भुंग्यांची माळ मराठी गोष्ट | Marathi Gosht

मित्रांनो आज आपण बघणार आहोत भुंग्यांची माळ मराठी गोष्ट हि गोष्ट अतिशय प्राचीन काळातील आहे हि एक काल्पनिक गोष्ट आहे पण या गोष्टीतून शिकण्यासारखं देखील खूप आहे तुम्हाला हि गोष्ट नक्की आवडेल गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग बघूया भुंग्यांची माळ मराठी गोष्ट.

भुंग्यांची माळ मराठी गोष्ट

पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. अरुण नावाचा एक दैत्य होता. शक्तीने तो हजार हत्तींच्या बरोबर होता. त्याचा स्वभाव असुरी होता. एका दिवशी त्याने आपले गुरू शुक्राचार्याच्या तोंडून तपाचा महिमा ऐकला. तपोबळामुळे ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो, विष्णु सृष्टीचे पालन करतो आणि तपामुळे रूद्र संहार करतात. अशी जर तपाची थोरवी असेल तर असे तप का करु नये ज्याच्या जोरावर देवतांच्या चांगुलपणावर मात करता येईल. मनात हे विचार आल्यावर अरूण एकांतात हिमालयाच्या गंगा किनारी पोहचला आणि तप करू लागला.

सुरुवातीला त्याने सुकलेली पाने आणि गंगेचे पाणी पिऊन काही वर्षे काढली आणि गायत्रीचा जप करून, श्वास थांबवून आपली तपस्या उग्र केली. त्याच्या शरीरातून प्रचंड आगीचा लोट बाहेर पडला आणि त्यामुळे सर्व संसारातील वस्तुंची राख रांगोळी होऊ लागली. असा अद्भुत चमत्कार पाहून देवसुद्धा घाबरले तर जगात राहणारांची काय दशा वर्णावी. देव विचार करू लागले जर याच्या तपामुळे सृष्टी नाहीसी झाली, यज्ञाची समाप्ती झाल्यामुळे आम्ही दुर्बल होऊ लागलो तर दैत्य सहजच देवांवर विजय मिळविण्यात यशस्वी होतील.

आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी गायत्री देवीला घेऊन देवगण ब्रह्माजवळ गेले आणि प्रार्थना करु लागले की कोणत्याही प्रकारे तुम्ही त्या दैत्याला संतुष्ट करा नाहीतर आपत्ती कोसळेल.” ब्रह्माने देवतांचे बोलणे ऐकले आणि गायत्रीला बरोबर घेऊन त्या ठिकाणी पोहचले ज्या ठिकाणी आपल्या शंभर डोक्यांनी अग्नीचा पाऊस पाडणारा दैत्य डोळे बंद करून तपाला बसला होता. ब्रम्हाजी म्हणाले,”अरे भाऊ, डोळे उघड. तपाच्या सामर्थ्याने या सृष्टीची राख-रांगोळी का करतोस? ज्यात तुझे कल्याण होईल ते मागुन तपाची पूर्तता कर.” ब्रह्माचे सांत्वनपर शब्द कानी पडल्यावर त्याने प्रसन्नतेने डोळे उघडले. पाहिले तर हातात रुद्राक्षाची माळ घेऊन ओंकाराचा जप करत वेद मूर्ती ब्रह्मा समोर होते. लोभी अरुणचा विवेक नाहीसा होऊ लागला. त्याने फारच तप केले होते. एका श्वासात तो बोलला, मला येवढी शक्ती दया की अस्त्र-शस्त्र, पुरुष-रत्री, चार पायांच्या किंवा दोन पायांच्या प्राण्यांपासून मला मरण येऊ नये.

साधु पुरूषांची शक्ती दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठी होते तर दृष्ट लोकांची शक्ती साधु पुरुषांना त्रास देण्यासाठी असते. ब्रह्मदेवाकडून वर मिळविल्यामुळे अरुण बेभान झाला. पाताळांतील दैत्यांसह अमरावतीवर चालून गेला. घाबरून गेलेले देव बह्माजवळ परत गेले. परंतु ब्रह्माजवळ त्याचा नायनाट करण्याची शक्ती कोठे होती? देवताबरोबर ब्रम्हाजी शंकराकडे गेले. शंकरांनी त्यांची करुण कया ऐकली आणि विचार करू लागले. उपाय शोधू लागले. त्यावेळी एक विचित्र घटना घडली. एका गंभीर आवाज सर्व कैलासात दुमदुमला आणि तो आवाज शंकरांनी व इतर देवांनी ऐकला, “तुम्ही कोणत्या चिंतेत पडला? या दैत्यांना मारणे काय कठिण आहे? ईशानीचे ध्यान करा. ती जरूर आपले कल्याण करील. एक सरळ उपाय तुम्ही सुद्धा करू शकता आणि तो म्हणजे दैत्य अरुण गायत्री देवीची उपासना करतो. यापासून जर त्याचे मन विचलित केले तर आपोआपच त्याची शक्ती नष्ट होईल. अशी अनुकूलवाणी ऐकून देवांना आनंद झाला त्यांनी नमतेने गुरु बृहस्पतींना अरूण दैत्याकडे जाण्यासाठी तयार केले. बृहस्पती अरुण दैत्याकडे जाण्यास निघाले आणि सर्व देवता ईशानी देवीचे ध्यान करु लागले.

वास्तविकपणे आई ज्याप्रमाणे सर्व काही मुलाच्या सुखासाठी करते त्याचप्रमाणे देवी सर्व कार्य लोकांच्या कल्याणासाठी करते. ती देवी उपासनेमुळे प्रसन्न होऊन प्रगट झाली. तिचा प्रकाश हजारो सूर्य किरणांप्रमाणे होता. निरनिराळया अलंकरांनी तिचे शरीर भरून गेले होते अशा त्या अभयकारिणीने पुष्कळ भुंग्यानी भरलेली माळ घातली होती. देवांनी प्रार्थना केली, “है दुर्गे, आपण नेहमीच दृष्ट लोकांचा संहार करत आला आहात. तू भक्तांना सुख देते. सृष्टीची रचना आणि तिची जोपसना तूच करत आलीस. तूच विश्व, तेजस्वी, प्राज्ञ आणि विराट प्रवृत्तीची आहे. आम्ही तुला प्रणाम करतो.”

प्रसन्न होऊन देवी म्हणाली, “देवतांनो, आपल्या दुःखाचे कारण काय आहे? मी प्रसन्न झाली आहे. जी तुमची इच्छा असेल ती मी अवश्य पुर्ण करीन.” देवांचा राजा इंद्राने दैत्यराज अरुणच्या महानाशक उत्पाताची माहिती सांगितली आणि देवीची प्रार्थना केली की कोणत्याही प्रकारे त्याचा नाश झाला पाहिजे. तिकडे बृहस्पती ज्यावेळी अरूण जवळ गेले त्यावेळी त्यांना पाहिल्यावर तो म्हणाला, “तुम्ही शत्रु पक्षाचे आहात, तुम्ही येथे येण्याचे साहस का केले? गुरु बृहस्पती बुध्दीवान होते. ते म्हणाले, तु तर आमचा भाऊ आहे. आमची आराध्य देवता गायत्री आहे. तिचा जप तु सुद्धा करतोस तर तुझ्यात आणि माझ्यात वैर कसले?

दैत्यराज अरूणावर या प्रश्नांनी जे काम केले ते देवतांच्या सहस्त्र शस्त्राने पण झाले नसते. नाराज होऊन अरूण म्हणला, जर गायत्री तुमची आराध्य देवता आहे तर आज पासून मी तिचे नाव विसरून जाईन आणि जप करणार नाही. परंतु तुम्ही येथुन चालते व्हा नाही तर तुमचा जीव धोक्यात येईल. बृहस्पतीच्या तोंडावर रहस्यमय हसु फुटले आणि ते देवतांचे कार्य करून परत आले. दुर्गादेवीच्या भुंग्याच्या माळेतुन अनेक मुंगे बाहेर पडले आणि ते सर्व पृथ्वीवर पसरले. ज्या प्रकारे सुर्याची सहस्त्र किरणे निघतात त्याचप्रमाणे सर्व आकाशभर भुगे पसरले. पोळे तोडल्यावर ज्याप्रकारे मधमाशा माणसांना चिकटतात त्याप्रमाणे भुंगे सर्व दैत्यांना चिकटले. अशा प्रकारे दैत्याची सेना नष्ट झाली आणि महाबली अरुणचा गर्व धुळीला मिळाला.

दैत्यांना नष्ट केल्यानंतर ताबडतोब सर्व भुंगे एकत्र होऊन पहिल्यासारखे देवीच्या माळेत एकाकार झाले. ज्यावेळी संकट दूर झाले त्यावेळी विष्णु आणि सर्व देवता देवींची पुजा करू लागले. फुलांचा पाऊस आकाशातून पडू लागला आणि सर्व हात जोडून म्हणाले, हे ईशानी देवी, तुझा जय असो. वास्तविक शेवटी अनंत कोटी ब्रम्हांड नायिका जगदंबेची उपासना केली तर कठिणातले कठिण काम सरळ व्हायला वेळ लागत नाही.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती भुंग्यांची माळ मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते जर.आम्ही आशा करतो कि तुम्हाला भुंग्यांची माळ मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *