मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिकारी आणि बुलबुल मराठी गोष्ट या गोष्टींमध्ये बुलबुल नावाची एक पक्षी आहे जी आपल्या बुद्धीचा वापर करून शिकाऱ्याला फसवते हि गोष्ट अतिशय गंमतशीर आहे जी तुम्हाला नक्की आवडेल. गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अश्याच गोष्टी वाचण्यासाठी वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा चला तर मग बघूया शिकारी आणि बुलबुल मराठी गोष्ट.
शिकारी आणि बुलबुल
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एका बुलबुलने आपले खुप सुंदर घरटे बांधले होते. तिची दोन पिल्ले होती. ती फार लहान होती. बुलबुल आपल्या पिल्लांसाठी दररोज दाणे आणायची आणि दोघांना आळीपाळीने भरवायची. पिल्ले हळूहळू मोठी होऊ लागली.
काही दिवसानंतर पिल्लेसुद्धा आपल्या आई बरोबर जेवण शोधण्यासाठी जाऊ लागली आणि आई बरोबरच पुन्हा घरी येत असत.
काही दिवस लोटले. पिल्ले मोठी झाली होती. आता ती आपल्या आईशिवाय आपले जेवण आणण्यासाठी जात होती.
एकदा काय झाले दोन्ही पिल्ले बाहेर आपले जेवण शोधण्यासाठी गेली होती. अन्न शोधताना एका पिल्लाला मौल्यवान मोती मिळाला.
“ही बघ काय वस्तू आहे. आपण हयाला आईजवळ नेले पाहिजे. कदाचित ही कामाची वस्तू असेल.” एक पिल्लू दुस-याला म्हणाले.
“अरे सोड, ही काय कामाची वस्तू आहे? हयाने आपल्या पोटाची भूक भागणार नाही. तु ते फेकून दाणे शोध. उगाच चिंता करु नकोस.’ दुसरे पिल्लू म्हणाले.
नाही, मी तर याला आईजवळ जरुर नेणार मला तर वाटते हे जरूर आपल्या उपयोगी पडणार,
पहिले पिल्लु तेथून उडाले आणि मोती घेऊन आईजवळ येऊन म्हणाले, “आई, हे बघ! आज मला ही काय वस्तू मिळाली आहे.
“मुला, ही तर फार मौल्यवान वस्तु आहे. अशा वस्तू वेळेला फार उपयोगी पडतात असे सांगून बुलबुलने तो मोती आपल्या घरटयांत सांभाळून ठेवला.
एके दिवशी त्या जंगलात शिकारी आला. त्याने एका जागी खुप दाणे पसरवून ठेवले. बाजुलाच आपली जाळी काढुन ठेवली आणि थोड्याच अंतरावरच्या एका झाडाखाली जाऊन बसला. थोड्याच वेळात बरेचसे पक्षी शिकाऱ्याच्या जाळयात फसले. बुलबुलची दोन्ही पिल्ले सुध्दा शिकाऱ्याच्या जाळयात फसली.
आता काय करायचे? सगळे पक्षी एकत्र येऊन विचार करु लागले.
आपण शिका-्याला प्रार्थना करुया की आम्हाला तु या जाळयातून सोडून दे कारण आमची पिल्ले घरटयांत आमची वाट पाहत असतील. कदाचित आपली दया येऊन शिकारी आपल्याला सोडून देईल.” एक मैना बोलली.
“नाही शिकारी आपल्याला असे कधीच सोडणार नाही. हां, जर आपण त्याला एखाद्या मौल्यवान गोष्टीच आमिष दाखविले तर त्या मोहाने तो आपल्याला सोडेल.”
परंतु आमच्याजवळ अशी मौल्यवान वस्तु आहेच कुठे? फाख्ता पक्षी हैराण होऊन म्हणाला.
“आमच्याजवळ एक मौल्यवान मोती आहे. तो आमच्या आईने घराटयांत लपवून ठेवलेला आहे. जर आपण शिकायला तो दिला तर तो आपल्या सर्वांना सोडून देईल.” बुलबुलचे पिल्लू म्हणाले.
परंतू आपण तो मोती कसा काय आणणार?” पक्षी राणीला म्हणाले.
एक कबूतर अजून मोकळे आहे. पहा, तो त्या झाडावर बसलेला आहे. जर आपण त्याला बुलबुलच्या घरट्यातून मोती आणायला सांगितले तर तो आपली मदत करु शकेल. कोकीळा म्हणाली.
काही पक्ष्यांनी आवाज देऊन कबूतराला आपल्याजवळ बोलावले आणि सर्वकाही समजावून सांगितले. कबूतर लगेच त्यांच्या मदतीला तयार झाला. तिथून तो बुलबुलकडे आला आणि तिलाही सर्व गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली.
बुलबुलने मोती घेतला आणि ती कबूतराबरोबर तेथे आली जेथे सर्व पक्षी आणि तिची पिल्ले जाळ्यात अडकली होती. आता शिकारीसुद्धा आपल्या जाळ्यापाशी आला होता. बुलबुल शिका-याला म्हणाली, भाऊ, जर तुम्ही या सर्वांना आपल्या जाळ्यातून सोडले तर मी तुम्हाला अशी एक चस्तू देईन जी तुमच्या आयुष्यभर उपयोगी पडेल. शिकारी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अशी काय वस्तू आहे ती? हा मौल्यवान मोती. बुलबुल शिकाऱ्याला मोती दाखवित म्हणाली.
मोती पाहताच शिकाऱ्याचे डोळे दिपले. तो म्हणाला, हा तर खरोखरच मौल्यवान मोती आहे. तो मला दे. मी सर्वांना सोडून देईन.
परंतू बुलबुल मुर्ख नव्हती. मोती घेऊन शिकारी पक्ष्यांना सोडणार नाही. जर असे झाले तर पक्षीपण मरतील आणि मोतीपण जाईल.
बुलबुल म्हणाली,”तु पक्ष्यांना सोडून दे. जसे ते सर्व उडतील, मी हा मोती खाली फेकून देईन. शिकाऱ्याला माहित होते की पक्षी खोटे बोलत नाही. त्याने पक्ष्यांना सोडले. सर्व पक्षी दूरवर उडून गेले. तेव्हा बुलबुल म्हणाली,”तु दुसऱ्यांचे वाईट करतोस म्हणून मी तुला मोती देणार नाही. हा मोती फार महत्वपूर्ण आहे. तु निर्दयी आहेस. तुला कोणत्याही जीवाची दया येत नाही म्हणूनच मी पण तुझ्यावर दया करणार नाही. वाईटाला वाईट मिळाले पाहिजे. तुझी हिच शिक्षा आहे.’ येवढे बोलून बुलबुल मोतीसहीत आपल्या पिल्लांना घेऊन घरटयांकडे उडून गेली.
आता बुलबुलच्या दुसऱ्या पिल्लालापण समजले की प्रत्येक गोष्ट महत्वपूर्ण असते मग भले ती कशीही असो.
शिकारी निराश होऊन जाऊ लागला. त्याला या गोष्टीपासून धडा मिळाला होता की कोणावरही विश्वास करणे म्हणजे फसविणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हि होती शिकारी आणि बुलबुल मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जर आपण बघितलं कि कस त्या बुलबुलने आपल्या बुद्धीचा वापर करून त्या शिकाऱ्याला फसवलं म्हणून कोणालाही कधी कमी लेखू नये.आम्ही आशा करतो कि तुम्हाला शिकारी आणि बुलबुल मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.