Monday, September 25, 2023
Homeगोष्टीछोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट | marathi story

छोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट | marathi story

मित्रांनो आज आपण बघणार आहोत छोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट. बिरबलाच्या गोष्टी या खूप प्रचलित आहेत प्रत्येक गोष्टींमधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत आज आपण जी गोष्ट बघणार आहोत त्या गोष्टीतून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. हि गोष्ट लहान मुलं व तरुण मुलं दोघांसाठी लाभदायक आहे गोष्ट आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करणं चला तर मग बघूया छोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट.

छोट्या बिरबलची गोष्ट

ज्यावेळी बिरबल पंधरा वर्षांचा होता. त्यावेळी त्याचे आईवडिल स्वर्गवासी झाले होते. त्यावेळी बिरबल जवळ फक्त पन्नास रुपये होते. तो जास्त शिकलेला नव्हता.

खूप विचार करून बिरबलने पानाची गादी किल्ल्याजवळ उघडली. त्यावेळी बादशह अकबर आग्रा किल्ल्यात राहत होता. गोस्वामी तुलसीदासला कैद केल्यामुळे वीर बजरंगी बादशाहने दिल्लीतील किल्लातून कायमचे निघून जाण्याची आज्ञा केली. म्हणून अकबर जहांगीर आणि शाहजहाने राज्य केले होते. औरंगजेब दिल्लीतील किल्ल्यात राहत होता. इस्लामी राजवट कायमची संपली होती.

छोटा बिरबल पानाच्या गादीवर सुपारी कापत होता आणि मंत्र ॐ ॐ चा जप करत होता. आजकालच्या विदयार्थ्यांना सरस्वतीचा हा मंत्र माहित नसतो. जे विद्येचा बीजमंत्र जाणत नाही आणि विद्या प्राप्त करायचा प्रयत्न करतात त्यांना विद्येचे प्रेत म्हणून संबोधिले जाते.

बिरबलाने पाहिले की किल्ल्यातून एक मियाभाई लपत येत होता. तो मिया दुकानासमोर येऊन उमा राहिला आणि म्हणाला,”पंडितजी, तुमच्या जवळ चुना आहे का?

“किती पाहिजे”, बिरबलने विचारले. त्याने सांगितले,“पावशेर चुना पाहिजे.

बिरबलने विचारले,”येवढया चुनाचे काय करणार? मियाने विचारले,”तुझ्याजवळ केवढा चुना आहे.

माझ्या एका घागरीत तीन शेर चुना भिजत ठेवला आहे. जेवढा पाहिजे तेवढा घेऊन जा. परंतु मला सांग की तुला पावशेर चुन्याची का गरज भासली ?”

काय सांगू महाराज, बादशहांना मी नेहमीसारखे पान करून दिले. खूर्चीवर बसून पान खाता खाता त्यांनी हुकूम केला, पावशेर चुना घेऊन ये आणि येताना कफनपण घेऊन ये.”

अहो महाराज, तुम्ही काय बादशहाकडे पान लावण्यासाठी आहात का?”

“होय महाराज “किती दिवसापासून?” “साधारण पंधरा वर्षे झाली असतील.

“तरी देखील पान लावता आले नाही? आता तुमची गुंतागुंत दूर होणार आहे.”

“म्हणजे काय?”

खाया सावार आहे पावशेर चुना तुम्हाला खायला सांगणार आहे. “म्हणजे मी मरून जाईन. म्हणून मला कफन आणण्यासाठी सांगितले. त्यात माझी काय चूक?”

तुम्ही पानात चुना जास्त लावला. त्यामुळे बादशहाची जीभ भाजली. चुन्याची तिव्रता तुम्हाला समजावण्याची आवश्यकता त्यांना भासली. म्हणजे?

म्हणजेच पावशेर चुना तुम्हाला खायला सांगणार.’ “खरे सांगता पंडितजी, तुम्ही तर ज्योतीर्षी आहात. आता सारे स्पष्ट झाले. देव तुझ्या धंदयात भरभराट करो आता मला वाचण्याचा काही उपाय सांगा ज्योतीषी महाराज

एक शेर तूप पी आणि चुना घेऊन जा. ज्यावेळी बादशाह सांगेल की चुना खा. त्यावेळी न घाबरता चुना खा. चुन्याचा शत्रू तूप आहे. तूपाच्या प्रभावामुळे तुमची जीभ भाजणार नाही आणि काळिजपण फाटणार नाही. म्हणजेच मरणार नाही. चुन्याच्या विषाला तूप मारते. दोन्ही आपआपसांत लढून मरतील.

“परमेश्वर तुमचे कल्याण करो? तुझ्या दुकानाची भराभराट होवो.

“मी खाण्यासाठी कालच दोन शेर तूब घेतले होते. त्यातील एक शेर तुम्ही न्या.

बिरबलाने मापून पावशेर चुना आणि एक शेर तूप समोर ठेवले. दोन्ही वस्तूंची किंमत देऊन मिया तूप प्यायले आणि चुना घेऊन महाराजांकडे गेले. बादशहाने विचारले, चुना आणलास.’

“होय सरकार’, खोजा म्हणाला. इथे बसून चुना खा अशी बादशहाने आज्ञा केली. खोजा समोर बसला आणि बादशहाला पावशेर चुना दाखवून सर्व खाल्ला.

संध्याकाळी खोजा बादशहाला पान द्यायला गेला. तेव्हा बादशहाने आश्चर्याने विचारले, “काय मुनीर, तू मेला नाहीस?

हुजूर परमेश्वराच्या कृपेमुळे वाचलो.* *कसा वाचलास?” खोजा मुनीरने बिखलची गोष्ट सांगितली.

बादशाह म्हणाला, “उदया त्या मुलाला दरबारात हजर करा.

सकाळ झाली. दरबार भरला. खोजा बिरबलाला घेऊन आला. बिरबलाने नमस्कार केला. बादशाह हसला आणि बोलला,”काय रे मुला, या मूर्ख खोजाला तूप पिण्याचा सल्ला तू दिला होतास का?”

“होय महाराज.”

“का?”

“मी समजलो होतो की याने पानात जास्त चुना लावला असेल.

“तू फारच हुशार आहेस.”

“तू तर माझ्या एका परीक्षेत पास झालास. अजून दोन प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडून घेतली जातील. जर तू तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीस तर तू बक्षिस जिंकशील.”

“सांगा महाराज.

बादशहाने आपल्या आठही सरदारांना बोलावले आणि सर्वाना रांगेत उभे राहायला सांगितले. सगळयात शेवटी छोटया बिरबलाला उमे केले. नंतर बादशहाने सरदारांना प्रश्न केला.

बारा मधून एक गेला तर बाकी काय राहते ?” सर्व सरदारांनी उत्तर दिले अकरा राहिले. बिरबलाकडे पाहिले त्यावेळी तो म्हणाला, “काहीच राहणार नाही महाराज.

‘ बादशहाने विचारले, “कसे?” बिरबलाने उत्तर दिले,”बारा महिन्यातून एक श्रावण महिना काढला तर पिकलेले धान्य खराब होईल. म्हणजे हाती काहीच मिळणार नाही आणि बादशहाच्या प्रत्येक प्रश्नांत रहस्य असते. सरदारांना साधे प्रश्न विचारले जात नाही.”

बादशहा फारच खूश झाला आणि सर्व सरदारांच्या माना लाजेने खाली गेल्या बादशहा हसून म्हणाला,”सर्व सरदारांनी नंबरवार उत्तर दयावे. एक आणि एक किती होतात?”

आठही सरदारांनी एकच उत्तर दिले “दोन सरकार परंतु बिरबरलाने उत्तर दिले एकावर एक अकरा होतात. “ते कसे?” बादशहाने विचारले.

बिरबल म्हणाला, “तुमच्या सारखा बादशहा आणि माझ्यासारखा सरदार एकत्र मिळाले की आपली शक्ती दोना बरोबर न होता अकरा बरोबर होईल. “

बादशाह म्हणाला की मी नऊ सरदाराची नियुक्ती करतो. मला पूर्ण नऊ ग्रह पाहिजे. आठ मिळालेत आणि नववा तू मला आज मिळालास. अरे मुला, तुझे नावे काय आहे?

मला बिरबल म्हणतात महाराज. महाराज बिरबल आज तर तुम्ही सरदाराचे सरदार

झाले आणि तुम्हाला ‘महाराज’ अशी पदवी दिली. “गरीबांच्या कैवाऱ्याला माझी योग्यता कळली. त्यासाठी ती आपला फार ऋणी आहे. असे बिरबल म्हणाला. बादशाहच्या आज्ञेमुळे बिरबलाला सरदारांचा सरदार बनवले आणि त्याचा पोशाख दिला. त्याला आपल्या उजव्या बाजूच्या सिंहासनावर बसण्याची जागा दिली. उरलेले आठही सरदार खालील चौकात बसवले गेले.

ही गोष्ट सर्वांना माहित होती की बादशाह आणि बिरबलाची जोडी फार काळपर्यंत टिकली.

छत्तीस वर्षे दोघांमध्ये मित्रता होती आणि ते नेहमी बरोबर राहत असत. ज्यावेळी कासूलच्या लढाईत महाराज बिरबलला मारले गेले त्यावेळी बादशह अकबर त्याच्या मरणाची बातमी ऐकून बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळले. बादशाह म्हणाले, “किती बरे झाले असते जर मी बिरबलबरोबर मेलो असतो. सारे जीवन बिरषलबरोबर गेले आता मरणाचे दिवस पूर्ण करत आहे.

सरस्वतीला प्रसन्न करून बिरबलने आपले नाव अमर केले. आज कालचे विद्यार्थी म्हणतात, “सरस्वती कोण आहे?” तिच्या जादू टोण्यावर आमचा विश्वास नाही.

अंतिम शब्द

तर मित्रांनो हि होती छोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आज देखील अकबर आणि बिरबल यांच्या कथा खूप लोकप्रिय आहेत. आम्ही आशा करतो कि तुम्हाला छोट्या बिरबलची बुद्धिमत्ता मराठी गोष्ट आवडली असेल जर तुम्हाला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणार लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र.

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments