स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध
मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध. जर आपण आईचे महत्व सांगायला गेलो तर कदाचित शब्द अपुरे पडतील आईचे वर्णन हे शब्दात केले जाऊ शकत नाही. आई आपल्याला लहान असल्यापासून सर्व गोष्टी शिकवते. सांगायला गेलं तर आई हीच आपली प्रथम गुरु असते कारण आपल्याला चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत सगळं आपली आईच शिकवते. आई शिवाय जीवनाची कल्पना करणं हे अशक्य आहे.
म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत Swami Tinhi Jagacha Aai Vina Bhikari Marathi Nibandh. या निबंधाद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि आई हि आपल्या आयुष्यात किती आवश्यक असते. लहान मुलांना शाळेत देखील हा निबंध विचारला जातो तर ते शालेय मुलं या निबंधाचा सर्व करू शकता. तुम्हाला जर आणखी निबंध हवे असतील तर ते सर्व निबंध या वेबसाईट वर उपलब्ध आहेत तुम्ही त्यांचा हि सर्व करू शकता चला तर मग बघूया स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध
आई प्रेमस्वरूप असते, वात्सल्यसिंधू असते. सर्व प्रेमाची गंगोत्री आईचे प्रेम
आहे. आई सर्व तीर्थांचे तीर्थ आहे.
सर्वांत पहिली गुरू आईच असते. पहिली पाठशाळाही तीच असते. चांगल्या सवयींची जडण-घडण आईमुळेच बालकास मिळते. कुटुंबाची संस्कारक्षम जबाबदारी ही तिचीच. मुलगा कितीही मोठा झाला, जगात त्याचे कितीही नाव झाले तरी आईला आनंदच होतो. आई ही करूणेची मूर्ती आहे. आपल्या आजारपणात सेवा शुश्रृषा आईच करते. बाळाला आपल्या कुशीत आईच झोपवते. जो पर्यंत बाळ आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून वातावरणाशी, समाजाशी जुळवून घेत नाही, तोपर्यंत आई त्याला सार्वत्रिक साथ देते. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापारशी.
असे म्हणतात ते खरेच आहे. घारीची आणि आईची अवस्था ही सारखीच. अगदी पहिल्या प्रथम मूर्ती आई ! ‘मातृदेवो भव ‘ जन्मताच मुलाला आईशिवाय कोणीही दिसत नाही.
आईचे महत्त्व विषद करतांना सहज आठवते ती फ. मु. शिंदे यांची ‘आई कविता. आई ही घरात गजबजलेल्या गावासारखी वाटते. उजेड देणारी वाटत असते, जी स्वतः जळते व इतरांना उजेड देते. ती राब राब राबते. ती सर्वांत असते तेव्हा तिचे महत्त्व जाणवत नाही. ती या जगाला सोडून गेल्यानंतर मात्र आई नाही असे म्हणण्याचे सामर्थ्य ही होत नाही. जातांना मात्र आई प्रत्येकाच्या मनात स्वतः बद्दल काही ना काही आठवणी ठेवून जाते. ती अशा आठवणी ठेवून जाते की, एका मनाचे.
दुसऱ्या मनाला कळायलाही मार्ग उरत नाही. आचार्य विनोबा भावे म्हणतात की, सर्वारंभी उंचात उंच अशी परमेश्वराची प्रतिमा आईच्याच रूपाने मुलांसमोर उभी राहते. उत्कृष्टातील उत्कृष्ट परमेश्वराची पूजा म्हणजे हीच मातृपूजा आहे. ईश्वराला ‘आई’ या नावाने हाक मारावी. आई या शब्दाशिवाय उच्च शब्द नाहीच.
आई खरोखरच काय असते हे सांगतांना फ. मु. शिंदे म्हणतात, आई ही लेकराची माय तर वासराची गाय असते, दुधावरची साय असते, अनाथाची नाथ असते, लंगड्याचा पाय असते.’
‘आई असते जन्माची शिदोरी जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध मी आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि आई आपल्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे देखील तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असतो जर तुम्हाला स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.