मित्रांनो आज आपण बघणार आहोत मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो लहान मुलां पासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना आवडतो. पावसाळा आल्यावर माणसानं सोबतच प्राण्यांना व पक्षांना देखील आनंद होतो कारण त्यांना खाण्यासाठी हिरवे गावात व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळते. पावसाळा आला कि लहान मुलं कागदाच्या होड्या बनवून पावसाच्या पाण्यामध्ये सोडतात, सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. उन्हापासून त्रासलेल्या लोकांना पावसामुळे थंडकता मिळते. प्रत्येक वर्षी येणार पाऊस हा काहीतरी एक वेगळा अनुभव देऊनच जातो. म्हणून आज आपण बघणार आहोत mi anubhavlela paus essay in marathi. हा निबंध शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेत देखील बऱ्याच वेळा विचारला जातो म्हणून शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सर्व करू शकता. चला तर मग बघूया मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध.
मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
काल नागपूरला पहिला पाऊस पडला. पाऊस पडण्यापूर्वी आभाळात अचानक अंधारून आले होते. आकाश ढगांनी भरून गेले होते. आणि मग पावसाला सुरुवात झाली. पावसाचे टपोरे थेंब खाली येत होते. नंतर सरीवर सरी बरसू लागल्या. आम्ही त्या सरी कितीतरी वेळ नुसते पाहत होतो. पावसाने पृथ्वीला केलेला तो अभिषेक मोठा विलोभनीय होता.
तेवढ्यात आजोबा म्हणाले, चल बाळ, आपण स्लॅबवर जाऊ. मस्तपैकी पावसात भिजू. खूप मजा येते. पावसात भिजण्याची मजा काही औरच.’ मला तर तेच हव होतं. लगेच मी आणि आजोबा दोघही वर मोकळ्या स्लॅबवर गेलो. पावसात उभे राहिलो.
पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडत होते. एक मिनिटात मी पूर्ण भिजून गेलो. किती थंडगार होते ते थेब. उन्हाळ्यात तीन महिने सहन केलेला उकाडा मिनिटा दोन मिनिटातच पूर्ण नाहीसा झाला होता. अंगात विलक्षण उत्साह व नवा हुरूप चढला होता. आजोबा तर सिनेमातल्या हिरोसारखे बेभान होऊन नाचत होते. त्यांचं पाहून मीही मस्त नाचलो. जवळजवळ अर्धा तास तरी आम्ही पावसाची अशी मजा लुटली.
नंतर माझे ढगांकडे लक्ष गेलं. ढगांकडे पाहून मला एक वेगळाच साक्षात्कार झाला. माझ्या मनात असा एक न्यूनगंड होता की मी सावळा आहे म्हणून गो्या मुलांपेक्षा कमी सुंदर आहे. पण त्या दिवशी मला जाणवलं की सर्वांचा दाह शांत करणारा हा काळा ढगच पांढऱ्या ढगांपेक्षा श्रेष्ठ आहे. कृष्णाला मेघश्याम का म्हणतात त्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी कळला. मी यावर विचार करू लागलो की आपणही पावसाप्रमाणे सर्वांची मनं शांत करावी. हेच आपलं जीवनध्येय असाव.
मी नुभवलेल्या पावसानं मला नवं जीवन दिलं होतं.
अंतिम शब्द
तर मित्रांनो हा होता मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटीफिएकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यत येणारा लेख तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.