्या ऍप चा वापर फक्त मनोरंजनासाठी करत आला आहेत.
परंतु तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या ऍप चा वापर करून तुम्ही पैसे देखील कमाऊ शकता. जर तुम्हाला माहिती नाही कि या ऍप चा वापर करून पैसे कसे कमवायचे तर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. चला तर मग बघूया कि मोबाईल ऍप च्या साहाय्याने पैसे कसे कमवायचे.
1. TELEGRAM –
जर तुम्ही टेलिग्राम चा वापर करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि हे ऍप कशा पद्धतीचं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो कि टेलिग्राम हे व्हाट्सअप प्रमाणे एक मेसेंजिंग ऍप आहे ज्याचा वापर तुम्ही इत्तर लोकांशी बोलण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी करू शकता. चला तर मग बघूया कि Telegram ऍप वरून पैसे कसे कमवता येतील.
परंतु कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पैसे कमावण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे फॉलोवर. जेवढे जास्त तुमचे फॉलोवर असतील तेवढे जास्त पैसे कमवण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे फॉलोवर वाढवायचे आहे. फॉलोवर वाढवण्यासाठी तुम्ही रोज नवीन कन्टेन्ट अपलोड करू शकता असं कन्टेन्ट जे लोकांना आवडेल आणि ते रोज बघण्यासाठी लोक तुम्हाला फॉलो करतील.
फॉलोवर वाढल्या नंतर तुम्ही प्रमोशन च्या माध्यमातून पैसे कमाऊ शकता दुसऱ्या व्यक्तींचे युट्युब, इंस्टग्राम, फेसबुक अकाउंट प्रमोट करू शकता किंवा एखाद्या ब्रँड चे प्रमोशन करू शकता. जर तुमचे फॉलोवर जास्त वाढले तर तुम्हाला स्पॉन्सरशिप देखील मिळू शकते.
2. INSTAGRAM –
तुम्ही इंस्टाग्राम हे नाव खूप वेळा ऐकले असेल कदाचित तुम्ही इंस्टाग्रामचा वापर देखील करत असाल, परंतु तुम्ही आता पर्यंत इंस्टाग्रामचा वापर हा केवळ मनोरंजनासाठी केला असेल म्हणून तुम्हाला हि गोष्ट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे कि इंस्टग्राम च्या साहाय्याने पैसे कसे कमवायचे.
या ऍप वर देखील तुम्हाला सगळ्यात आधी तुमचे फॉलोवर वाढवायचे आहे, जेवढे जास्त तुमचे फॉलोवर असतील तेवढेच जास्त पैसे कमावण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. फॉलोवर वाढण्यासाठी तुम्हाला इंस्टग्रामवर एखादे पेज ओपन करायचे आहे. आणि त्या पेज वर चांगले-चांगले कन्टेन्ट अपलोड करायचे आहे. फॉलोवर वाढल्यानंतर तुम्ही दुसरे इंस्टाग्राम अकाउंट प्रमोट करू शकता किंवा एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट करू शकता.
जर एकदा तुमचे फॉलोवर वाढले तर कंपनी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करेल त्यांच्या प्रोडक्ट ला प्रमोट करण्यासाठी, एवढंच नाही तर तुम्हाला एखाद्या कंपनीची स्पॉन्सरशिप देखील मिळू शकते. काही अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम च्या माध्यमातून पैसे कमाऊ शकता.
3. FACEBOOK –
फेसबुक ऍप वर देखील सेम गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिली पाहिरि म्हणजे फॉलोवर वाढवणे. फेसबुक वर तुम्ही तुमचं एखाद पेज ओपन करू शकता. पेज ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या विषयावर पेज ओपन केलं आहे त्याच विषयावर तुम्हाला कन्टेन्ट अपलोड करायचे आहे. आणि त्याच संदर्भातील ऑडियन्स ला तुम्हाला टार्गेट करायचं आहे.
तुम्ही फेसबुक वर असे बरेच अकाउंट पहिले असतील ज्यांचे लाखो फॉलोवर आहेत आणि जर आपण त्यांना त्यांच्यासोबत जुडण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली तर ते आपली रिक्वेस्ट एकसेप्ट करत नाहीत तर या मागे काय कारण आहे? तर या मागे कारण असे कि ते लोकं त्यांच्यासोबत जुडण्यासाठी पैसे घेतात.
तुम्ही बघितलं असेल जर आपण त्या व्यक्तीला आपला फोटो टॅग केला तर आपल्याला देखील हजारो लाईक येतात हेच कारण आहे कि लोकांना त्यांच्या सोबत जुडायचं असत. म्हणून तुम्ही देखील फॉलोवर वाढवून अशा प्रकारे पैसे कमाऊ शकता. आणि दुसरा इनकम सोर्स म्हणजे प्रमोशन या दोन मार्गाने तुम्ही पैसे कमाऊ शकता.
5. Content Writing
मित्रांनो जेव्हा आपण स्वतःसाठी लेख लिहितो आणि ते लेख आपण आपल्या स्वतःच्या वेबसाईट वर पोस्ट करतो तर त्याला आपण ब्लॉगिंग म्हणतो, आणि जर तेच लेख आपण दुसऱ्यांसाठी लिहिले तर त्याला आपण म्हणतो Content Writing खूप सारे अशे लोकं असतात कि ज्यांना कन्टेन्ट रायटर ची आवश्यकता असते. तर तुम्ही दुसऱ्यांसाठी कन्टेन्ट लिहून Content Writing चे काम करू शकता.
कन्टेन्ट रायटर चे काम हे दोन प्रकारचे असते एक फुल टाइम कन्टेन्ट रायटर आणि एक पार्ट टाइम कन्टेन्ट रायटर, तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कन्टेन्ट रायटर चे काम शकता. आजकाल खूप सारे लोकं या गोष्टीचा फायदा घेत आहेत काही लोकं आपलं दिवसभराचं काम करून पार्ट टाइम हे काम करतात, तर काही लोकं फुल टाइम हे काम करतात.
हे काम करून तुम्ही दिवसाचे एक हजार ते दोन हजार रुपये आरामात कमाऊ शकता. जर तुम्ही तुमच्या ग्राहकाला चांगले काम करून देत असाल तर तो पुन्हा-पुन्हा तुमच्याकडे येईल. म्हणून तुम्हाला चांगल्या दर्जाचे लेख लिहायचे आहे आणि पैसे चार्ज करायचे आहे.
हे काम करण्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट गूगल वर उपस्थित आहेत तुम्ही त्या वेबसाईट वर आपले खाते बनवू शकता. तुम्ही जितके चांगले काम कराल तितकी तुमची प्रोफाइल चांगली बनेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त काम मिळू शकेल.
6.Freelancing
मित्रांनो जर तुम्हाला फ्रिलांसींग सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर फ्रिलांसींग म्हणजे आपण कुठल्याही एका कंपनीसाठी काम करत नाहीत. आपण विविध प्रकारच्या वेग-वेगळ्या कंपन्यांसाठी काम करतो. फ्रिलांसींग हि एक वेबसाईट आहे जिथे तुम्हाला वेग-वेगळ्या प्रकारचे ऑनलाईन काम दिले जाते.
आपण फ्रिलांसींग या बद्दल खूप वेळा ऐकले असेल. या वेबसाईट च्या माध्यमातून लोकं घर बसल्या लाखो रुपये महिन्याचे कमवत आहेत. काही लोकांनी फ्रिलांसींग वर आपली स्वतःची कंपनी देखील सुरु केली आहे. चला तर मग बघूया कि आपण फ्रिलांसींग वरून पैसे कशा प्रकारे कमाऊ शकतो.
तुम्हाला सगळ्यात आधी फ्रिलांसींग वेबसाईट वर जाऊन स्वतःची एक प्रोफाईल तयार करायची आहे. जर तुम्ही एक रायटर असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या प्रोफाईल वर तुमचे काही आर्टिकल अपलोड करायचे आहेत, जर तुम्ही वेबसाईट डिझाइनर असाल तर तुम्ही डिजाईन केलेली एखादी वेबसाईट तुम्हाला शेयर करायची आहे, जर तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा असेल तर तुमच्या आवाजाचे काही सॅम्पल तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वर अपलोड करायचे आहेत. ज्याने लोकांना समजेल कि तुमचं काम अशा प्रकारे आहे. काही अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे.
तुम्हाला या वेबसाईट सोबत कायम जुडून राहायचे आहे. सुरुवातीच्या काळात तुम्हाला काम मिळण्यात थोडा वेळ लागेल पण जर काम मिळाल्यावर तुम्ही ते काम योग्य रित्या पूर्ण केले तर तुम्हाला आणखी नवीन काम मिळतील.जर आपण भारताच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्हाला प्रत्येक शब्दाचे २ रुपये मिळतात जर तुम्ही एक चांगलं कन्टेन्ट तयार केलं तर तुम्हाला एका कन्टेन्ट साठी ५००० रुपयापर्यंत मिळू शकतात.
तर मित्रांनो फ्रिलांसींग हा एक खूप चांगला मार्ग आहे ऑनलाईन पैसे कमवण्याचा. खूप सारे लोकं फ्रिलांसींग च्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहे. जर तुम्ही एक विद्यार्थी असाल तर तुम्ही हे काम पार्ट टाइम करून महिन्याचे हजारो रुपये कमाऊ शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
- तुम्हाला मेहनत करण्यासाठी तयार राहावे लागेल.
- ज्या क्षेत्रात तम्ही काम करणार आहेत त्या केशेत्राशी जुडलेले काही सॅम्पल तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वर अपलोड करायचे आहेत.
- तुम्हाला फ्रिलांसींग सोबत कायम जुडून राहायचं आहे आणि तुमची प्रोफाईल नेहमी चेक करायची आहे.
- तुम्हाला काम झाल्यावर आपल्या ग्राहकाकडून नेहमी फीडबॅक घ्यायचा आहे.
- तुम्हाला मिळालेले काम हे वेळेत पूर्ण करायचे आहे.
7. Reseller
मित्रांनो रिसेलिंग चा अर्थ होतो एखादी वस्तू कमी दारात विकत घेऊन तिला पुन्हा जास्त दारात विकणे. तुम्ही सुद्धा एक रिसेलर बनू शकता. तुम्ही होलसेल दारात सामान खरेदी करून त्याला पुन्हा जास्त दारात ऑनलाईन विकू शकता. अशा प्रकारे ऑनलाईन सामान विकण्यासाठी खूप साऱ्या इ-कॉमर्स वेबसाईट इंटरनेट वर उपस्थित आहेत. उदाहरणार्थ अमेज़ॉन आणि फ्लिपकार्ट.
खूप सारे लोक अशा पद्धतीने सामान खरेदी विक्री करत आहे. तुम्ही देखील रिसेलिंग चा बिजनेस करू शकता याला आपण इ-कॉमर्स चा बिजनेस देखील म्हणून शकतो आणि हा बिजनेस संपूर्ण भारतामध्ये खूप वेगाने पसरत चालला आहे. तुमच्या सोभोवताली खूप सारे अशे लोकं राहत असतील जे त्यांना लागणार सगळं सामान हे ऑनलाईन खरेदी करत असतील. कदाचित तुम्ही देखील सगळं सामान हे ऑनलाईन मागवत असाल, याच्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज भासत नाही.
आजकाल खूप सारे लोकं हे ऑनलाईन शॉपिंग ला महत्व देतात, ऑनलाईन शॉपिंग ची लोकप्रियता हि हि वेगाने वाढत चालली आहे. येणाऱ्या ३ ते ४ वर्षांमध्ये ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या हि ३ पटीने जास्त वाढणार आहे म्हणून जर तुम्ही आतच रिसेलिंग चा बिजनेस चालू केला तर तुम्ही येणाऱ्या काळात लाखो रुपये घर बसल्या कमाऊ शकता.
8. Link Shorting
जर तुम्हाला नसेल कि LINK SHORTING काय आहे तर मी सांगू इच्छितो कि या वेबसाईट मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रोडक्ट च्या किंवा व्हिडीओ च्या लिंक ला शॉर्ट करून दिली जाते. आणि आपण त्या लिंक च्या माध्यमातून पैसे कमाऊ शकतो. चला तर मग बघूया कि लिंक शॉर्टनर च्या मदतीने पैसे कसे कमवायचे.
आपल्याला सगळ्यात आधी कोणत्याही प्रोडक्ट ची लिंक कॉपी करायचे आहे आणि ती लिंक लिंक कोणत्याही चांगल्या URL शॉर्टनर वेबसाइट वर जाऊन पेस्ट करायची आहे. आता ती वेबसाईट तुम्ही टाकलेल्या मोठ्या लिंक ला शॉर्ट करून देईल. तुम्हाला ती लिंक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर किंवा आपल्या मित्रांसोबत शेयर करायची आहे.
आता जेवढे क्लिक तुम्हाला तुमच्या त्या शेयर केलेल्या लिंक वरून मिळतील तेवढेच जास्त तुम्ही पैसे कमाऊ शकाल. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल कि लिंक वर क्लिक केल्याने आपल्याला पैसे का मिळतील तर त्याच्या मागचे कारण म्हणजे आपण जी लिंक URL शॉर्टनर मध्ये टाकतो त्याच्या जागी URL शॉर्टनर आपल्याला दुसरी लिंक देत आणि त्या लिंक वर क्लिक केल्यावर कोणत्याही व्यक्तीला प्रोडक्ट पर्यंत पोहोचण्याच्या आधी एक ऍड पाहावी लागते.
जर एखाद्या व्यक्तीने ती ऍड पूर्ण बघितली तर त्याचा फायदा त्या URL शॉर्टनर वेबसाईट ला होतो तर ती URL शॉर्टनर वेबसाईट त्यातले काही पैसे तुम्हाला देते. कारण ते क्लिक त्यांना तुमच्यामुळे मिळतात. तर मित्रांनो ऑनलाईन पैसे कमावण्याचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे.
9. Ysense Website
मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल कि ysense काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ysense एक वेबसाईट आहे जी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. बघायला गेलं तर ysense वरून पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत. चला तर मग बघूया कि ysense वेबसाईट वरून पैसे कसे कमवायचे.
पहिला मार्ग आहे Surveys पूर्ण करून पैसे कमवण्याचा तुम्हाला या वेबसाईट वर दररोज नाव-नवीन सर्वे बघयला मिळतात. उदाहरणार्थ तुमची प्रोफाइल पूर्ण करा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या अशा प्रकारचे खूप सारे Surveys तुम्हाला दररोज बघायला मिळतात. तुम्हाला ते सर्व Surveys पूर्ण करायचे असतात जेवढा मोठा Surveys तुम्ही पूर्ण कराल तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतात.
दुसरा पर्याय आहे रेफर एंड अर्न चा जर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा इतर व्यक्तीला या वेबसाईट वर अकाउंट बनवण्यासाठी आमंत्रित केले तर आणि जर त्या व्यक्ती ने तुम्ही पाठवलेल्या लिंक च्या माध्यमाने येऊन अकाउंट बनवले तर तुम्हाला प्रत्येक अकाउंट साठी १५ रुपये दिले जातात. अशा प्रकारे तुम्ही ysense वेबसाईट च्या मदतीने घरी बसून ऑनलाईन पैसे कमाऊ शकता.
10. Google Pay
मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाइलला च्या प्ले स्टोर वर जाऊन Google Pay अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमची काही बेसिक माहिती भरायची आहे.
अकाउंट ओपन केल्यानंतर Google Pay वरून पैसे कमवण्याचा पहिला मार्ग म्हणजे स्क्रैच कार्ड. तुम्हाला तुमच्या मित्राला काही पैसे सेंड करायचे आहे. पैसे सेंड केल्यानंतर तुम्हाला त्याच्या बदल्यात एक स्क्रैच कार्ड दिले जाईल त्या स्क्रैच कार्ड चा वापर केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळतात.
google pay वरून पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे invite a friend जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला google pay डाउनलोड करण्यासाठी इन्व्हाईट केलं आणि जर तुमच्या त्या मित्राने तुम्ही पाठवलेल्या लिंक वरून जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ५० रुपये मिळतात. तुम्ही अशा प्रकारे आपल्या मित्रांना आमंत्रित करून google pay च्या साहाय्याने पैसे कमाऊ शकतात.
ऑनलाईन पैसे कसे कमवावे FAQ
घरी बसून पैसे कमवण्याचे मार्ग १) YouTube च्या माध्यमातून २) ब्लॉगिंग च्या माध्यमातून ३) अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून ४) ऑनलाईन कोर्स सेल करून ५) स्वतःचे प्रोडक्ट ऑनलाईन विकून.
Cash Boss एक चांगले आणि जुने ऍप आहे. आपण या ऍप च्या माध्यमातून कामवाल्या गेलेल्या पैशाला paytm wallet मध्ये ट्रान्स्फर करू शकता किंवा कमावलेल्या पैशाने आपला मोबाईल रिचार्ज देखील करू शकता. या ऍप मध्ये तुम्हाला refer and earn चा प्रोग्रॅम देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही चांगले पैसे कमाऊ शकता.
गावात राहणाऱ्या लोकांसाठी पैसे कमवण्याचे काही मार्ग – १) कुकूट पालन २) शेळी पालन ३) मत्स्य पालन ४) किराणा दुकान ५) जनरल स्टोर ६) जार चा व्यवसाय.
यूट्यूब वरून जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल वर कायम सक्रिय राहायचं आहे. चॅनल नवीन असे पर्यंत तुम्हाला दररोज व्हिडीओ अपलोड करायचे आहेत. तुम्हाला नवीन विषय शोधून त्यावर व्हिडीओ बनवायचे आहेत. जार तुम्ही चॅनल कडे जास्त लक्ष दिल तरच तुम्ही युट्युब वरून जास्त पैसे कमाऊ शकाल.
गेम खेळून रिचार्ज करण्यासाठी तुम्ही Gamezop ऍप वर रजिस्टर करू शकता. इथे तुम्हाला गेम खेळून रिचार्ज करण्यासाठी खूप सारे पर्याय दिले आहेत. म्हणून जार तुम्हाला गेम खेळून रिचार्ज करायचा आहे तर तुम्ही Gamezop ऍप वापरू शकता.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता ऑनलाईन पैसे कसे कमवावे. मी आशा करतो कि तुम्हाला हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवावे हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.